Video : नाशिकमध्ये भाजपने उमेदवार न देणे अन् फडणवीस यांचे ते विधान?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुस्तक प्रकाश सोहळ्यातील विधान चर्चेत आता आले आहे. त्यावेळी फडणवीस काय म्हणाले होते ते पाहू या, "सत्यजीत तांबे यांच्यासारखे नेते तुम्ही किती दिवस बाहेर ठेवणार, अशी लोक जास्त दिवस बाहेर ठेवली की आमची नजर त्यांच्याकडे जाते. आम्ही चांगली माणसं गोळा करत आहोत."

Video : नाशिकमध्ये भाजपने उमेदवार न देणे अन् फडणवीस यांचे ते विधान?
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Jan 12, 2023 | 5:11 PM

नाशिक : नाशिकमधील पदवीधर मतदार संघात (vidhan Sabha election) शेवटच्या काही तासांत मोठ्या घडामोडी घडल्या. या निवडणुकीत मोठा राजकीय ट्विस्ट आला आहे. सुधीर तांबे (sudhir tambe) यांना कॉंग्रेसकडून उमेदवारी जाहीर झालेली असताना सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आता या मागे भाजप आहे का? ही चर्चा सुरु झाली आहे. कारण नाशिकमध्ये महिन्याभरापुर्वी एक कार्यक्रम झाला होता. त्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी सत्यजित तांबे यांच्यांवर आपली नजर असल्याचे म्हटले होते. कारण नाशिकमध्ये भाजपने आपला उमेदवार अजून दिला नाही. अर्ज भरण्यासाठी फक्त एक दिवस बाकी आहे. भाजपने इतर चार जागांवर उमेदवार जाहीर केले आहे. फक्त अपवाद नाशिकचा आहे. दुसरीकडे नाशिकमध्ये सुधीर तांबे यांना कॉंग्रेसकडून उमेदवारी जाहीर झालेली असतानाही सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे फडणवीस यांनी जे सांगितले, ते आता प्रत्यक्षात उतरणार आहे की काय? ही चर्चा आहे.

सत्यजीत यांच्या अपक्ष उमदेवारीमुळे काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुस्तक प्रकाश सोहळ्यातील विधान चर्चेत आता आले आहे. त्यावेळी फडणवीस काय म्हणाले होते ते पाहू या, “सत्यजीत तांबे यांच्यासारखे नेते तुम्ही किती दिवस बाहेर ठेवणार, अशी लोक जास्त दिवस बाहेर ठेवली की आमची नजर त्यांच्याकडे जाते. आम्ही चांगली माणसं गोळा करत आहोत.”

हे सुद्धा वाचा

चंद्रशेखर बावनकुळे काय-काय म्हणाले?

अजूनही कुणाचं नाव आम्ही पाठवलेलं नाहीय. आम्ही राजेंद्र विखे यांचं नाव पाठवलं होतं. राजेंद्र विखे यांनी निवडणूक लढावे यासाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केला. यासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुढाकार घेतला. पण मागच्या पाच-सहा महिन्यांपूर्वी उमेदवारी जाहीर झाली असती तरी निश्चितपणे निवडणुकीत सहभागी झालो असतो, असं राजेंद्र विखे यांनी सांगितलं. त्यांनी असमर्थता दर्शवली. त्यामुळे मला वाटते आता अपक्षांची निवडणूक आहे. भाजपची भूमिका काय असेल ते भाजप ठरवेल.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.