सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात फिरायला जाताय? मग महिन्याला 1 हजार रुपये मोजावे लागणार!
विद्यापीठात फिरायला येणाऱ्या नागरिकांसाठी विद्यापीठानं एसपीपीयू ऑक्सी पार्क योजना आणली आहे. या योजनेनुसार आता विद्यापीठ परिसरात फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना ऑक्सी पार्क योजनेची मेंबरशिप घ्यावी लागणार आहे.
पुणे : सकाळी किंवा संध्याकाळची वेळ घालवण्यासाठी पुणेकर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात येत असतात. मात्र, आता विद्यापीठ परिसरात फिरण्यासाठी येणाऱ्यांना प्रति महिना 1 हजार रुपये मोजावे लागणार आहेत. विद्यापीठात फिरायला येणाऱ्या नागरिकांसाठी विद्यापीठानं एसपीपीयू ऑक्सी पार्क योजना आणली आहे. या योजनेनुसार आता विद्यापीठ परिसरात फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना ऑक्सी पार्क योजनेची मेंबरशिप घ्यावी लागणार आहे. या योजनेनुसार नागरिकांना महिन्याला 1 हजार रुपये द्यावे लागणार आहेत. विद्यापीठाच्या ऑक्सी पार्क योजनेचा मेंबरशीप फॉर्म भरल्यानंतर नागरिकांना एक पास दिला जाणार आहे. (Savitribai Phule Pune University Oxy Park Scheme)
विद्यापीठाने या योजनेचं एक परिपत्रक जारी केलं आहे. त्यानंतर विद्यापीठावर चौफेर टीका होत आहे. विद्यापीठानं हा निर्णय मागे घ्यावा. अन्यथा विद्यार्थी संघटना आंदोलन करतील असा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, विद्यापीठाच्या ऑक्सी पार्क योजनेला 21 जून अर्थात योग दिनापासून सुरुवात केली जाणार आहे. विद्यापीठाला आर्थिक मदतीची गरज असल्यामुळे अशा प्रकारची योजना सुरु केल्याची विद्यापीठ वर्तुळात चर्चा आहे. दरम्यान, या योजनेनुसार विद्यापीठात फिरण्यासाठी येणाऱ्यांना महिण्याला 1 हजार रुपये मोजावे लागणार आहेत.
संपूर्ण अभ्यासक्रमावर परीक्षा घेण्याचा निर्णय
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे विद्यापीठातर्फे संपूर्ण अभ्यासक्रमावर परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे विद्यापीठाच्या संपूर्ण अभ्यासक्रमावरील परीक्षा नियोजनास महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने विरोध केला आहे. मनविसेने विद्यापीठानं 70 टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा आयोजित करावी, अशी मागणी विद्यापीठ प्रशासनानं केली आहे.
70 टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा घेण्याची मनविसेची मागणी
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेनं विद्यापीठाच्या निर्णयावर टीका केली आहे. विज्ञान शाखा वगळता इतर अभ्यासक्रम पूर्ण नसतांना 100 % अभ्यासक्रमावर विद्यार्थ्यांनी परीक्षा कशी द्यायची ? असा सवाल मनसेने केला आहे. विद्यापीठानं 70 टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा आयोजित करावी, अशी मागणी मनसेने केली आहे.
विद्यापीठाचं धोरण विद्यार्थी विरोधी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं 100 टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. एकंदरीत विद्यापीठाचे हे धोरण शिक्षण हित आणि विद्यार्थी हित न जपता हेकेखोर वृत्तीचे फलित असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेनं केलेला आहे. राज्यातील कोरोना प्रादुर्भाव आणि त्यामुळे असणाऱ्या लॉकडाऊनचा परिणाम शिक्षण क्षेत्रावर ही मोठ्या प्रमाणात झाला आहे, असं मनविसेनं म्हटलं आहे.
संबंधित बातम्या :
Pune Unlock : पुणेकरांना मोठा दिलासा, 14 जूनपासून काय सुरु, काय बंद? वाचा सविस्तर
Savitribai Phule Pune University Oxy Park Scheme