साताऱ्यात प्रत्येक शहीद जवानामागे एक झाड, सयाजी शिंदेंची संकल्पना

सातारा जिल्ह्यात आतापर्यंत 255 जवान शहीद झाले असून प्रत्येक जवानाच्या नावाने एक झाड ही संकल्पना राबवण्याची संकल्पना सयाजी शिंदे यांनी मांडली आहे

साताऱ्यात प्रत्येक शहीद जवानामागे एक झाड, सयाजी शिंदेंची संकल्पना
Follow us
| Updated on: Sep 29, 2020 | 4:13 PM

सातारा : प्रख्यात अभिनेते सयाजी शिंदे यांनी सह्याद्री देवराईच्या माध्यमातून ‘जय जवान जय किसान’ ही नवीन संकल्पना राबवली आहे. साताऱ्यातील प्रत्येक शहीद जवानाच्या नावाने एक झाड लावण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. दहा कोटींचा बंगला घेण्यापेक्षा झाड होऊन माळरानावर सावली द्या, अशा उत्कट भावना यावेळी सयाजींनी बोलून दाखवल्या. (Sayaji Shinde Tree plantation in Satara for Martyr Soldiers)

सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. अभिनेते सयाजी शिंदे यांनी हा उद्देश समोर ठेवून दुष्काळी माण तालुक्यात सह्याद्री देवराईच्या माध्यमातून ‘जय जवान जय किसान’ ही नवीन संकल्पना आणली आहे,

सयाजी यांनी आज वडगाव दडसवाडा या ठिकाणी शहीद जवानांचे कुटुंबिय आणि ग्रामस्थ यांच्यासोबत दुष्काळी भागातील माळरानावर वृक्ष लागवडीचा शुभारंभ केला. यामध्ये जांभूळ, चिंच, आवळा यांची सुमारे एक हजार पाचशे झाडे लावण्याचा संकल्प त्यांनी केला.

सयाजी शिंदे यांचे वृक्षप्रेम सर्वश्रुत आहे. राज्यात ठिकठिकाणी त्यांनी आतापर्यंत वृक्षारोपण केले आहे. त्याचप्रमाणे सैनिकांसाठीची त्यांची तळमळही वारंवार व्यक्त होत असते.

सातारा जिल्ह्यात आतापर्यंत 255 जवान शहीद झाले असून प्रत्येक जवानाच्या नावाने एक झाड ही संकल्पना राबवण्याची संकल्पना सयाजी शिंदे यांनी मांडली आहे. माण तालुक्यात सह्याद्री देवराईच्या माध्यमातून सयाजी शिंदे यांनी याआधीही दुष्काळी भागात हजारो झाडे लावली आहेत.

शहीद जवानांच्या कुटुंबाकडून लावण्यात येणारे प्रत्येक झाड हे सातारा जिल्ह्यातील प्रत्येक जवानाची स्मृती जागृत करुन देणारे असल्याच्या भावना सयाजी शिंदे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना व्यक्त केल्या.

देशातील पहिलं वृक्ष संमेलन सयाजी शिंदे यांनी बीड जिल्ह्यात आयोजित केले होते. विशेष म्हणजे या संमेलनाच्या अध्यक्षपदी वडाचे झाड होते. या संमेलनात सयाजी शिंदेनीही उपस्थितांना वृक्ष लागवडीचा संदेश दिला होता. (Sayaji Shinde Tree plantation in Satara for Martyr Soldiers)

संबंधित बातम्या 

सयाजी शिंदेंकडून स्वत: आगीत उतरुन वणवा विझवण्याचा प्रयत्न

वृक्षलागवड थोतांड आहे असं म्हणणाऱ्यांनी आधी अभ्यास करावा, सुधीर मुनगंटीवारांचे सयाजी शिंदेंना उत्तर

(Sayaji Shinde Tree plantation in Satara for Martyr Soldiers)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.