Mumbai : ‘स्वमग्न’ विद्यार्थ्यांसाठी सोनियाचा दिवस, पालकांसोबत लालबागच्या राजाचे दर्शन घेण्याचे लाभले भाग्य..!

चाइल्ड रिहॅबिलिटेशन सेंटर ही संस्था गेली 12 वर्ष स्वमग्न मुलांना लालबागच्या राजाचे दर्शन घडवते. "स्वमग्न मुलांना समाजात मिसळणे अधिक सोपे जावे, तसंच त्यांच्यात सामाजिक संवाद कौशल्य विकसित व्हावीत हा यामागचा हेतू आहे. पण गेली दोन वर्ष करोना महसाथीमुळे हे शक्य झाले नव्हते, असे चाइल्ड रिहॅबिलिटेशन सेंटरचे संस्थापक संचालक डॉ. सुमित शिंदे यांनी दिली.

Mumbai : 'स्वमग्न' विद्यार्थ्यांसाठी सोनियाचा दिवस, पालकांसोबत लालबागच्या राजाचे दर्शन घेण्याचे लाभले भाग्य..!
मुंबई, ठाणे परिसरातील 100 स्वमग्न विद्यार्थ्यांनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन
Follow us
| Updated on: Sep 04, 2022 | 10:36 PM

मुंबई : (Lalbag Ganesh Festival) लालबागच्या राजाचे दर्शन घ्यावे अशी प्रत्येकाची मनोमने ईच्छा असते. पण ते शक्य होईलच असे नाही. त्यातल्या त्यामध्ये ऐन गणेश उत्सवामध्ये तर ते कसरतीचे काम आहे. पण बाप्पा विराजमान झाले असताना त्यांचे दर्शन घेण्याचे भाग्य मिळाले आहे ते (Self-absorbed students) स्वमग्न विद्यार्थ्यांना आणि विशेष म्हणजे ते ही पालकांसोबत. आयुष्यभर आपल्याच विश्वात गुंग असणाऱ्या या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस हा अविस्मरणीयच म्हणावा लागेल. कारण लालबागच्या मंडपात एकाच वेळी 100 स्वमग्न ते ही आपल्या पालकांसोबत आले आणि काही मिनिटांसाठी कमालीची शांतता पसरली. आवाज घुमत होता तो, गणरायाच्या जयघोषाचा. हा अनोखा सोहळा घडवून आणला आहे तो चाइल्ड रिहॅबिलिटेशन सेंटर संस्थेने. (Mumbai) मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरातील सुमारे १०० स्वमग्न मुलांनी त्यांच्या पालकांसह आज सकाळी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

गणरायाच्या जयघोषाने दुमदुमला परिसर

एकाच वेळी 100 स्वमग्न विद्यार्थी हे त्यांच्या पालकांसमवेत आणि बरोबर शिक्षकही. विद्यार्थी लालबागच्या प्रवेशद्वारात येताच शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी गणरायाचा जयघोष केला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया अशा घोषणा दिल्या जात होत्या. यावेळी या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. त्यानंतर त्यांनी माटुंगा येथील जीएसबी गणरायाचेही दर्शन घेतले.

12 वर्षाची परंपरा कायम

चाइल्ड रिहॅबिलिटेशन सेंटर ही संस्था गेली 12 वर्ष स्वमग्न मुलांना लालबागच्या राजाचे दर्शन घडवते. “स्वमग्न मुलांना समाजात मिसळणे अधिक सोपे जावे, तसंच त्यांच्यात सामाजिक संवाद कौशल्य विकसित व्हावीत हा यामागचा हेतू आहे. पण गेली दोन वर्ष करोना महसाथीमुळे हे शक्य झाले नव्हते, असे चाइल्ड रिहॅबिलिटेशन सेंटरचे संस्थापक संचालक डॉ. सुमित शिंदे यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

माटूंगा येथील गणरायाचेही दर्शन

लालबागच्या राजाचे दर्शन घेतल्यानंतर या विद्यार्थ्यांनी माटुंगा येथील जीएसबी गणरायाचेही दर्शन घेतले. दरवर्षीची परंपरा यंदाही कायम ठेवत या ट्रस्टने आज वेगवेगळे कार्यक्रम घेतले होते. या दरम्यान, विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हा काही वेगळाच होता.

सामाजिक कार्यक्रमात मुलांचा सहभाग महत्वाचा

“स्वमग्न मुलांच्या वर्तवणुकीच्या काही विशिष्ट समस्या असतात. त्यांना इतर सर्वसामान्य मुलांप्रमाणे सहजतेने इतरांमध्ये मिसळता येत नाही. त्यामुळे पालक त्यांना सामाजिक कार्यक्रमांमध्ये घेऊन जाण्याचे टाळतात. त्यामुळे या मुलांमध्ये आणखी भीती निर्माण होते. उलट मुलांना समाजातील लहान मोठ्या कार्यक्रमांत सहभागी करून घेतात त्यांच्या मुलांचा विकास तुलनेने अधिक वेगाने होतो असे ऑक्युपेशनल थेरपिस्ट डॉ. सुमित शिंदे यांनी सांगितले आहे.

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....