बकरा ही ऑनलाईन खरेदीची गोष्ट नाही, कॉंग्रेसच्या माजी मंत्र्यांची बकरी ईदच्या नियमावलीवर नाराजी

काँग्रेसचे माजी मंत्री नसीम खान यांनी नाराजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बकरी ईदवर लादण्यात आलेल्या निर्बंधांवर नाराजी व्यक्त केली (Congress Bakri Id Corona).

बकरा ही ऑनलाईन खरेदीची गोष्ट नाही, कॉंग्रेसच्या माजी मंत्र्यांची बकरी ईदच्या नियमावलीवर नाराजी
Follow us
| Updated on: Jul 18, 2020 | 5:45 PM

मुंबई : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सर्वच सणांवर काही निर्बंध लावले आहेत. त्याचाच भाग म्हणून सरकारने बकरी ईदनिमित्तानेही गर्दी होणार नाही याची काळजी घेत काही निर्बंध लादले आहेत. तसेच याबाबत गृहविभागाने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मात्र, यावर काँग्रेसचे माजी मंत्री नसीम खान यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच बकरी ही ऑनलाईन खरेदीची गोष्ट नसल्याचं मत व्यक्त केलं आहे (Congress leader restriction on Bakri Id Corona).

नसीम खान म्हणाले, “कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम व अटींसह राज्यातील सर्व दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. भाजी मार्केट, मांस मार्केटला परवानगी आहे, मग बकरा खरेदीला परवानगी का नाही? बकरा ही ऑनलाईन खरेदी करण्याची गोष्ट नाही. सरकारमध्ये अल्पसंख्याक समाजाचे अनेक मंत्री आणि आमदार आहेत. त्यांनीही योग्य पाठपुरावा करावा.”

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह काही लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी यांची एक बैठक पार पडली होती. या बैठकीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी बकरी ईद साधेपणाने साजरी करावी, असे सर्वानुमते ठरले. त्या अनुषंगाने शासनाने काही मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं होतं.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

मार्गदर्शक सुचना नेमक्या काय आहेत?

1) कोरोनामुळे उद्धवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीत राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्यास अनुसरुन बकरी ईदची नमाज मस्जिद, ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता, नागरिकांनी आपल्या घरीच अदा करावी.

2) सध्या कार्यान्वित असणारे जनावरांचे बाजार बंद राहतील. नागरिकांना जनावरे खरेदी करावयाची असल्यास त्यांनी ऑनलाईन पद्धतीने किंवा फोनवरुन जनावरे खरेदी करावेत.

3) नागरिकांनी शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी करावी.

4) प्रतिबंधित (Containment) क्षेत्रामध्ये सध्या लागू करण्यात आलेले निर्बंध कायम राहतील. त्यामध्ये बकरी ईद निमित्त कोणतीही शिथीलता देता येणार नाही.

5) बकरी ईदच्या निमित्ताने नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये किंवा एकत्र जमू नये.

6) कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत आणि पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी जारी केलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील.

संबंधित बातम्या :

प्रतिकात्मक कुर्बानी, नियमात शिथीलता नाही, राज्य सरकारकडून बकरी ईदसाठी गाईडलाईन्स

Bakrid 2020 | चार महिन्यात सर्व सण साधेपणाने झाले, बकरी ईदही साधेपणाने करु, पुढच्या वर्षी जल्लोष करु : मुख्यमंत्री

बकरी ईदला कुर्बानीसाठी सूट द्या, नसीम खान यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

संबंधित व्हिडीओ :

Congress leader restriction on Bakri Id Corona

'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.