शहाद्याच्या नगराध्यक्षांच्या वाढदिवसाचं अनोखं सेलिब्रेशन, 11 हजार सीड बॉल आणि 1 हजार रोपांचं वाटप!
राजकीय लोकांनी आपले वाढदिवस बॅनरबाजी करून साजरा न करता समाजाभिमुख साजरे करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. | Tatyasaheb patil Birthday Celebrate Ditribute Seed ball And tree
नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील शहाद्याच्या नगराध्यक्षांनी आपल्या वाढदिवसाचं अनोखं सेलिब्रेशन केलंय. त्यांनी आपल्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन पर्यावरणपूरक पद्धतीने केलं. (Shahada City President tatyasaheb patil Birthday Celebrate Ditribute Seed ball And tree)
तात्यासाहेब पाटील यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त मोतीलाल पाटील यांनी अकरा हजार सीड बॉल आणि एक हजार रोपांचे वाटप केलं. 12 टीम तयार करून हे सीड बॉल आणि रोपांची लागवड सातपुड्याच्या बोडक्या डोंगररांगांमध्ये केली जाणार आहे. याचा फायदा मोठ्या प्रमाणावर होणार आहे. सातपुड्याचं जंगल हे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यासाठी नगराध्यक्षांनी राबवलेला उपक्रम नक्कीच एक प्रेरणादायक ठरेल.
यावेळी आयोजित रक्तदान शिबिरात 251 बॅग रक्त संकलन करण्यात आले. पर्यावरण पूरक जन्मदिवस साजरा करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचं अभिजीत पाटील यांनी सांगितले.
शासनानेही माझी वसंधुरा योजनेअंतर्गत झाडाच्या संवर्धनाचं कार्य हाती घेतलं आहे. मात्र या योजनेला म्हणावा असा प्रतिसाद मिळत नाही. पण आपल्या जीवनातील सर्वोच्च क्षणी मग लग्न असो वा वाढदिवस… अशा मंगल प्रसंगी पर्यावरणपूरक पाऊल उचलून अश्या प्रकारच्या लागवडीची तसंच वृक्ष संवर्धनाची गरज असल्याचं अभिजीत पाटील म्हणाले.
दरम्यान, राजकीय लोकांनी आपले वाढदिवस बॅनरबाजी करून साजरा न करता समाजाभिमुख साजरे करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. )Shahada City President tatyasaheb patil Birthday Celebrate Ditribute Seed ball And tree)
Photo : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लोणार सरोवराला भेट, पाहा फोटो https://t.co/iabqKw0yFK@OfficeofUT #LonarLake
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 5, 2021
हे ही वाचा :
Special Story | नंदूरबारच्या अविनाश पाटलांनी करुन दाखवलं, मिरची शेतीतून 5 महिन्यात कमावले 12 लाख
उद्धव ठाकरेंमधील छायाचित्रकार जागा, लोणार सरोवर पाहणीवेळी मोबाईल फोटोग्राफी!