महाविकास आघाडीच्या तिकट वाटपाच्या वेळी चिंधड्या होऊन जाणार, शहाजीबापू पाटील यांचा मोठा दावा, काय म्हणाले?

राज्यातील राजकीय नेत्यांचं लक्ष हे राज्यातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीवर लागलेले असतांना शहाजी पाटील यांनी मोठा दावा केला आहे. याशिवाय संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यावर सडकून टीका केली आहे.

महाविकास आघाडीच्या तिकट वाटपाच्या वेळी चिंधड्या होऊन जाणार, शहाजीबापू पाटील यांचा मोठा दावा, काय म्हणाले?
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: May 08, 2023 | 12:29 PM

पंढरपूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील हे आज एकाच मंचावर होते. सांगोल्यात बाबुराव गायकवाड यांच्या ७५ वीचा कार्यक्रमाप्रसंगी हे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर होते. त्याच दरम्यान बोलत असतांना शहाजी पाटील यांनी शरद पवार यांच्यावर स्तुतिसुमणं उधळत असतांना भावुक झाले होते. याच दरम्यान शहाजी पाटील म्हणाले यांनी निमंत्रण नसतं तरी आलो असतो म्हणत शरद पवार यांच्याबद्दल आपुलकी दाखवली. तब्बल दहा वर्षांनी भेट होत असल्याचे सांगत आमदार शहाजी पाटील यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. याच दरम्यान माध्यमांशी बोलत असतांना नाना पटोले यांच्यासह संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. याशिवाय सुप्रीम कोर्टाच्या निकालाबाबतही भाष्य केलं आहे.

कॉंग्रेसला अध्यक्ष म्हणून कोणी मिळत नव्हतं म्हणून नाना पटोले यांना अध्यक्ष केले आहे. याशिवाय सांगोला येथील ग्रामीण भागातील बोली भाषेत शहाजी पाटील यांनी जोरदार टीका केली आहे. नाना पटोले यांच्यावर टीका करत असतांना शहाजी पाटील यांनी महाविकास आघाडीवरही भाष्य केले आहे.

शहाजी पाटील यांनी महाविकास आघाडीत नाना पटोले आणि संजय राऊत हे दोन्ही काहीही बडबडत असतात. याशिवाय दररोज सकाळी संजय राऊत बडबडत असतात तरी काही झालं का? असा सवाल उपस्थित करत संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.

हे सुद्धा वाचा

शरद पवार यांच्यासोबत अनेक वर्षे काम केले आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत भावुक होणं ही नैसर्गिक बाब आहे. आमची वाटचाल ही भगव्या सोबत आहे. आणि त्यांची वाटचाल ही तिरंण्यासोबत आहे. असं ही शहाजी पाटील यांनी म्हणत शरद पवार यांच्यासोबत कधीही जाण्याचा विचार नाही हे स्पष्ट केले आहे.

याशिवाय गेल्या महिण्यात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी पूर्ण झालेली असतांना कोणत्याही क्षणी निकाल लागेल अशी स्थिती आहे. त्याच पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाचा निकाल आमच्याच बाजूने लागेल असेही शहाजी पाटील यांनी दावा केला आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात लवकरच राजकीय भूकंप होईल असे संजय राऊत यांनी म्हंटलं होतं.

त्यावरच बोलत असतांना शहाजी पाटील यांनी नाना पटोले, संजय राऊत आणि महाविकास आघाडीवर टीका करत असतांना जागा वाटपावरून महाविकास आघाडीच्या चिंधड्या उडून जातील असं म्हंटलं आहे. त्यामुळे आता शहाजी पाटील यांनी केलेल्या टीकेला नाना पटोले आणि राऊत प्रत्युत्तर देतात का? हे पाहणं देखील महत्वाचे ठरणार आहे.

भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.