AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्राचे आधुनिक भगीरथ अन् अखेरपर्यंत बेदाग राहिलेले नेते.. शंकररावजी चव्हाण! स्मृतीदिन विशेष

हल्लीच्या आरोप प्रत्यारोपांच्या चिखलफेकीत राजकारणाचा पाया असलेलं समाजकारण अगदी गायबच झालं आहे. प्रसिद्धीच्या मागे न धावता जनतेच्या हितासाठी झटणारे नेते शोधून काढावे लागतात. अशा वेळी आठवण येते ती महाराष्ट्राच्या राजकारणात राहून इथल्या विकासकामांवर, इथल्या समाजावर, गावा-गावांवर, मासणांवर आदर्शतेची विकासकामांची प्रतिमा ठसवणाऱ्या नेतेमंडळीची. यापैकीच एक म्हणजे शंकरराव चव्हाण. आज 26 फेब्रुवारी हा त्यांचा स्मृती दिन!

महाराष्ट्राचे आधुनिक भगीरथ अन् अखेरपर्यंत बेदाग राहिलेले नेते.. शंकररावजी चव्हाण! स्मृतीदिन विशेष
Follow us
| Updated on: Feb 26, 2022 | 9:30 AM

महाराष्ट्राचा विकास हवा असेल तर येथील शेतकऱ्यांचं पावसावरचं अवलंबित्व कमी करायला हवं. शिवाराला पाणी दिलं तर शेत फुलेल आणि देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होईल, हे ओळखून त्यानुसार महाराष्ट्र आणि संपूर्ण देशात नवी क्रांती घडवणारा नेता म्हणजे शंकरराव चव्हाण (Shankarrao Chavan). जन्म पैठणचा 14 जुलै 1920 चा. तर कर्मभूमी नांदेड. कुटुंबात कोणताही राजकीय वारसा नसताना शून्यातून विश्व निर्माण केलं. लक्ष्मीबाई-भाऊराव हे माता-पिता. नारायणराव हे ज्येष्ठ बंधू तर स्वामी रामानंद तीर्थ (Swami Ramanand tirth) यांच्या सदैव मार्गदर्शनाखाली शंकररावांचे व्यक्तीमत्त्व घडले. उस्मानिया विद्यापीठातून (Osmania University) BA, LLB झाले. 1945 मध्ये त्यांनी वकिलीची सनद मिळवली. पण स्वामी रामानंद तीर्थांच्या सल्ल्याने ते हैदराबाद मुक्तिसंग्रामात सहभागी झाले. 13 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले आणि शंकररावांच्या कर्तृत्वाचे एक पर्व पूर्ण झाले.

नांदेडमधून राजकारणात सक्रीय

नांदेड जिल्हा काँग्रेसमध्ये 1948 मध्ये शंकरराव चव्हाण सरचिटणीस होते. येथून त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली. नांदेड नगरपालिका, सहकारी क्षेत्र, कामगार वर्गात त्यांनी संघटन बांधणीचं मोठं कार्य केलं. 1956 मध्ये मराठवाडा महाराष्ट्रात समाविष्ट झाला त्यावेळी शंकररावांना मंत्रिमंडळात उपमंत्रीपद मिळालं. पुढे 1960 मध्ये ते पाटबंधारे व वीज खात्याचे मंत्री झाले. नंतर 1972 पासून फेब्रुवारी 1975 पर्यंत ते कृषीमंत्री होते. 21 फेब्रुवारी 1975 रोजी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.  इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि पी.व्ही. नरसिंह राव या तीन पंतप्रधानांच्या समवेत शंकररावजींना केंद्रात शिक्षणमंत्री, नियोजनमंत्री, संरक्षण मंत्री, अर्थमंत्री, गृहमंत्री इत्यादी खात्यांचे विश्वासू मंत्री व निकटवर्ती सहकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली. गृहखात्याचे मंत्री म्हणून काम करताना शंकररावांनी जे कर्तव्यकठोर धाडसी निर्णय घेतले, त्यामुळे त्यांच्या कारकीर्दीची तुलना लोहपुरुष वल्लभभाई पटेल यांच्याशी करतात. ते गृहमंत्री असाताना काश्मीर प्रश्न, आसामचा प्रश्न, पंजाबमधील अतिरेकी कारवाया आदी समस्या कौशल्याने सोडवल्या.

महाराष्ट्राचे आधुनिक भगीरथ

शंकरराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीमुळेच राज्यातील सिंचन प्रकल्पांना गती मिळाली. जायकवाडी, विष्णुपुरी इसापूर, मनार, सिद्धेश्वर, येलदरी, दुधना, अप्पर पैनगंगा, मांजरा, पूर्ण अशा किती प्रकल्पांच्या उभारणीत त्यांचं मोलाचं योगदान राहिलं. किंबहुना यासाठी जे भगीरथ प्रयत्न करावे लागले, त्यामुळेच त्यांना आधुनिक भगीरथ असे म्हटले जाते. केवळ मराठवाडाच नाही तर विदर्भ, कोकणासारख्या डोंगराळ भागातही पाटबंधारे योजना कशा राबवता येतील, याचा शास्त्रशुद्ध अभ्यास शंकरराव यांनी केला होता. नर्मदेच्या पाण्यावर महाराष्ट्राचा हक्क असल्याचं सर्वात पहिल्यांदा शंकरराव चव्हाण यांनीच पटवून दिलं होतं.

जायकवाडी अन् विष्णुपुरी धरणातून मराठवाडा फुलवला

मराठवाड्यासारख्या तहानलेल्या मातीला जलसिंचन प्रकल्पांच्या माध्यमातून तृप्त करण्याचे श्रेय शंकरराव चव्हाण यांना जातं. 1965 साली पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांच्या हस्ते जायकवाडी धरणाच्या बांधणीची सुरुवात झाली. मात्र पैठण येथे जायकवाडी धरण उभे राहू नये म्हणून विरोधकांनी रान पेटवलं होतं. त्यांनी जीवघेण्या धमक्या येत होत्या. त्यांचा एक मोठा अपघातही याच काळात झाला. या सर्व संकटांतून 27 दरवाजांचं जायकवाडी धरण आकाराला आलं. औरंगाबाद, अहमदनगर, बीड, परभणी, जालना आणि नांदेड या पाच जिल्ह्यांना शेती आणि पिण्यासाठी पाणी पुरवणारं धरण आकाराला आलं. आशिया खंडातलं सर्वात मोठं मातीचं धरण म्हणून याची ओळख आहे. या धरणानुळेच आज औरंगाबादचा चेहरा मोहरा बदलला आहे. जायकवाडीप्रमाणेच नांदेडमधील विष्णुपीर धरण हेदेखील मराठवाड्यातील दुसरं अमृतकुंभ म्हटलं जातं.

बोले तैसा चाले, ऐसा राजकारणी

साधारण 50 वर्षे एवढी प्रदीर्घ राजकीय कारकीर्द गाजवणारे शंकरराव चव्हाण हे विधानसभा, विधानपरिषद, लोकसभा आणि राज्यसभा या चारही प्रतिनिधींचे सन्माननीय सभासद राहिले आहेत. एवढी प्रदीर्घ कारकीर्द असूनही सत्ता हे जनसेवेचे साधन आहे, तो शोभेचा अलंकार नाही, ही जाणीव सदैव बाळगणारे असे ते नेते. कधीही सवंग लोकप्रियतेसाठी त्यांनी मोठ्या- मोठ्या घोषणा केल्या नाहीत. याउलट दिलेला शब्द पाळण्याची धमक त्यांच्यात होती.

Shankarrao Chavan

पंडित नेहरू एकदा म्हणाले होते… शंकरराव चव्हाण यांचे पाटबंधारे क्षेत्रातील काम पाहून पंडित जवाहरलाल नेहरू एका म्हणाले होते की शंकररावांनी महाराष्ट्राला भारताच्या सिंचनाच्या नकाशावर ठळक स्थान मिळवून दिले आहे.

अटलजींनी केले होते कौतुक शंकरराव चव्हाण यांच्या अमृतमहोत्सवी सत्काराप्रसंगी माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांनीही गौरवोद्गार काढले होते. ते म्हणाले होते, शंकररावांचे परिश्रम, प्रयत्न, त्यांचा प्रामाणिकपणा, शिकाऊवृत्ती, त्यांचे प्रशासन कौशल्य हे तर वाखाणण्याजोगे आहेच, पण त्यांचे बेदाग, निष्कलंक चारित्र्य हे सर्वाच महत्त्वाचे आहे….

पुत्र अशोकराव चव्हाण म्हणतात… सध्या महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यात काँग्रेसला बळकटी देणारे नेते अशोक चव्हाण हे शंकररावांचे पुत्र. शंकरराव चव्हाणांविषयी सांगताना त्यांनी एका पुस्तकात लिहिलंय… ते म्हणतात, ‘मी लहान होतो तेव्हापासून त्यांचं निरीक्षण केलंय. ते घरात नाना होते तर बाहेर साहेब! ते सतत कार्यमग्न असायचे. नवे प्रकल्प, नव्या योजनांच्या अनुषंगाने त्यांच्याकडे अभियंते, तज्ज्ञ आणि तंत्रज्ञांचा राबता असे. वेगवेगळ्या योजना नियोजित वेळेत पूर्ण कशा होतील, याचाच त्यांना ध्यास लागलेला असायचा. साहेब दिल्लीत गेले, तेथील सत्तेत स्थिरावले. पण गल्लीची नाळ तुटू दिली नाही. दिल्लीच्या शिष्टाचाराचा संस्कृतीचा भाग म्हणून सुटाबुटात वावरल्यानंतर ते कर्मभूमीत येत तेव्हा धोतर, झब्बा, जाकीट, गांधी टोपी घालून सामान्यांमध्ये मिसळत. त्यांचे प्रश्न समजून घेत. साहेबांची शिकवण, कार्यनिष्ठा, पक्षनिष्ठा आणि आलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचे धोरण हेच माझे प्रेरणास्थान आहे.’

इतर बातम्या-

तर मुर्ती तुटेल? बाळासाहेबांची शिवसेना राहीली नाही म्हणणाऱ्यांना उद्धव ठाकरेंचं स्फोटक उत्तर

Chanakya Niti : घरामध्ये आर्थिक संकट कधीच पहायचे नसेल तर पैशाशी संबंधित ‘या’ 5 गोष्टी कधीही विसरू नका!

एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर.