शरद पवार यांच्या मूक संमतीनेच राज्यात दहशतवाद माजला; राम शिंदेंची राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल

अभिनेत्री केतकी चितळेने शरद पवार यांच्यावर वादग्रस्त पोस्ट केल्यानंतर राज्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी केतकीवर पोलीस गुन्हा दाखल केला. या घटनेबद्दल राजकीय वर्तुळातूनही उलट सुलट चर्चा करण्यात आल्या.

शरद पवार यांच्या मूक संमतीनेच राज्यात दहशतवाद माजला; राम शिंदेंची राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल
Follow us
| Updated on: May 18, 2022 | 2:50 PM

अहमदनगरः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मूक संमतीनेच राज्यात दहशतवाद माजला आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्या अनेक घटना घडत असताना पोलिसांना गृहखात्याकडून सूचना येत असून, सरकारमधील पक्षांच्या कार्यकर्त्यांबाबत नरमाईची भूमिका घेण्याचे सांगण्यात येत असल्याचा आरोप भाजपचे माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde) यांनी केला आहे. ते अहमदनगर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. कोणत्याही व्यक्ती विरोधात समाज माध्यमांवर (Social Media) आक्षेपार्ह पोस्ट करण्याचं कुणीही समर्थन करणार नाही पण ज्या व्यक्तीने अशी पोस्ट केली त्या व्यक्तीवर पोलिसांकडून कारवाई झाली असताना पोलिसांसमोर अशा व्यक्तींच्या विरोधात धुडगूस करणाऱ्यांवर पोलिसांनी नेमकी काय कारवाई केली असा सवालही उपस्थित करण्यात आला.

यावेळी शिंदे म्हणाले की, केतकी चितळेवर झालेल्या शाही फेकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

स्मृती इराणी यांचा कार्यक्रम उधळून लावू

सोबतच पुणे येथे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा कार्यक्रम उधळून लावू असे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जाहीर केले होते तरीही पोलिसांनी कोणतेही कारवाई केली नाही या मुद्यावरुन त्यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली.

केतकीवर पोलीस गुन्हा

अभिनेत्री केतकी चितळेने शरद पवार यांच्यावर वादग्रस्त पोस्ट केल्यानंतर राज्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी केतकीवर पोलीस गुन्हा दाखल केला. या घटनेबद्दल राजकीय वर्तुळातूनही उलट सुलट चर्चा करण्यात आल्या.

चितळेच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह

सदाभाऊ खोत, तृप्ती देसाई आणि त्यापाठोपाठ आता राम शिंदे यांनीही केतकी चितळेच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. शिंदे यांनी थेट पोलिसांच्या कार्यवाहीवर आणि राष्ट्रवादी पक्षावरच त्यांनी सवाल उपस्थित केला आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.