शरद पवार इज बॅक, कोरोना संकटात छोट्या व्यापाऱ्यांना मदत देण्याचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना सल्ला

पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी कोरोना संकटाच्या काळात काही घटकांना मदत करण्याचा सल्ला दिला आहे.

शरद पवार इज बॅक, कोरोना संकटात छोट्या व्यापाऱ्यांना मदत देण्याचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना सल्ला
शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष
Follow us
| Updated on: May 07, 2021 | 8:13 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दोन मोठ्या शस्त्रक्रियांनंतर पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी कोरोना संकटाच्या काळात काही घटकांना मदत करण्याचा सल्ला दिला आहे. राज्यातील शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांना मदत द्या, असा सल्ला पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दिला आहे. (Sharad Pawar’s letter to CM Uddhav Thackeray, Deputy CM Ajit Pawar)

‘कोरोना जागतिक महामारीच्या दुसऱ्या लाटेनं महाराष्ट्रात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना संक्रमणाची साखळी तोडायची असल्यानं पुनश्च संचारबंदीचा निर्णय़ राज्य सरकारला घ्यावा लागला. याचा परिणाम अनेक व्यवसाय-धंद्यांवर झाला असून, हा वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्‍वभूमीवर हॉटेल व्यावसायिक आणि आदरातिथ्य क्षेत्रातील काही प्रतिनिधींनी त्यांच्या समस्यांबाबत मला अवगत केले. त्यांनी प्रामुख्याने मांडलेल्या काही मागण्यांकडे आज राज्याचे मा. मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांचे एका पत्राद्वारे लक्ष वेधले’, अशी माहिती पवार यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.

सुप्रिया सुळेंचं फेसबुक लाईव्ह

दरम्यान, शरद पवार यांनी आपल्या निवासस्थानी पुन्हा एकदा कामकाजाला सुरुवात केली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी काही वेळापुर्वी फेसबुक लाईव्ह केलं. त्यात पवार आपल्या निवासस्थानी कार्यकर्ते आणि काम घेऊन आलेल्या लोकांना भेटत आहेत. त्यावेळी त्यांच्या समस्या जाणून घेत काही सूचनाही करत असल्याचं या फेसबुक लाईव्हमध्ये पाहायला मिळत आहे.

शरद पवारांवर ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया

शरद पवार यांच्यावर नुकतीच मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. एन्डोस्कोपीद्वारे शरद पवार यांच्या गॉल ब्लॅडरमधील मोठा स्टोन बाहेर काढण्यात आला. त्यामुळे आता शरद पवार यांना पोटदुखीचा त्रास होणार नाही.

ही शस्त्रक्रिया 31 मार्चला होणार होती. मात्र, आदल्या दिवशी संध्याकाळपासून शरद पवार यांच्या पोटात प्रचंड दुखायला लागले होते. त्यामुळे शरद पवार यांना 29 मार्चला रात्रीच ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. ब्रीच कँडीमधील विशेष डॉक्टरांच्या पथकाने अर्धा तासांच्या शस्त्रक्रियेनंतर शरद पवार यांच्या पित्तनलिकेतील खडा एन्डोस्कोपीद्वारे बाहेर काढला. डॉ. अमित मायदेव यांच्या नेतृत्वाखाली ही शस्त्रक्रिया पार पडली. डॉक्टरांच्या या पथकात डॉ. गोलवाला, डॉ. प्रधान, डॉ. दफ्तरी, डॉ. समदानी, डॉ. टिबरेवाला यांचा समावेश होता.

संबंधित बातम्या :

शस्त्रक्रियेनंतर सुप्रिया सुळेंनी ट्विट केला शरद पवारांचा फोटो, म्हणाल्या…

Sharad Pawar health update : पोटदुखी आणि पित्ताशयाचा त्रास, शरद पवारांना नेमकं काय झालंय?

Sharad Pawar’s letter to CM Uddhav Thackeray, Deputy CM Ajit Pawar

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.