त्यांच्यावतीनं हे वकिली करतायत, आनंद दवेंच्या भूमिकेवर शरद पवारांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये फटकारलं

राज्यात राष्ट्रवादी- ब्राह्मण संघटन यांच्यात वाद पेटल्यानंतर तो मिटविण्यासाठी प्रदीप गारटकर यांनी पुढाकार घेतला होता. मात्र ही बैठक शरद पवार यांनीच बोलवल्याचे म्हटले जात होते. त्यावर पवारांनी पुन्हा पुन्हा स्पष्टीकरण दिले की मी बैठक बोलवली नव्हती. ही बैठक प्रदीप गारटकर यांनी बोलवली होती.

त्यांच्यावतीनं हे वकिली करतायत, आनंद दवेंच्या भूमिकेवर शरद पवारांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये फटकारलं
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 21, 2022 | 8:22 PM

पुणे : राज्याच्या राजकारणात आधी अनेक मुद्द्यावरून आणि जातीय राजकारणावरून वाद सुरू असतानाच राष्ट्रवादी- ब्राम्हण महासंघ (Brahmin Federation) असाही वाद सुरू झाला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं (NCP) राजकारण ब्राह्मणविरोधी आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. अशावेळी शरद पवार यांनी ब्राह्मण संघटनांना चर्चेसाठी निमंत्रण दिलं होतं. त्यानुसार काही संघटनांनी चर्चेचं निमंत्रण नाकारलं असलं तरी 20 ब्राह्मण संघटनांचे 40 प्रतिनिधी पवारांसोबत चर्चेसाठी उपस्थित झाले आहेत. यात आनंद दवे यांच्या ब्राह्मण महासंघ आणि परशुराम संघटनेनं पवारांच्या बैठकीचं निमंत्रण नाकारत दवे गैरहजर राहिले. यानंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी आनंद दवे यांचा समाचार घेताना, त्यांच्यावतीनं हे वकिली करतायत काय असे म्हणत दवेंच्या भूमिकेला प्रेस कॉन्फरन्समध्येच फटकारलं आहे.

बैठक प्रदीप गारटकर यांनी बोलवली

राज्यात राष्ट्रवादी- ब्राह्मण संघटन यांच्यात वाद पेटल्यानंतर तो मिटविण्यासाठी प्रदीप गारटकर यांनी पुढाकार घेतला होता. मात्र ही बैठक शरद पवार यांनीच बोलवल्याचे म्हटले जात होते. त्यावर पवारांनी पुन्हा पुन्हा स्पष्टीकरण दिले की मी बैठक बोलवली नव्हती. ही बैठक प्रदीप गारटकर यांनी बोलवली होती. या हेतू फक्त हा वाद मिटवणे इतकाच आहे. तसेच ते म्हणाले, मला दवे नावाच्या व्यक्तीचा मेसेज आला होता. त्यांनी भेटायची वेळ मागितली होती. त्यानुसार मी त्यांना भेटीची वेळ दिली. मात्र आनंद दवे यांच्या ब्राह्मण महासंघ आणि परशुराम संघटनेनं पवारांच्या बैठकीचं निमंत्रण नाकारलं.

राजकीय फायदा होणार की नाही

दरम्यान पत्रकारांनी दवे यांच्या बाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले, दवे त्यांच्यावतीनं वकिली करत आहेत. आम्हाला ब्राह्मण समाजाची आठवण झाली. त्याचा काही राजकीय फायदा होणार की नाही हे आम्हाला सांगायला ज्योतिषाची गरज नाही असा टोला त्यांनी दवेंसह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना ही लगावला. तसेच ते म्हणाले, राज्यातील वातावरण खराब झालं असं मला वाटत नाही. जबाबदार लोकांनी काही विधाने केल्यास अस्वस्था निर्माण होऊ शकते. काही समज गैरसमज होऊ शकतो. पण जबाबदार व्यक्तींनी त्याची खबरदारी घेतली पाहिजे, असेही ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

पवार यांनी भूमिका जाहीर करावी

पुण्यात ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमोल मिटकरी, छगन भुजबळ आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्याविषयी भूमिका जाहीर करावी. आम्ही पत्रकार परिषदेनंतर त्यांचा जाऊन सत्कार करू असे वक्तव्य केले होते. तसेच अमोल मिटकरींची त्यांनी आज कान उघाडणी करावी, अशी मागणी देखील ब्राह्मण महासंघाने केली होती. पवार साहेबांना ब्राह्मण समाजाच्या वेदना माहिती आहेत, त्यामुळे त्यांच्यावर नाराजी नाही, मात्र पक्षातील काही नेत्यांची त्यांनी कानउघडणी करावी, अशी अपेक्षा दवे यांनी व्यक्त केली होती.

पवारांनी बोलावलेल्या बैठकीला कोणत्या संघटना उपस्थित?

भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी, रामभाऊ तडवळकर जागतिक ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष अजित घाटपांडे, सचिव अभिजीत आपटे आम्ही सारे ब्राह्मणचे भालचंद्र कुलकर्णी ब्राह्मण महासभेचे प्रकाश दाते समर्थ मराठी संस्थेचे अनिल गोरे चित्पावन ब्राह्मण संघाचे गाडगीळ गुरुजी समस्त ब्राह्मण समाजाचे काकासाहेब कुलकर्णी वरील संघटनांसह एकूण 20 संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित आहेत.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.