AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar NCP | शरद पवार दाखवत नसतील, पण कालच्या बंडात त्यांना बसलाय एक मोठा झटका

Sharad Pawar NCP | टीका पचवण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. शरद पवारांवर आजवरच्या राजकीय कारकिर्दीत अनेक गंभीर आरोप झाले. पण त्यांनी कधी संयम सोडून उत्तर दिलं नाही.

Sharad Pawar NCP | शरद पवार दाखवत नसतील, पण कालच्या बंडात त्यांना बसलाय एक मोठा झटका
Sharad Pawar
Follow us
| Updated on: Jul 03, 2023 | 10:53 AM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एक मुरब्बी राजकारणी आहेत. राजकीय जीवनात त्यांनी बरेच चढ-उतार अनुभवले आहेत. बराच काळ सत्तेत घालवला आहे. विरोधी पक्षाचा अनुभवही त्यांच्याकडे आहे. राजकीय आखाड्यात त्यांनी अनेक दिग्गजांना चीतपट केलय. आपल्या राजकीय गणितांची कुणालाही कल्पना लागू न देणं ही शरद पवार यांच्या राजकारणाची खासियत आहे. आता वयाची 80 वर्ष उलटल्यानंतरही शरद पवार राजकारणात सक्रीय आहे.

राजकीय नेत्याने किती मेहनत घ्यावी? समाजात त्याचं वर्तन कसं असाव? याचं शरद पवार हे उत्तम उदहारण आहे. टीका पचवण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. शरद पवारांवर आजवरच्या राजकीय कारकिर्दीत अनेक गंभीर आरोप झाले. पण त्यांनी कधी संयम सोडून उत्तर दिलं नाही.

एक झटका नक्की बसलाय

हे सुद्धा वाचा

लढवय्या नेता, योद्धा अशीच त्यांची ओळख आहे. काल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठं बंड झालं. त्यांनीच घडवलेल्या त्यांच्या पुतण्याने म्हणजे अजित पवारांनी पक्षाच्या विरोधात जाऊन शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. खरंतर कुटुंबातील व्यक्तीमुळेच शरद पवार यांना फटका बसला. शरद पवार अनुभवी राजकारणी आहेत. त्यामुळे त्यांनी चेहऱ्यावर आपल्याला धक्का बसलाय असं दाखवलं नाही. पण या बंडामुळे शरद पवारांना एक झटका नक्की बसलाय.

राजकीय आयुष्यातील प्रत्येक महत्वाच्या निर्णयात सोबत

त्यांचे अत्यंत विश्वासू, निकटवर्तीय प्रफुल पटेल यांनी शरद पवारांची साथ सोडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आतापर्यंतच्या राजकीय आयुष्यातील प्रत्येक महत्वाच्या निर्णयात प्रफुल पटेल हे शरद पवारांसोबत सावलीसारखे दिसले आहेत. आता त्याच प्रफुल पटेल यांनी पवारांच्या पुतण्याची म्हणजे अजित पवार यांची साथ दिली आहे. प्रफुल पटेल हे कुठलाही निर्णय शरद पवार यांना विचारल्याशिवाय घेत नव्हते. पण आज त्यांनीच न सांगता साथ सोडली.

पवारांनी त्यांच्यासाठी सगळ काही केलं

प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे सोडल्यास मी कोणावरही नाराज नाही, असं शरद पवार यांनी सांगितलं. त्यातच सगळं काही येतं. शरद पवार यांनी प्रफुल पटेल यांना राजकारणात आणलं. गोंदिया महापालिकेचे चेअरमन ते केंद्रीय मंत्री हा प्रफुल पटेल यांचा प्रवास शरद पवार यांच्यामुळे शक्य झाला. प्रफुल पटेल हे सर्वप्रथम 1991 साली निवडणून लोकसभेवर गेले. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलं नाही. प्रफुल पटेल यांचा पराभव झाला, त्यावेळी पवारांनी त्यांना राज्यसभेवर निवडून आणलं.

त्यांच्यामुळे ताजं संकट टळलं होतं

2014 च्या लोकसभा निवडणुकीत प्रफुल पटेल यांचा दारुण पराभव झाला. आताचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले त्यावेळी भाजपाचे उमदेवार होते. त्यांनी प्रफुल पटेल यांचा पराभव केला होता. प्रफुल पटेल हे शरद पवार यांचे संकटमोचक समजले जायचे. अलीकडे शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपद सोडल्यानंतर वाद निर्माण झाला होता. त्यावेळी प्रफुल पटेल यांच्या मध्यस्थीनंतर निर्माण झालेलं संकट टळलं होतं. शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतला होता. निश्चित पवारांना एक फटका बसेल

1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापन झाली. त्यानंतर प्रफुल पटेल यांनी लोकसभा, विधानसभेच्या जागा वाटपात तसेच सरकार बनवण्यात महत्वाची भूमिका बजावली. प्रफुल पटेल यांचे सगळ्याच राजकीय पक्षात मित्र आहेत. काँग्रेस, भाजपामध्ये त्यांचे अनेक नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत. याचा शरद पवार यांना नेहमीच फायदा झाला. आता तेच पटेल सोबत नाहीयत. निश्चित शरद पवार यांना याचा फटका बसेल.

पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?.
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?.
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश.
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?.
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं.
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन.
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट.
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड.
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?.
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन.