AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिर्डीत येणाऱ्या भाविकांकडून आता प्रवेश कर, नगरपंचायतीचा ठराव

साईबाबा संस्थानकडून स्वच्छता निधी बंद झाल्यामुळे शिर्डी नगरपंचायतीने आता भाविकांकडून टोल वसुलीचा मार्ग अवलंबल्याचं दिसत आहे. (Shirdi Tax from Pilgrims)

शिर्डीत येणाऱ्या भाविकांकडून आता प्रवेश कर, नगरपंचायतीचा ठराव
शिर्डी नगरपंचायत
| Updated on: Mar 06, 2021 | 12:09 PM
Share

शिर्डी : शिर्डीत येणाऱ्या भाविकांकडून आता प्रवेश कर आकारला जाणार आहे. शिर्डी नगरपंचायतीने टोलवसुलीचा ठराव मंजूर केला. यामुळे भाविकांची नाराजी ओढवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिर्डी नगरपंचायतीच्या या निर्णयावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादीही आक्रमक झाले आहेत. (Shirdi Nagar Panchayat to receive Tax from Pilgrims entering City)

साईबाबा संस्थानकडून स्वच्छता निधी बंद झाल्यामुळे शिर्डी नगरपंचायतीने आता भाविकांकडून टोल वसुलीचा मार्ग अवलंबल्याचं दिसत आहे. शिर्डी शहराच्या स्वच्छतेसाठी प्रवेश कर आकारणी केली जाणार आहे. शिर्डीचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी यासंदर्भात माहिती दिली.

शिवसेना-राष्ट्रवादी आक्रमक

दरम्यान, भाविकांकडून प्रवेश कर आकारणी करण्यावरुन राजकारण तापल्याचे दिसत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. भाविकांकडून टोल आकारणी करु देणार नाही, असा इशारा सेना-राष्ट्रवादीने दिला.

साईबाबा संस्थानाकडून स्वच्छता निधी बंद

साईबाबा संस्थान शहर स्वच्छतेसाठी दरमहा नगरपंचायतीला 42 लाखांचा निधी देत होते. मागील वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारलेल्या लॉकडाऊनच्या काळात संस्थानने स्वच्छता निधी बंद केला.

कोरोना नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याच्या बैठकीत सूचना

शिर्डीत साई बाबांच्या दर्शनाला दररोज होणारी गर्दी, गावोगावचे आठवडे बाजार, बाजारपेठ, दुकानं, लग्न, सभा, मेळावे, अंत्यविधी अशा सगळ्याच ठिकाणी नागरिक निर्धास्तपणे वागताना दिसत आहेत. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क वापरण्याचा अनेकांना विसर पडल्याचे चित्र दिसत असल्याने सर्व विभागांना नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या आहेत.

प्रथम तपासणी, लक्षणे आढळल्यास थेट उपचारासाठी

विमानतळ, रेल्वे स्थानक, बस स्थानक येथे येणाऱ्या भाविकांची तपासणी करणे आणि लक्षणे आढळल्यास उपचार करण्याच्या सूचना प्रांतधिकारी म्हस्के यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या बैठकीत दिल्या.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झालीये. मुख्यमंत्र्यांनी देखील नागरिकांना तसं आवाहन केलंय. जर नागरिकांनी काळजी घेतली नाही तर पुन्हा एकदा राज्यात लॉकडाऊन होण्याची शक्यता वर्तवली जातीये. त्यामुळे आता नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे बनलंय.

संबंधित बातम्या :

शिर्डीत कोरोना टास्क फोर्सची मॅरेथॉन बैठक, भाविकांसाठी कडक सूचना

(Shirdi Nagar Panchayat to receive Tax from Pilgrims entering City)

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.