केंद्रीय निवडणूक आयोगातील सुनावणी संपली, शिंदे-ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया काय?

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज दिल्लीत फार महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. विशेष म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगात दोन्ही बाजूने जोरदार युक्तीवाद झाला.

केंद्रीय निवडणूक आयोगातील सुनावणी संपली, शिंदे-ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया काय?
Follow us
| Updated on: Jan 10, 2023 | 6:39 PM

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज दिल्लीत (New Delhi) फार महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. शिवसेनेच्या शिंदे-ठाकरे गटाच्या वादावर आज सकाळी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. ही सुनावणी आता 14 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर आज दुपारनंतर केंद्रीय निवडणूक आयोगात (Election Commission) धनुष्यबाण चिन्हावर तब्बल दोन तास सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान शिंदे गटाने आपली भूमिका मांडली. त्यानंतर पुढच्या आठवड्यात आता ठाकरे गट आपली भूमिका मांडणार आहे. आजच्या सुनावणीदरम्यान ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी मांडलेला युक्तीवाद खोडून काढण्याचा प्रयत्न शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी (Mahesh Jethmalani) यांनी केला. सुनावणी संपल्यानंतर दोन्ही गटाकडून प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देण्यात आली.

ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई (Anil Desai) सुनावणी संपल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर आले. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.

ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया काय?

हे सुद्धा वाचा

“सुनावणी सव्वा चार वाजेच्या सुमापास सुनावणी सुरु झाली. आमचे वकील कपिल सिब्बल यांनी भूमिका मांडली. सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. शिंदे गटाने केलेल्या युक्तीवादात आमदार आणि खासदारांचा बहुमत असल्याचं दावा करण्यात आला. पण निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचं बहुमत म्हणजे आपला पक्ष आणि चिन्हावर दावा सांगण हे लोकशाहीला घातक आहे”, अशी प्रतिक्रिया अनिल देसाई यांनी दिली.

“पुढची सुनावणी निवडणूक आयोग कळवेल. त्यांनी असंख्य मुद्द्यांचा उहापोह केला. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवर ठरवण्यात यावा, असा आग्रह त्यांच्या वकिलांनी केला”, असं अनिल देसाई म्हणाले.

“पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेली ही मंडळी स्वत:चं ठरवतात. पण आम्हाला न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. पुढच्यावेळी आम्ही संपूर्ण बाजू मांडू. कारण पक्षप्रमुखाने तिकीट दिल्यानंतर ते लोकप्रतिनिधी होतात. मूळ पक्ष महत्त्वाचे आहेत आम्ही २० लाखाहून जास्त प्राथमिक सदस्यांचे पत्रकं दिली आहेत. आमच्या प्रतिनिधींचे प्रतिज्ञापत्रक दिले आहेत”, अशी भूमिका अनिल देसाई यांनी मांडली.

शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया काय?

शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी सुनावणीनंतर पहिली प्रतिक्रिया दिली. “आमच्याकडून युक्तीवाद संपलाय. आमच्याकडे बहुमत आहे. त्यामुळे आम्हीच ओरिजनल शिवसेना आहोत. आमच्याकडे संघटनेचं नियंत्रण आहे. २०१८ची घटना फ्रॉड आहे. १९९९ मध्ये बाळासाहेबांनी घटना बनवली. २०१८ मध्ये उद्धव ठाकरेंनी गुप्तपणे घटनात्मक निवडणूका रद्द केल्या. त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज होते. त्यामुळेच हे सगळं घडलंय”, अशी प्रतिक्रिया वकील जेठमलानी यांनी दिली.

“शिवसेनाप्रमुख चुकीचं आहे असं आम्ही बोलत नाही. फक्त पक्षप्रमुखाच्या आदेशाने जी नियुक्ती करण्यात आले ते चुकीचं आहे”, असं जेठमलानी म्हणाले.

शिंदे गटाचे वकील निहार ठाकरे यांनी देखील भूमिका मांडली. “आम्ही आमची बाजू मांडली आहे. आम्ही निवडणूक आयोगाकडे आमचं बहुमत कसंय ते सिद्ध केलंय. संघटनात्मक ताकद आमच्यासोबत कसं आहे ते आम्ही सांगितलीय. पुढच्या आठवड्यात ठाकरे गट त्यांची बाजू मांडेल”, असं निहार ठाकरे यांनी सांगितलं.

“आपण बघितलं तर शिवसेनेची घटना १९९९ मध्ये बदलली होती. त्यामध्ये लोकशाही आणली होती. पण २०१८ मध्ये घटना बदलण्यात आले. सर्व अधिकार बदलण्याच आलं. हे चुकीचं आहे. तेच आम्ही निवडणूक आयोगासमोर ठेवलं. बहुमत शिंदे गटाकडे आहे ते स्पष्ट आहे. ते कुणी नाकारु शकत नाही”, अशी भूमिका निहार ठाकरे यांनी मांडली.

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.