AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेनेचे मुख्यमंत्री झाले राष्ट्रवादीचे गटनेते, विधिमंडळात नेमकं काय घडलं ?

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका भाषणात राष्ट्रपती मुर्मू यांना देशाचे पंतप्रधान केले. त्यामुळे आता माझ्या पक्षाकडे असलेले गटनेता पदही त्यांनी धोक्यात आणले...

शिवसेनेचे मुख्यमंत्री झाले राष्ट्रवादीचे गटनेते, विधिमंडळात नेमकं काय घडलं ?
CM EKNATH SHINDE AND NCP LEADER JAYNAT PATIL Image Credit source: TV9 NETWORK
| Updated on: Mar 13, 2023 | 4:50 PM
Share

मुंबई : निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले. त्यामुळे शिंदे गट यांचा आता अधीकृत शिवसेना पक्ष म्हणून ओळखला जात आहे. असे असताना शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते झाले आहेत. विधानभवनाच्या अधिकाऱ्यांच्या गलथानपणामुळे हा प्रकार घडला आहे. राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी विधानसभेत हा प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चांगलाच टोला लगावला. मुख्यमंत्री शिंदे यांनी काल मोदी पंतप्रधान पद घालवले. आता माझेही गटनेते पदही धोक्यात आणले आहे अशी मिश्किली केली.

राष्ट्रवादीचे विधानसभेचे गटनेते जयंत पाटील यांनी विधानसभेत पॉईंट ऑफ प्रोसीजरचा मुद्दा उपस्थित केला. विधानपरिषदेत राष्ट्रवादीचे गटनेते आणि प्रतोद ही पदे रिक्त आहेत. येथे गटनेते म्हणून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि मुख्य प्रतोद म्हणून अनिकेत तटकरे यांच्या नावांची पत्रे उपसभापती यांना पक्षाच्यावतीने देण्यात आली आहेत. याबाबतचे पत्रच त्यांनी सभागृहात दाखवले.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधान परिषद सभागृहात राष्ट्रवादीचे गटनेते म्हणून एकनाथ खडसे आणि मुख्य प्रतोद म्हणून अनिकेत तटकरे यांच्या नावाचीही घोषणा केली. विधिमंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर अनिकेत तटकरे यांची पक्ष प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली अशी माहिती देण्यात आली. पण, गटनेते म्हणून एकनाथ खडसे यांच्या नावाऐवजी एकनाथ शिंदे यांचे नाव देण्यात आले आहे याकडे त्यांनी विधानसभेचे लक्ष वेधले.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका भाषणात राष्ट्रपती मुर्मू यांना देशाचे पंतप्रधान केले. त्यामुळे आता माझ्या पक्षाकडे असलेले गटनेता पदही त्यांनी धोक्यात आणले अशी मिश्किली त्यांनी केली.

नागालँडमध्ये रीओ हे सर्व पक्षाचा पाठिंबा घेतात. तशीच नवी पद्धत आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुरु केली आहे का? ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधीमंडळ पक्षाचे गटनेते होऊ इच्छित आहेत असे वाटते असा मिश्किल टोला जयंत पाटील यांनी लगावला.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वास्तविक हा विषय विधान परिषदेशी संबधित आहे. मात्र, त्यात विधिमंडळाचा उल्लेख आला आहे त्यामुळे तशी माहिती दिली गेली असेल. मात्र, त्यातील तांत्रिक त्रुटी दूर करून चूक दुरूस्त करण्यात येईल असे सांगितले.

दरम्यान, या घटनेची विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली. विधिमंडळाच्या अधिकाऱ्यांना बोलवून त्यांनी या घटनेबद्दल नाराजी व्यक्त केली. तसेच, अशा प्रकारच्या चुका पुन्हा होऊ नयेत अशा सूचना दिल्या.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.