Shiv Sena Eknath Shinde Candidate List : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कुणाकुणाला संधी?
Shiv Sena Eknath Shinde Candidate List for Maharashtra Assembly Election - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत अनेक विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. शिंदे गटाकडून पहिल्या यादीत 45 जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महायुतीने यासह उमेदवार जाहीर करण्यात आघाडी घेतल्याचं चित्र आहे. लोकसभा निवडणुकीवेळी महायुतीचे काही जागांवरती शेवटपर्यंत उमेदवार ठरले नव्हते. त्यामुळे त्याचा मोठा फटका महायुतीला बसला होता. त्याच चुकीतून सावरुन महायुतीने जागावाटपाचा निर्णय घेत उमेदवारही निश्चित केले आहेत. महायुतीच्या नेत्यांमध्ये अजूनही चर्चा सुरु आहे. असं असलं तरी तीनही पक्षांकडून उमेदवारांची घोषणा करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडूनही उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. अखेर शिवसेनेकडे उमेदवारांची पहिली यादी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. तसेच उर्वरीत उमेदवारांची यादी देखील लवकरच जाहीर होणार आहे.
जोगेश्वरी पूर्वेतून सौ वायकरांना उमेदवारी
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून विद्यमान खासदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनिषा वायकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वायकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाची साथ करत शिंदेंसोबत येण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ते खासदार म्हणून जिंकूनही आले. त्यांनतर आता रवींद्र वायकर यांच्या पत्नीही निवडणुकीच्या रिंगणार पाहायला मिळणार आहेत.
पहिल्या यादीत मुंबईतून 6 जणांना संधी
शिंदेंच्या शिवसेनेकडून मुंबईतून 6 जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या 6 जणांमध्ये 2 महिला उमेदवार आहेत. मनीषा वायकर, दिलीप लांडे (चांदीवली), प्रकाश सुर्वे (मागाठाणे), मंगेश कुडाळकर (कुर्ला), सदा सरवणकर (माहिम) आणि यामनी जाधव (भायखळा) यांचा समावेश आहे.
शिंदेची पहिली यादी जाहीर, कुणाला संधी?
जय महाराष्ट्र
हिंदुहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि वंदनीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक – २०२४ साठी शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे. सर्व उमेदवारांना विजयी शुभेच्छा.@Shivsenaofc… pic.twitter.com/0rBkOkMTMU
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 22, 2024
माहिममध्ये अमित ठाकरे विरूद्ध सदा सरवणकर सामना
दरम्यान माहिममध्ये आता सदा सरवणकर विरुद्ध मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे अशी थेट लढत होणार आहे. शिंदेंच्या शिवसेनेआधी महाराष्ट्र नवनिर्माणे सेनेनेही 45 जणांची यादी जाहीर केलीय.