शिवसेनेकडून संजय राऊत आणि संजय पवार यांचा राज्यसभा निवडणुकांसाठी अर्ज दाखल, मुख्यमंत्री आणि शरद पवारांची उपस्थिती, मविआचे शक्तिप्रदर्शन

एकीकडे परिवहनमंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानासह सात ठिकाणी ईडीची छापेमारी सुरु असतानाच, दुसरीकडे शिवसेनेकडून राज्यसभेच्या दोन जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेत. यावेळी महाविकास आघाडीच्या वतीने जोरदार शक्तिप्रदर्शनही करण्यात आले.

शिवसेनेकडून संजय राऊत आणि संजय पवार यांचा राज्यसभा निवडणुकांसाठी अर्ज दाखल, मुख्यमंत्री आणि शरद पवारांची उपस्थिती, मविआचे शक्तिप्रदर्शन
sanjay raut and Sanjay pawar nominationsImage Credit source: TV 9 marathi
Follow us
| Updated on: May 26, 2022 | 1:51 PM

मुंबई – राज्यसभा निवडणुकांसाठीच्या राज्यातील सहा जागांसाठीच्या राजकीय नाट्यानंतर, अखेरीस शिवसेनेकडून आज संजय राऊत आणि संजय पवार या दोघांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह निम्मे मंत्रिमंडळ यासाठी आज विधीमंडळात दाखल झाले होते. एकीकडे परिवहनमंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानासह सात ठिकाणी ईडीची छापेमारी सुरु असतानाच, दुसरीकडे शिवसेनेकडून राज्यसभेच्या दोन जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेत. यावेळी महाविकास आघाडीच्या वतीने जोरदार शक्तिप्रदर्शनही करण्यात आले. ३० मे ही उमेदवारी अर्ज भरण्याची अखेरची तारीख असून, १० जून रोजी ही निवडणूक होणार आहे.

कोण आहेत संजय पवार

शिवसेनेचे पहिले उमेदवार राज्यसभेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांचा परिचय सर्वांना आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे शिल्पकार अशीही त्यांची ओळख आहे. दुसरे उमेदवार संजय पवार हे कोल्हापूरचे कट्टर शिवसैनिक आहेत. १९८९ साली ३३ वर्षांपूर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सध्या त्यांच्याकडे शिवसेना जिल्हाप्रमुख अशी जबाबदारी आहे. तीनदा ते कोल्हापूर महापालिकेत नगसवेक म्हणून निवडून आलेले आहेत. महापालिकेत विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारीही त्यांनी निभावलेली आहे. कोल्हापुरातील प्रश्नांची जाण असणारा, लढावू कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे.

शिवसेनेला दोन जागा निवडून आणण्याचा विश्वास

राज्यातील सहा राज्यसभा जागांसाठी या निवडणुका होणार आहेत. यापूर्वी २०१६ साली संख्याबळावर शिवसेनेकडून संजय राऊत, काँग्रेसकडून पी चिदम्बरम, राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल तर भाजपाकडून विकास महात्मे, विनय सहस्रबुद्धे आणि पियुष गोयल हे तिघे असे सहा जण निवडून आले होते. यावेळी मात्र संख्याबळानुसार भाजपाचे दोनच खासदार निवडून येऊ शकतील. तर महाविकास आघाडीकडे या जागेसाठी ४१ असे मतांचे गणित असल्याने सहावा उमेदवार नेमका कुणाचा निवडून येणार, यासाठी राजकीय चुरस आहे. भाजपाकडे या जागेसाठी अपक्षांसह २७ मते आहेत. त्यामुळे सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडीचा दावा प्रबळ मानण्यात येतो आहे. संजय राऊत यांनीही सहावा राज्यसभा खासदार हा शिवसेनेचाच असेल असे स्पष्ट केले आहे.

हे सुद्धा वाचा

छत्रपती संभाजीराजेंनी ऑफर नाकारली

त्यापूर्वी या निवडणुकीत सहाव्या जागेसाठी अपक्ष उमेदवारी छत्रपती संभाजीराजे यांनी घोषित केली होती. मात्र त्यांनी शिवसेनेत प्रवेश करावा, मगच त्यांना सहाव्या जागेसाठी उमेदवारी देूऊ, अशी आग्रही भूमिका शिवसेनेने घेतली होती. मुख्यमंत्र्यांनी शिवबंधन बांधण्यास यावे, असा निरोपही संभाजीराजेंना पाठवला होता. मात्र कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश न करण्याची भूमिका घेतलेल्या संभाजीराजे यांनी शिवसेनेची ही ऑफर नाकारली आहे. त्यामुळे आता संभाजीराजेंना महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. भाजापानेही अद्याप उमेदवार घोषित केलेले नाहीत. त्यामुळे छत्रपती निवडणुकीतून माघार घेणार अशीही चर्चा आहे.

राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल यांना पुन्हा संधी

तर राष्ट्रवादी काँग्रेसने यंदाच्या राज्यसभेसाठी पुन्हा एकदा प्रफुल्ल पटेल यांना संधी दिली आहे. दिल्लीच्या राजकारणात प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीचा चेहरा आहेत. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा राज्यसभेची संधी दिल्याचे सांगण्यात येते आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.