Shiv Sena| शिवसेना अजून यूपीएचा भाग नाही, मिनी UPA चा प्रयोग सुरू; संजय राऊत यांचे वक्तव्य

येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत खरेच शिवसेना यूपीएमध्ये सहभागी होणार का, या चर्चेमध्ये पुन्हा एकदा रंगात आली आहे.

Shiv Sena| शिवसेना अजून यूपीएचा भाग नाही, मिनी UPA चा प्रयोग सुरू; संजय राऊत यांचे वक्तव्य
संजय राऊत.
Follow us
| Updated on: Dec 15, 2021 | 10:00 AM

नवी दिल्लीः शिवसेना (Shiv Sena) अजून यूपीएचा (UPA) भाग नाही. मात्र, सध्या मिनी यूपीएचा प्रयोग सुरू आहे. काही सकारात्मक चर्चा झाल्या आहेत. आता पुन्हा एक बैठक होणार आहे, अशी माहिती बुधवारी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नवी दिल्लीमध्ये दिली. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत खरेच शिवसेना यूपीएमध्ये सहभागी होणार का, या चर्चेमध्ये पुन्हा एकदा रंगात आली आहे.

एकत्रित काम सुरू

शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, सोनिया यांच्या घरी काल बैठक झाली. यावेळी प्रमुख विरोधी नेते होते. यावेळी सध्याची राजकीय परिस्थिती, भविष्यात असलेल्या 5 राज्यांच्या निवडणुका यावर प्राथमिक चर्चा झाली. काहीही निर्णय झाला नाही. सोनियांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला. काही सकारात्मक चर्चा झाल्या. आता पुन्हा एक बैठक होणार आहे. ममता यांच्याबाबत थोडीफार चर्चा झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 2024 टार्गेट असेल तर मतभेद का, यावर ते म्हणाले की, आम्ही अजून यूपीएचा भाग नाही. एकत्रित काम करतोय. हा मिनी UPA चा प्रयोग असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यसभेत चर्चा होऊ दिली जात नाही

संजय राऊत म्हणाले की, देशाची जनता सध्या महागाईच्या वणव्यामध्ये होरपळत आहे. मात्र, यावर राज्यसभेत चर्चा होऊ दिली जात नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. यावर संसदेत आज वादळी चर्चा होईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. सोबतच चंद्रकांत पाटील काय म्हणतात त्यावर भूमिका ठरत नाही, असा टोलाही त्यांनी हाणला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल हिंदू व्होट बँकेवरून विधान केले होते. या वक्तव्याचाही त्यांनी यावेळी समाचार घेतला.

इतिहासाची पाने चाळा

संजय राऊत म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे आणि सावरकर यांनी हिंदुत्व रुजवले. बाळासाहेब एकमेव नेते होते. त्यांनी करून दाखवले. देशात हिंदू व्होट बँक आहे हा विचार पहिल्यांदा बाळासाहेब ठाकरे यांनी मांडला. बाकी सगळे पळून गेले. आमचे हिंदुत्व पळपुटे नाही. आमचे हिंदुत्व राजकारण, निवडणूक यासाठी नाही. कुणी व्याख्या बदलली असेल, पण बाळासाहेब यांचे नाव अढळ आहे. त्यांनी इतिहासाची पाने चाळली पाहिजेत, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

शिवसेना अजून यूपीएचा भाग नाही. मात्र, सध्या मिनी यूपीएचा प्रयोग सुरू आहे. काही सकारात्मक चर्चा झाल्या आहेत. आता पुन्हा एक बैठक होणार आहे. भविष्यात असलेल्या 5 राज्यांच्या निवडणुका यावर प्राथमिक चर्चा झाली. काहीही निर्णय झाला नाही. – संजय राऊत, शिवसेना नेते

इतर बातम्याः

OBC Reservation: महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार की नाही? आज सुप्रीम कोर्टात अंतिम निकालाची शक्यता

SBI PO Prelims Result 2021 : स्टेट बँक प्रोबेशनरी ऑफिसर पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर, असा पाहा निकाल

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.