AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तुमचाही संतोष देशमुख करु’, तानाजी सावंत यांच्या 2 पुतण्यांना जीवे मारण्याची धमकी

शिवसेना नेते तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तुमचा देखील संतोष देशमुख करु, अशी धमकी अज्ञात आरोपींनी पत्राच्या माध्यातून दिली आहे. संबंधित धमकीचं वृत्त समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

'तुमचाही संतोष देशमुख करु', तानाजी सावंत यांच्या 2 पुतण्यांना जीवे मारण्याची धमकी
तानाजी सावंत
Follow us
| Updated on: Dec 24, 2024 | 5:24 PM

महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेवर वारंवार प्रश्न उपस्थित होत आहेत. बीडच्या केज तालुक्यात मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं आधी अपहरण केलं. त्यानंतर अतिशय निर्घृणपणे त्यांची हत्या केली. त्याआधी पुण्यात विधान परिषदेचे भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची देखील अपहरण करुन निर्घृण हत्या करण्यात आली. कल्याणमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते हेमंत परांजपे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. तर दोन महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटना एकापोठापाठ घडताना दिसत आहेत. या घटनांना कोणताही लगाम लागताना दिसत नाही. याउलट गुन्हेगारांची हिंमत वाढताना दिसत आहे. कारण या घटनांमुळे पोलिसांचे भय न राहिल्याने आता गुन्हेगारांनी मोठमोठ्या नेत्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना टार्गेट करायला सुरुवात केल्याचं दिसत आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या 2 पुतण्यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. तुमचादेखील संतोष देशमुख करु, अशी धमकी हल्लोखारांनी पत्रातून दिली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं प्रकरण काय?

आमदार तानाजी सावंत यांच्या 2 पुतण्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. धनंजय सावंत आणि केशव सावंत यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. तुमचाही संतोष देशमुख केला जाईल, अशी धमकी पत्रातून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे यापूर्वी धनंजय सावंत यांच्या घरासमोर गोळीबाराची घटना घडली होती. अज्ञात व्यक्तींकडून ही धमकी देण्यात आली आहे. तुमचा संतोष देशमुख मस्साजोग करु, असं अज्ञातांनी शंभरच्या नोटेसह धमकीचं पत्र दिलं आहे. या धमकीनंतर धनंजय सावंत आणि केशव सावंत यांनी ढोकी पोलीस ठाण्यात तक्रार केली.

आरोपींनी धमकीचं पत्र कसं दिलं?

विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीआधी धनंजय सावंत यांच्या घरावर गोळीबार झाला होता. धनंजय सावंत हे धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आहेत. धनंजय सावंतांचा सोनारी येथे भैरवनाथ साखर कारखाना आहे. केशव सावंत हे तेरणा कारखान्याचे कार्यकारी संचालक आहेत. कारखान्याकडे जाणारा ट्रॅक्टर अडवत अज्ञात दोघांनी चालकाला बंद पाकिट दिलं. त्या बंद पाकिटात जीवे मारण्याचे धमकीचे पत्र होते.

हे सुद्धा वाचा

धनंजय सावंत यांचे पोलिसांवर गंभीर आरोप

धमकी आणि गोळीबार प्रकरणी तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांनी पोलीस विभागावर गंभीर आरोप केले आहेत. आमच्या जीवाला धोका निर्माण झाल्यावरच पोलीस डिपार्टमेंट याचा शोध घेणार का? असा सवाल धनंजय सावंत यांनी धाराशिव पोलिसांना केला आहे. या प्रकरणी धनंजय सावंत थेट राज्याच्या गृहमंत्र्यांकडे तक्रार करणार आहेत. दरम्यान, माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या घरावर काही दिवसापूर्वी करण्यात आलेला गोळीबार आणि आता देण्यात आलेली धमकी या प्रकरणी धाराशिव जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.

उद्या भूम शहर बंद ठेवण्याचा इशारा

धनंजय सावंत आणि केशव सावंत यांना देण्यात आलेल्या धमकी प्रकरणी धाराशिव जिल्ह्यात त्याचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ उद्या तानाजी सावंत यांच्या मतदारसंघातील भूम शहर बंद ठेवण्याचा इशारा सावंत समर्थकांनी दिला आहे. या घटनेचा तपास लवकर व्हावा यासाठी धाराशिवमध्ये शिवसेनेकांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात आले आहे

'त्यानं जीवाची बाजी लावली अन्', भाजप नेत्याची नजाकत भाईंसाठी खास पोस्ट
'त्यानं जीवाची बाजी लावली अन्', भाजप नेत्याची नजाकत भाईंसाठी खास पोस्ट.
उधमपूरमध्ये दहशतवाद्यांशी चकमक; अली शेख यांना वीरमरण
उधमपूरमध्ये दहशतवाद्यांशी चकमक; अली शेख यांना वीरमरण.
'उर्दूही पहिलीपासून शिकवली पाहिजे', शिंदेंच्या नेत्यानं काय म्हटलं?
'उर्दूही पहिलीपासून शिकवली पाहिजे', शिंदेंच्या नेत्यानं काय म्हटलं?.
खळबळजनक! मालेगावमध्ये 9 ठिकाणी ईडीचे छापे
खळबळजनक! मालेगावमध्ये 9 ठिकाणी ईडीचे छापे.
पहलगाममध्ये गोळ्या झाडल्या तिथे 25-30 सिलेंडर? अतिरेक्यांचा मोठा डाव?
पहलगाममध्ये गोळ्या झाडल्या तिथे 25-30 सिलेंडर? अतिरेक्यांचा मोठा डाव?.
पाणी थांबवाल तर श्वास थांबवू म्हणणारा दहशतवादी हाफिज सईद घाबरला
पाणी थांबवाल तर श्वास थांबवू म्हणणारा दहशतवादी हाफिज सईद घाबरला.
पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलाची मोठी कारवाई
पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलाची मोठी कारवाई.
पहलगामचं 'मिनी स्वित्झर्लंड' ओळख अन् तिथच अतिरेक्यांनी झाडल्या गोळ्या
पहलगामचं 'मिनी स्वित्झर्लंड' ओळख अन् तिथच अतिरेक्यांनी झाडल्या गोळ्या.
आता फक्त आठवणी अन् स्मशान शांतता; बैसरनमधून टीव्ही9चा ग्राऊंड रिपोर्ट
आता फक्त आठवणी अन् स्मशान शांतता; बैसरनमधून टीव्ही9चा ग्राऊंड रिपोर्ट.
बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट
बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट.