हर्षवर्धन पाटील आणि संजय राऊतांची गळाभेट, अनेकांच्या भुवया उंचावल्या; पाटील म्हणाले…

संजय राऊत हे आपले जुने मित्र आहेत. आपल्याकडे पाहुणे आल्यावर आपण त्यांचे स्वागत करतो. आपल्याकडे गळाभेटीची पद्धत आहे. | Harshvardhan Patil

हर्षवर्धन पाटील आणि संजय राऊतांची गळाभेट, अनेकांच्या भुवया उंचावल्या; पाटील म्हणाले...
संजय राऊत हे आपले जुने मित्र आहेत. आपल्याकडे पाहुणे आल्यावर आपण त्यांचे स्वागत करतो. आपल्याकडे गळाभेटीची पद्धत आहे,
Follow us
| Updated on: Feb 21, 2021 | 3:59 PM

इंदापूर: शिवसेना खासदार संजय राऊत हे रविवारी इंदापुरात एका खासगी कार्यक्रमासाठी गेले होते. या कार्यक्रमात संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshavardhan Patil) यांची गळाभेट घेतली. या भेटीची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरु आहे. (Sanjay Raut hugs Harshvardhan patil in Indapur)

इंदापूर तालुक्यातील अकोले येथे एका वास्तुशांतीच्या कार्यक्रमासाठी संजय राऊत यांनी हजेरी लावली होती. याठिकाणी भाजपचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हेदेखील उपस्थित होते. संजय राऊत येताच हर्षवर्धन पाटील यांची त्यांची गळाभेट घेतली. संजय राऊत हे आपले जुने मित्र आहेत. आपल्याकडे पाहुणे आल्यावर आपण त्यांचे स्वागत करतो. आपल्याकडे गळाभेटीची पद्धत आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

‘ती’ काही शिवाजी महाराज आणि अफझलखानाची गळाभेट नव्हती: संजय राऊत

काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत हिच्या साखरपुड्याला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी संजय राऊत यांनी समारंभाच्या व्यासपीठावर देवेंद्र फडणवीस यांची गळाभेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या होत्या.

या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांकडून संजय राऊत यांनी विचारणा करण्यात आली. तेव्हा संजय राऊत यांनी म्हटले की, महाराष्ट्रात कोणी एकमेकांची गळाभेट घेत नाही का? मी फडणवीसांची गळाभेट घेतली. ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखानाची गळाभेट नव्हे. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विचारधारेचे राजकीय नेते एकमेकांच्या घरी अशा समारंभांसाठी जात असतात. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याच्या अनावरणावेळीही सर्व राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते. त्यामुळेच महाराष्ट्र हे संस्कृती आणि परंपरा असणारे राज्य म्हणून ओळखले जाते, असे संजय राऊत यांनी म्हटले होते.

मंत्रिपद हे फक्त नाचण्यासाठी नसते; हर्षवर्धन पाटलांचा भरणेंना टोला

हर्षवर्धन पाटील यांनी रविवारी इंदापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्तात्रय भरणे यांच्यावर टीकास्त्र सोडले. मंत्रिपद हे फक्त नाचण्यासाठी नसते, लोकांची कामे करण्यासाठी असते, असा शब्दांत भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan patil ) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांच्यावर निशाणा साधला.

आम्ही बघतोय किती कामं होत आहेत. 14 कोटी जनतेपैकी 40 ते 42 लोकांना मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळते. त्याचा उपयोग लोकांच्या हितासाठी करायचा असतो. दुर्दैवाने सध्याच्या सरकारमध्ये तशी लोकं दिसत नाहीत, अशी टीका हर्षवर्धन पाटील यांनी केली

संबंधित बातम्या:

मंत्रिपद हे फक्त नाचण्यासाठी नसते; हर्षवर्धन पाटलांचा भरणेंना टोला

(Sanjay Raut hugs Harshvardhan patil in Indapur)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.