एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री का व्हावेत? शिवसेनेने सांगितले ‘हे’ 6 प्रमुख कारणं

एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचा गटनेता आणि अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा गटनेता असं त्या त्या पक्षाच्या आमदारांनी सर्वानमुते ठरवलं आहे. पण भाजपमध्ये तशा घडामोडी नाहीत. या सगळ्या घडामोडींदरम्यान, आता शिवसेनेच्या नेत्यांकडून एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, अशी मागणी केली जात आहे.

एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री का व्हावेत? शिवसेनेने सांगितले 'हे' 6 प्रमुख कारणं
एकनाथ शिंदे
Follow us
| Updated on: Nov 25, 2024 | 9:22 PM

विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून आता मुख्यमंत्रीपदाबाबतचा सस्पेन्स वाढला आहे. राज्याच्या जनतेने महायुतीला सर्वाधिक पसंती देत 230 जागांवर निवडून दिलं आहे. यामुळे महाराष्ट्रात महायुतीचंच सरकार येईल, हे निश्चित आहे. पण राज्याचा मुख्यमंत्री कोण होईल? याबाबतचा सस्पेन्स अजून थांबलेला नाही. महायुतीने एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वात निवडणूक लढवली. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल? याचा गाजावाजा महायुतीकडून केला गेला नाही. आता महायुतीच जिंकून आली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्रीपदावर राहतील की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बढती होऊन ते मुख्यमंत्री पदावर विराजमान होतील? असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गटनेता देखील ठरवण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचा गटनेता आणि अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा गटनेता असं त्या त्या पक्षाच्या आमदारांनी सर्वानमुते ठरवलं आहे. पण भाजपमध्ये तशा घडामोडी नाहीत. या सगळ्या घडामोडींदरम्यान, आता शिवसेनेच्या नेत्यांकडून एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, अशी मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे शिवसेनेमधील काही सूत्रांनी एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री का व्हावेत? यासाठी 6 मोठी कारणं दिली आहेत.

शिवसेनेनुसार शिंदेंना मुख्यमंत्री का करावं? ‘ही’ 6 प्रमुख कारणं

  • 1) एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले नाहीत तर ठाकरे गटाला देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधायला सोपी संधी मिळेल. भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत येण्यासाठी शिवसेनेचं नाव आणि चिन्हाचा वापर केला आणि सत्ता येताच शिंदेंच्या शिवसेनेला बाजूला केलं, असा आरोप ठाकरे गटाकडून केला जाऊ शकतो. ठाकरे गट आणि महाविकास आघाडी महायुतीच्या प्रत्येक निर्णयाला विरोध करत महाराष्ट्र विरुद्ध भाजप असा संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न करतील, असं शिंदे गटाला वाटत असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.
  • 2) एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करुन महायुती मराठी अस्मितेचा मुद्दा मजबूत करु शकते. हा निर्णय भाजपची उदारता किंवा दिलदारपणा आणि मराठी अस्मितेचा सन्मान करण्यास प्रतिबद्ध असल्याचं दाखवेल, असा दावा शिंदे गटाकडून करण्यात आल्याचा सूत्रांचा दावा आहे.
  • 3) एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने सुरु केलेल्या कल्याणकारी योजनांमुळे देखील महायुतीला राज्यात बहुमत मिळालं आहे. त्यामुळे शिंदे मुख्यमंत्री राहिल्यास महायुतीत सुशासनाची छवी आणखी मजबूत होईल आणि योजनांचा प्रभाव आणखी प्रभावीपणे पडेल.
  • 4) एकनाथ शिंदे हे मराठा समाजाचे आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात निवडणूक लढत असताना त्यांनी मराठा समाजाचा विश्वास संपादन करण्यात यश मिळवलं. एक मराठा नेता मुख्यमंत्री राहिल्यास जातीवाद करणाऱ्यांना थारा राहणार नाही. कारण शिंदे यांनी ओबीसा समाजाला ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं आहे.
  • 5) आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. पुढच्या दोन-तीन वर्षात संपूर्ण राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडतील. सरकारचा चेहरा बदलल्यास पुन्हा एकदा आधीच्या नेतृत्वासोबत तुलना केली जाईल. त्यामुळे सध्या ज्यामुळे निवडणूक जिंकली आहे तो झोन त्यावेळी कायम राहणार नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदावर कायम राहिले तर तो झोन कायम सुरुही राहील. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला फायदा होईल.
  • 6) निवडणुकीच्या प्रत्येक सर्व्हेतून एक गोष्ट स्पष्ट झाली की, एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे सर्वात लोकप्रिय चेहरा राहीले. सर्व जाती-धर्माच्या नागरिकांसोबत एकनाथ शिंदे यांचा सलोखा राहिला. त्यांनी एकनाथ शिंदे यांचा सन्मानच केला. त्यामुळे युतीचा कार्यकाळ हा चांगला ठरला आणि पुन्हा महायुतीला जनतेने पुन्हा ऐतिहासिक बहुमत देत निवडून आणलं. एकनाथ शिंदे यांनी महायुतीलमधील तीनही घटक पक्षांना मॅनेज करुन त्यांच्या नेतृत्व कौशल्याचा गुण दाखवून दिला.
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.