‘भाजपात एकही लाडकी बहीण त्या पदासाठी योग्य नाही का?’, सुषमा अंधारेंनी पुन्हा डिवचलं

राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळून देखील अद्याप नव्या मुख्यमंत्र्यांची घोषणा झालेली नाहीये, यावरून सुषमा अंधारे यांनी खोचक टोला लगावला आहे.

'भाजपात एकही लाडकी बहीण त्या पदासाठी योग्य नाही का?', सुषमा अंधारेंनी पुन्हा डिवचलं
सुषमा अंधारे
Follow us
| Updated on: Nov 29, 2024 | 5:33 PM

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक नुकतीच पार पडली. गेल्या आठवड्यात या निवडणुकीचा निकाल लागला. या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. महाविकास आघाडीचे तीन प्रमुख घटक पक्ष मिळून राज्यात केवळ 50 जागाच जिंकता आल्या. शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला वीस जागा, काँग्रेस 16 तर सर्वात कमी जागा या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या निवडून आल्या.राष्ट्रवादी शरद पवार गटाला केवळ दहा जागांवर समाधान मानावं लागलं. मात्र दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अपयशातून सावरत महायुतीनं राज्यात जोरदार मुसंडी मारली. भाजप 132 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला, शिवसेना शिंदे गटाला 57 जागा मिळाल्या तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार 41जागांवर विजयी झाले.

मात्र स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर देखील अजूनही महायुतीकडून नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाहीये.समोर आलेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीमध्ये सर्वात आघाडीवर आहे. मात्र अद्याप अधिकृत घोषणा बाकी आहे. यावरून आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा महायुती आणि शिवसेना शिंदे गटाला डिवचलं आहे.

नेमकं काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

विजयाची खात्री नसलेल्या शिंदे गटाच्या वाचाळ प्रवक्त्यानं म्हटलं होतं की जर 48 तासात सरकार स्थापन नाही झालं तर 26 नोव्हेंबरला राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल.आता 5 डिसेंबरला शपथविधी आहे.एकीकडे काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. 5 तारखेपर्यंत हे राज्य कोणाच्या भरवशावर चालणार आहे, असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला आहे. दरम्यान पुढे बोलताना त्यांनी भाजपला देखील टोला लगावला आहे.लाडक्या बहि‍णींना सत्तेत वाटा मिळणार आहे की नाही? भारतीय जनता पार्टीमध्ये एकही महिला मुख्यमंत्रिपदासाठी योग्य नाही का? असा सवाल यावेळी सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान दुसरीकडे सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे हे गृहमंत्रिपदावर अडून बसले आहेत. जर गृहमंत्रिपद मिळालं तरच ते उपमुख्यमंत्रिपद स्विकारणार आहेत. अन्यथा शिवसेनेच्या एखाद्या ज्येष्ठ नेत्याला उपमुख्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.

'काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, हे राज्य कोणाच्या भरवशावर?'
'काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, हे राज्य कोणाच्या भरवशावर?'.
मोठी बातमी, ... तरच उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार, एकनाथ शिंदे अडून बसले
मोठी बातमी, ... तरच उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार, एकनाथ शिंदे अडून बसले.
... अशी होणार मुख्यमंत्र्यांच्या नवाची घोषणा, शपथविधीचा मुहूर्त ठरलं!
... अशी होणार मुख्यमंत्र्यांच्या नवाची घोषणा, शपथविधीचा मुहूर्त ठरलं!.
'ते' पुन्हा येणार! नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच मुहूर्त-ठिकाण ठरल
'ते' पुन्हा येणार! नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच मुहूर्त-ठिकाण ठरल.
गोंदियात 'शिवशाही'चा भीषण अपघात, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
गोंदियात 'शिवशाही'चा भीषण अपघात, मृतांचा आकडा वाढण्याची भीती.
'... त्यांना सत्तेत ठेवले हेच मोठं',बच्चू कडू यांचा नेमका कोणाला टोला?
'... त्यांना सत्तेत ठेवले हेच मोठं',बच्चू कडू यांचा नेमका कोणाला टोला?.
भाजपचं पारडं जडच...फडणवीस CM, मुख्यमंत्रिपदासह 'ही' मोठी खाती BJP कडे?
भाजपचं पारडं जडच...फडणवीस CM, मुख्यमंत्रिपदासह 'ही' मोठी खाती BJP कडे?.
मागणी केलेल्या खात्यांपैकी कोणती खाती शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार?
मागणी केलेल्या खात्यांपैकी कोणती खाती शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार?.
नव्या सरकारमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या पारड्यात कोणती खाती?
नव्या सरकारमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या पारड्यात कोणती खाती?.
मतांचा टक्का वाढला, विरोधकांच्या आरोपांवर काय म्हणाले निवडणूक अधिकारी?
मतांचा टक्का वाढला, विरोधकांच्या आरोपांवर काय म्हणाले निवडणूक अधिकारी?.