शिवसेना नेते भास्कर जाधवांच्या राष्ट्रवादीमध्ये असलेल्या पुत्राला आमदारकीचे वेध; गुहागरमधून लढण्यास तयार
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर मतदार संघ अतिशय महत्त्वाची जागा आहे. येथे 2019 मध्ये शिवसेनेकडून भास्कर जाधव विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहेदव देवजी बेटकर यांना 26451 मतांनी हरवले होते. विशेष म्हणजे गुहागरचा लोकसभा मतदार संघ रायगड आहे. येथे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे खासदार आहेत. त्यांनी यापूर्वीच्या निवडणुकीत शिवसेना नेते अनंत गिते यांचा 31438 मतांनी पराभव केला आहे.
रत्नागिरीः शिवसेनेचे (Shivsena) दबंग नेते, आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांचे पुत्र आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) असलेले विक्रांत जाधव यांना आता आमदारकीचे वेध लागले आहेत. संधी मिळाल्यास आपण गुहागर मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्याचे सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे. त्यामुळे विधानसभा दूर असतानाही अनेकांनी आत्तापासूनच त्याची पायाभरणी करायला सुरुवात केलीय. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर मतदार संघ अतिशय महत्त्वाची जागा आहे. येथे 2019 मध्ये शिवसेनेकडून भास्कर जाधव विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहेदव देवजी बेटकर यांना 26451 मतांनी हरवले होते. विशेष म्हणजे गुहागरचा लोकसभा मतदार संघ रायगड आहे. येथे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे खासदार आहेत. त्यांनी यापूर्वीच्या निवडणुकीत शिवसेना नेते अनंत गिते यांचा 31438 मतांनी पराभव केला आहे. मात्र, आता विक्रांत जाधव यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिकीट हवे आहे की, शिवसेनेकडून याचे सुतोवाच त्यांनी काही केले नाही. सध्या हे दोन्ही पक्ष महाविकास आघाडीत आहेत. त्यामुळे तिकीट देताना पक्ष नेतृत्वाची चांगलीच तारांबळ उडणार आहे.
काय म्हणतात विक्रांत…
विक्रांत जाधव म्हणाले की, गुहागर मतदार संघातून निवडणूक लढवणार आहे. भास्कर जाधवांचे राजकीय वारसदार आणि लोकप्रतिनिघी म्हणून मी नक्कीच चांगले काम करेन. मला वडिलांकडून जनसेवेचा वारसा मिळाला आहे. आता तो वारसा पुढे चालवण्याची इच्छाही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. विक्रांत जाधव हे रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. या जिल्हा परिषदेची मुदत नुकतीच संपलीय. त्यानंतर त्यांनी आमदारकी लढवण्याचे संकेत दिलेत. मात्र, याबाबत वरिष्ठ निर्णय घेतील, असे वक्तव्य केले आहे.
अन् मार्ग झाला सुकर…
विक्रांत जाधव हे रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अंजनवेल (गुहागर) गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. भास्कर जाधव शिवसेनेत गेले. मात्र, त्यांचे पुत्र विक्रांत हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहिले. या ठिकाणी भास्कर जाधव यांचे बंधू बाळ जाधव यांचे पुत्र बाळाशेठ जाधवसुद्धा शिवसेनेकडून जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या शर्यतीत होते. मात्र, मंत्रिपद न मिळाल्यामुळे भास्कर जाधव हे नाराज होते. त्यांची ही नाराजी दूर करण्यासाठीच विक्रांत जाधव यांच्या झेडपी अध्यक्षपदाचा मार्ग सुकर करण्यात आला होता. आता तेच तिकिटाबाबत होईल का, हे काळच सांगेल.
इतर बातम्याः