एकनाथ शिंदे अखेर ग्रॅज्युएट; पदवी परीक्षेत 77.25 टक्के गुण

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनीही वयाच्या 56 व्या वर्षी पदवी परीक्षा पास होऊन शिक्षणाला वयाची अट नसते हे दाखवून दिले आहे. शिंदे यांनी पदवी परीक्षेत 77.25 टक्के गुण घेऊन घवघवीत यश मिळविले आहे. (shivsena leader eknath shinde passed BA final year exam from ycmou)

एकनाथ शिंदे अखेर ग्रॅज्युएट; पदवी परीक्षेत 77.25 टक्के गुण
eknath shinde
Follow us
| Updated on: Nov 17, 2020 | 5:17 PM

मुंबई: शिक्षणासाठी वयाची अट नसते हे आपण नेहमीच अनुभवत आलो आहोत. वयाची शंभरी गाठल्यानंतरही अनेकांनी महाविद्यालयीन परीक्षा पास केल्याची उदाहरणेही आपण ऐकून आहोत. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनीही वयाच्या 56 व्या वर्षी पदवी परीक्षा पास होऊन शिक्षणाला वयाची अट नसते हे दाखवून दिले आहे. शिंदे यांनी पदवी परीक्षेत 77.25 टक्के गुण घेऊन घवघवीत यश मिळविले आहे. (shivsena leader eknath shinde passed BA final year exam from ycmou)

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षाचा निकाल जाहीर झाला आहे. त्यात ठाण्यातील ज्ञानसाधना महाविद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला आहे. शिंदे यांनी ज्ञानसाधना महाविद्यालयातून पदवीची परीक्षा दिली होती. या परीक्षेत 77.25 टक्के गुण मिळवून ते उत्तीर्ण झाले आहेत. वयाच्या 56व्या वर्षी पदवीधर होणारे ते राज्यातील बहुदा पहिलेच मंत्री असण्याची शक्यता आहे.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त शिवाजी पार्क येथे आले असता शिंदे यांनीच ते पास झाल्याची माहिती दिली. सगळ्यांनाच आपल्या मनासारखं शिक्षण घेता येत नाही. श्रीकांत डॉक्टर झाले. पण माझं शिक्षण अर्धवट राहिलेलं होतं. मनात शिक्षणाची जिद्द होती. तळमळ होती. शिक्षणाचे महत्त्व काय आहे हे आपल्याला माहीतच आहे. त्यामुळे पदवीधर व्हायचंच अशी मनाशी खुणगाठ बांधली आणि जसा जसा वेळ मिळाला तशा परीक्षा दिल्या आणि आज बीए पास झालो, असं शिंदे म्हणाले.

बाळासाहेबांचे भव्यदिव्य स्मारक उभारणार

यावेळी त्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या आठवणी जागवल्या. बाळासाहेब ठाकरे सर्वांचे होते. त्यांनी सर्वांवर प्रेम केलं. महाराष्ट्रात मराठी माणूस आणि देशात हिंदू माणसाला ताठ मानेने जगण्याची संधी बाळासाहेबांनी दिली. आमच्या सारख्या सामान्य माणसालाही त्यांनी मोठ्या जबाबदाऱ्या देऊन आकार दिला. हे बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळेच आम्ही घडलो. बाळासाहेबांच्या कुंचल्यातून, व्यंगचित्रांमधून शिवसेना उभी राहिली आहे. बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे विराजमान झाले आहेत, असं ते म्हणाले.

बाळासाहेबांच राष्ट्रीय स्मारक भव्यदिव्य व्हावं, अशी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची, शिवसैनिकांची भावना आहे . आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि मी एमएमआरडीएचा मंत्री आहे. त्यामुळे स्मारक भव्यदिव्य होणार आहे. सरकार बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आलेलं आहे. त्यामुळे कुठेही आम्ही कमी पडणार नाही. सर्वांना प्रेरणादायी ठरेल असंच स्मारक उभारण्यात येणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

जबाबदाऱ्या मोठ्या तरीही…

एकनाथ शिंदे हे राज्याचे नगरविकास मंत्री आहेत. शिवाय ते गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्याचे पालकमंत्रीही आहेत. तसेच ते शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुखही आहेत. अत्यंत व्यस्त शेड्यूल असतानाही शिंदे यांनी वेळात वेळ काढून परीक्षा दिली. राज्यातील कोरोनाचं संकट, कोकणातील वादळ आणि विदर्भातील पूरपरिस्थिती आदी संकटाच्या काळात शिंदे सतत जनतेच्या संपर्कात होते. लोकांच्या भेटीगाठी घेऊन त्यांना आधार देत होते, त्यातूनही त्यांनी वेळात वेळ काढून पदवी परीक्षा देऊन त्यात यश मिळविलं आहे.

कोण आहेत शिंदे?

शिंदे यांनी या आधी २०१५ ते २०१९ पर्यंत सार्वजनिक बांधकाम या खात्याचे मंत्री म्हणून काम पाहिले. २०१९च्या सुरुवातीपासून त्यांनी आरोग्य खात्याची देखील जबाबदारी सांभाळली. ठाण्यातील कोपरी-पांचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून ते सलग तीन वेळा आणि तत्पूर्वी पूर्वीच्या एकत्रित ठाणे विधानसभा मतदारसंघातून एकदा असे चार वेळा आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेले आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रभावामुळे ते १९८०च्या दशकात शिवसेनेत दाखल झाले. एका साध्या शाखाप्रमुखापासून त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली आणि कठोर मेहनत, धडाडी, सर्वांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती आणि प्रत्येक कामाला शेवटापर्यंत घेऊन जाण्याची धमक या वैशिष्ट्यांमुळे आज शिवसेना नेतेपदापर्यंत त्यांची वाटचाल झाली आहे.

संबंधित बातम्या:

एमएमआर प्रदेशाच्या विकासाचे प्रकल्प फास्ट ट्रॅकवर; एकनाथ शिंदे यांचे एमएमआरडीएला आदेश

‘कोश्यारी यांनी विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादी जाहीर करावी’, एकनाथ शिंदेंचं आवाहन

(shivsena leader eknath shinde passed BA final year exam from ycmou)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.