AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut | मुनगंटीवार म्हणाले शिवसेनेशी युती म्हणजे ऐतिहासिक चूक, आता संजय राऊतांनी दिला महत्त्वाचा सल्ला, म्हणाले…

माजी अर्थमंत्री तथा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीदेखील तिखट प्रतिक्रिया दिलीय. त्यांनी राजकारणामध्ये विरोधी पक्ष भरकटलेला आहे. भरकटलेल्या मनाची माणसं गांजा प्यायल्यासारखं बोलतात, असं संजय राऊत यांनी म्हटलंय. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

Sanjay Raut | मुनगंटीवार म्हणाले शिवसेनेशी युती म्हणजे ऐतिहासिक चूक, आता संजय राऊतांनी दिला महत्त्वाचा सल्ला, म्हणाले...
SANJAY RAUT
Follow us
| Updated on: Dec 31, 2021 | 11:14 AM

मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेवेळी मोठ्या घडामोडी घडल्या. याबद्दल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी नुकतेच काही गौप्यस्फोट केले. त्यानंतर राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. माजी अर्थमंत्री तथा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Munagantiwar) यांच्या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीदेखील तिखट प्रतिक्रिया दिलीय. त्यांनी राजकारणामध्ये विरोधी पक्ष भरकटलेला आहे. भरकटलेल्या मनाची माणसं गांजा प्यायल्यासारखं बोलतात, असं संजय राऊत यांनी म्हटलंय. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

भरकटलेल्या मनाची माणसं गांजा प्यायल्यासारखं बोलतात

शिवसेनेसोबतची आमची युती ही ऐतिहासिक चूक होती. आम्ही राष्ट्रवादीसोबत जाणे योग्य होते, असे वक्तव्य माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. त्याला संजय राऊत यांनी खरमरीत शब्दात उत्तर दिलं. “भरकटलेल्या मनाची माणसं गांजा प्यायल्यासारखं बोलतात. राजाकरणामध्ये विरोधी पक्ष भरकटलेला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे कोणत्या वक्तव्याची अपेक्षा करणार ? मुनगंटीवार यांना मी अत्यंत संयमी आणि अभ्यासू नेते समजत होतो. त्यांची भाषणं मी ऐकत आलो आहे. पण कोणी कोणासोबत जावं हा त्यांचा प्रश्न नाही. महाराष्ट्रात तीन पक्षांनी ते ठरवलेलं आहे,” असे संजय राऊत म्हणाले.

भाजपच्या नेत्यांनी केदारनाथला एक महिना जाऊन बसणं गरजेचं

तसेच पुढे बोलताना त्यांनी भाजप नेत्यांना डोकं थंड ठेवण्यासाठी केदारनाथला जाण्याचा सल्ला दिला. “भाजपला कधी राष्ट्रवादीसोतब जावं असं वाटतं. तर कधी शिवसेना आमचा नैसर्गिक मित्र असल्याचे ते म्हणतात. भाजपच्या नेत्यांनी केदारनाथला एक महिना जाऊन बसणं गरजेचं आहे. डोकी थंड झाली की नंतर महाराष्ट्रात येऊन त्यांनी राजकारण करावं. सध्या त्यांची मनस्थिती चांगली नाही. त्यांच मनस्वास्थ ठीक व्हावं यासाठी मी नव्या वर्षानिमित्त प्रार्थना करतो,” असे राऊत म्हणाले.

इतर बातम्या :

संतोष परब हल्लाप्रकरणातील संशयित मनिष दळवी विजयी; सिंधुदुर्ग बँकेच्या निकालास सुरुवात

राजकारणासाठी मोदी शिवाजी महाराजांचे नाव घेतात, मग बेळगावमध्ये तरुणांवर देशद्रोहाचा गुन्हा का ? संजय राऊतांचा हल्ला

Election: मार्च महिन्यात राज्यातील 18 महापालिकांची निवडणूक, मुंबई आणि औरंगाबादची प्रक्रिया लांबणीवर?

दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं.
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी.
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले.
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?.
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय.
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर.
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?.
पाकिस्तानच्या 12 शहरांमध्ये भारताकडून 50 ड्रोन हल्ले
पाकिस्तानच्या 12 शहरांमध्ये भारताकडून 50 ड्रोन हल्ले.
मोठी बातमी! भारतीय लष्कराकडून पाकिस्तानी रडार सिस्टिम उद्धवस्त
मोठी बातमी! भारतीय लष्कराकडून पाकिस्तानी रडार सिस्टिम उद्धवस्त.
पाकिस्तानच्या अनेक शहरांमध्ये वाजले सायरन
पाकिस्तानच्या अनेक शहरांमध्ये वाजले सायरन.