‘237 बहुमताचा माज दाखवू नका’, भाजपच्या मंत्र्याला शिवसेना आमदाराच सडतोड प्रत्युत्तर
आमच्याकडे 237 आमदार आहेत, ज्यांना युतीत राहायचं नाही, ते बाहेर पडतील म्हणणाऱ्या भाजपच्या मंत्र्याला शिवसेना आमदाराने सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. कोणाच्या चेहऱ्यामुळे 237 चा आकडा पार केला हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे असं शिवसेना आमदाराने म्हटलं आहे.

“आमच्याकडे 237 आमदार आहेत. ज्यांना युतीत राहायचं नाही, ते बाहेर पडतील” असं वक्तव्य मंत्री आणि भाजप आमदार अतुल सावे यांनी केलं. सावे यांच्या या वक्तव्यावर शिवसेना आमदार आक्रमक झाले आहेत. ‘237 आकड्याच बहुमत मिळालं, याचा कोणी माज करू नये’ अशा शब्दात शिवसेना आमदार बाबुराव कदम यांनी अतुल सावेंना प्रत्युत्तर दिलं. “237 हे यश एकनाथ शिंदे यांचा चेहरा समोर ठेवून आलं” असं बाबुराव कदम म्हणाले. नांदेड जिल्ह्यातील सहा आणि हिंगोलीच्या तीन आमदारांची अतुल सावेंच्या विरोधात तक्रार केली आहे. तांडा वस्तीच्या निधी वाटपावरून आमदार बाबुराव कदम यांची माहिती. पालकमंत्री अतुल सावेंना आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याच बाबूराम कदम यांनी म्हटलं आहे.
“237 च्या आकड्याचं जे बहुत मिळालं, त्याचा कोणी ही माज करू नये, विधानसभेला कोणाच्या चेहऱ्यामुळे 237 चा आकडा पार केला हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. मंत्री महोदयांनी जनतेत जाऊन विचाराव 237 कशामुळे मिळाले?” असं बाबूराव कदम म्हणाले. “सत्तेत राहायचं की बाहेर पडायचं? हा अधिकार सावे साहेबांना कोणी दिला, हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे” असं कदम म्हणाले. “तुम्ही कोणा कोणाला बाहेर पाठवणार आहात? नांदेडच्या नऊ आमदारांपैकी तीन भाजपाच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. तांडा वस्तीमध्ये अनियमित्ता झाली आहे. अनियमित झाली नसेल, तर तुम्ही स्टे कशामुळे दिला?” असा सवाल बाबूराव कदम यांनी विचारला.
‘ठरलेल्या दलालामार्फत सगळं नियोजन होतं’
“तुम्ही सांगताय अनियमित्ता झाली नाही आणि तुम्ही स्टे देताय. मी जिल्हाप्रमुख असताना 32 प्रस्ताव दिले होते. त्यातल्या एकाही प्रस्तावाला मंजुरी दिली नाही ते प्रस्ताव रिपीट करायचे असते. कुठल्याही समिती पुढे न ठेवता तुम्ही प्रस्ताव मागून घेता. ठरलेल्या दलालामार्फत सगळं नियोजन होतं. हिंगोली जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे राजू नवघरे, भाजपाचे तानाजी मुटकुळे व शिवसेनेचे संतोष बांगर यांच्या सोबत मी चर्चा केली” असं बाबूराव कदम म्हणाले.
‘याचा कोणीही गर्व अभिमान करू नये’
“हिंगोली विधानसभेचे भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी सांगितलं त्यांच्या मतदारसंघात साडेसहा कोटी रुपयांची तांडावस्तीची कामं त्यांना न सांगता झाली आहेत. हिंगोली जिल्ह्यातील तीन आमदार तांडावस्तीच्या कामाला स्टे मागत आहेत. निधी मंजूर करताना स्थानिक आमदारांना कमीत कमी विचारले पाहिजे. 237 फक्त एकनाथराव शिंदे साहेब यांचा चेहरा समोर करून, 237 च यश आल आहे याचा कोणीही गर्व अभिमान करू नये” असं बाबूराव कदम यांनी सुनावलं.