पोटात खुपसण्यासाठी हल्लेखोराने चाकू उगारला, शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकरांवर तीन वार

ओमराजे निंबाळकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती सुखरुप आहे. हल्ल्यामागील नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

पोटात खुपसण्यासाठी हल्लेखोराने चाकू उगारला, शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकरांवर तीन वार
Follow us
| Updated on: Oct 16, 2019 | 12:33 PM

उस्मानाबाद : शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर (Shivsena MP Omraje Nimbalkar knife attack) यांच्यावर भरदिवसा चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली. पोटात खुपसण्यासाठी हल्लेखोराने चाकू उगारला मात्र ओमराजे यांनी हातावर वार झेलल्याने थोडक्यात निभावलं. हल्ल्यात ओमराजे निंबाळकर यांच्या हाताला जखम झाली आहे. खासदारावर जीवघेणा हल्ला झाल्यामुळे उस्मानाबादसह राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

ओमराजे निंबाळकर यांच्याशी हात मिळवण्याच्या उद्देशाने आरोपी ओमराजे निंबाळकर यांच्या जवळ आला. नमस्कार करत त्याने ओमराजेंचा हात हातात घेतला. दुसऱ्या हाताने चाकू काढून पोटात खुपसण्यासाठी उगारला, मात्र ओमराजे यांनी हातावर वार झेलला. यामध्ये निंबाळकरांच्या हातातील घड्याळ तुटलं आणि त्यांच्या हाताला जखम झाली. आरोपीचं नाव अजिंक्य टेकाळे असल्याची प्राथमिक माहिती आहे. ओमराजेंनी वार चुकवल्यानंतर आरोपी पळून गेला.

ओमराजे निंबाळकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती सुखरुप आहे. हल्ल्यामागील नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. आरोपी हल्लेखोराचा शोध पोलिस घेत आहेत.

ओमराजे निंबाळकर यांची ‘टीव्ही9 मराठी’ला एक्स्क्लुझिव्ह प्रतिक्रिया

नायगावची सभा आटोपून मी निघालो होतो. तेवढ्यात समोरुन गर्दी आली. त्यात एका तरुणाने मला नमस्कार केला. माझा हात हातात घेतला आणि दुसऱ्या हाताने चाकू बाहेर काढला. मला चाकू दिसल्यामुळे मी डावा हात आडवा घातला. तो वार घड्याळावर बसला. डाव्या हाताला जखम झाली आणि चाकू खाली पडला. परंतु मी सुखरुप आहे. फार गंभीर दुखापत झालेली नाही. माझ्यामागे जनतेचा, तुळजाभवानीचा, बाळासाहेबांचा आशीर्वाद आहे. अशी प्रतिक्रिया ओमराजे निंबाळकर यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना दिली.

उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारासाठी ओमराजे निंबाळकर कळंब येथे गेले होते, त्यावेळी हा प्रकार (Shivsena MP Omraje Nimbalkar knife attack) घडला.

शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकूहल्ला

ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांची 2006 मध्ये हत्या झाली होती. ओमराजे निंबाळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले नेते पद्मसिंह पाटील घराण्याचे टोकाचे वैर आहेत.

ओमराजे निंबाळकर 2019 मध्ये उस्मानाबाद मतदारसंघातून लोकसभा खासदार झाले. त्यांनी पद्मसिंह पाटलांचे सुपुत्र राणा जगजीत सिंह पाटील यांचा पराभव केला होता. ओमराजे हे 2009 मध्ये उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून आमदार होते. शिवसेनेने 2019 मध्ये लोकसभेचं तिकीट दिलं आणि ते निवडून आले.

कोण आहेत ओमराजे निंबाळकर?

ओमप्रकाश राजे निंबाळकर हे पवनसिंह राजे निंबाळकर यांचे चिरंजीव आहेत.

पवनसिंह आणि डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या कुटुंबातील टोकाचे राजकीय आणि कौटुंबिक वैर संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे.

2004 मध्ये या दोघांमध्ये उस्मानाबाद विधानसभेसाठी लढत झाली होती. अटीतटीच्या लढतीत डॉ. पद्मसिंह पाटील 484 मतांनी विजयी झाले होते.

2006 मध्ये पवनराजेंच्या हत्येनंतर 2009 मध्ये शिवसेनेने त्यांचे चिरंजीव ओमराजेंना विधानसभेची उमेदवारी दिली. या लढतीत त्यांनी पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर मात केली होती. त्यापुढील 2014 च्या निवडणुकीत मात्र राणा पाटील यांनी पराभवाची परतफेड केली.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा ओमराजे विरुद्ध राणा जगजीतसिंह यांच्यात लढत झाली. त्यात पुन्हा ओमराजे निंबाळकर यांनी बाजी मारली.

Non Stop LIVE Update
मुख्यमंत्री कोण? आज होणार फैसला? महायुतीत दोन फॉर्म्युला निश्चित अन्..
मुख्यमंत्री कोण? आज होणार फैसला? महायुतीत दोन फॉर्म्युला निश्चित अन्...
दारूण पराभवानंतर 'मविआ'चं भविष्य काय? एकत्र राहणार की दुभंगणार?
दारूण पराभवानंतर 'मविआ'चं भविष्य काय? एकत्र राहणार की दुभंगणार?.
राज ठाकरेंच्या हातून 'रेल्वे इंजिन' जाणार? पक्षाची मान्यता धोक्यात?
राज ठाकरेंच्या हातून 'रेल्वे इंजिन' जाणार? पक्षाची मान्यता धोक्यात?.
मंत्रिपदासाठी लॉबिंग, भाजपसह शिंदे अन् दादांच्या वाट्याला किती पदं?
मंत्रिपदासाठी लॉबिंग, भाजपसह शिंदे अन् दादांच्या वाट्याला किती पदं?.
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका.
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?.
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?.
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार.
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात.
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?.