Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shivsena NCP : शिवसेना-राष्ट्रवादीत “तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना, गजानन कीर्तिकर करणार रोहित पवारांची तक्रार

आघाडी धर्म पाळला जात नसेल तर आम्ही बांधील नाही असा इशारा त्यांनी रोहित पवारांना दिलाय. या सरकारमध्ये जेवढा अधिकार आमदार म्हणून रोहित पवारांना आहे. तेवढा अधिकार आमच्या जिल्हा अध्यक्षांना आहय असेही त्यांनी म्हटलंय. तसेच रोहित पवारांना मी भाषणातून स्पष्ट कल्पना दिल्याचं त्यांनी म्हटलंय.

Shivsena NCP : शिवसेना-राष्ट्रवादीत तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना, गजानन कीर्तिकर करणार रोहित पवारांची तक्रार
गजानन कीर्तिकर करणार रोहित पवारांची तक्रारImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 29, 2022 | 6:04 PM

अहमदनगर : गेल्या अडीच वर्षांपासून राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार सत्तेत आहे. तीन तिगाडा आणि कामबिघाडा अशी टीका भाजपकडून महाविकास आघाडीवर वारंवर होत आहे. अशातच आता शिवसेना आणि राष्ट्रवादीची धुसफूस पुन्हा एकाद बाहेर आली आहे. अहमदनगरमध्ये शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांनी रोहित पवारांवर (Rohit Pawar) नाराजी व्यक्त करत त्यांची तक्रार थेट मुख्यमंत्र्यांन मार्फत शरद पवारांकडे करणार असल्याचे त्यांनी म्हटलंय. तर आघाडी धर्म पाळला जात नसेल तर आम्ही बांधील नाही असा इशारा त्यांनी रोहित पवारांना दिलाय. या सरकारमध्ये जेवढा अधिकार आमदार म्हणून रोहित पवारांना आहे. तेवढा अधिकार आमच्या जिल्हा अध्यक्षांना आहय असेही त्यांनी म्हटलंय. तसेच रोहित पवारांना मी भाषणातून स्पष्ट कल्पना दिल्याचं त्यांनी म्हटलंय.

राष्ट्रवादीचं राजकारण शोभणारं नाही

त्याचबरोबर आम्ही वरती सरकार सांभाळताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तसेच वेळ पडली तर शरद पवार याच्याशी समन्वय करून पुष्कळ विषय मिटवतो. मात्र या ठिकाणी दडपशाही, पळवा पळवी, तसेच कार्यकर्त्यांची कामं रोखली जातात, हे राजकारणाला शोभणारे नाही, जर आघाडीचा धर्म पाळत नसाल तर आम्ही बांधील नाही असा इशाराच त्यांनी दिलाय.

मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार

तसेच भविष्यात अशा गोष्टी होणार नाही याची आम्ही अपेक्षा करतो अस मतही त्यांनी व्यक्त केलाय. त्याचबरोबर संघर्ष आम्हाला करायचा नाही, आपल्याला लांबची उडी गाठायची आहे, अशा पद्धती कार्यकर्ते जर आक्षेप घेत असतील तर हे गंभीर असून त्याची तक्रार आम्ही मुख्यमंत्र्यांन मार्फत शरद पवारांकडे पोहचवू अस त्यांनी म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

ही पहिलीच वेळ नाही

महाविकास आघाडीतील धुसफूस अशा रितीने बाहेर येण्याची ही पहिलीच वेळ नाही, असे प्रकार असंख्य वेळी घडले आहे. मात्र आता यात रोहित पवारांचं नाव आल्यानं प्रकरण गंभीर बनलंय. महाविकास आघाडीत कधी नाना पटोले राष्ट्रवादीने आमच्या पाठीत खंजीर खुपसला असे विधान करतात. तर कधी के. सी. पाडवी हे निधीवरून नाराज होता. तर कधी शिवसेनेचे आशिष जयस्वार हेही आमदारांना मिळणाऱ्या निधीत पक्षपात झाल्याचा आरोप करता. अशी नाराजीची असंख्य उदाहरण आहेत. ही खदखद वेळोवेळी महाराष्ट्राने पाहिली आहे. त्यामुळे आता हा प्रकार नवा नसला तरी राष्ट्रवादीवरच प्रत्येक वेळी आरोप का होतात? असाही सवाल या प्रकाराने उपस्थित होत आहे. आता या प्रकरणात मुख्यमंत्री काय निर्णय घेतात हेही पाहणं तितकेच महत्वाचं ठरणार आहे.

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.