AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निवडणूक आयोग आमच्या बॅगा तपासतो आणि इकडे शेपूट घालतो; संजय राऊत यांचा हल्लाबोल

विनोद तावडे आणि क्षितिज ठाकूर हे एकमेकांशी वाद घालताना दिसत आहेत. यावर कॅप्शन देताना संजय राऊतांनी भाजपचा खेळ खल्लास! असे म्हटले आहे.

निवडणूक आयोग आमच्या बॅगा तपासतो आणि इकडे शेपूट घालतो; संजय राऊत यांचा हल्लाबोल
| Updated on: Nov 19, 2024 | 3:19 PM
Share

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान पार पडत आहे. त्यातच आता नालासोपाऱ्यात मोठा राडा झाला आहे. भाजपचे नेते विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटप केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडेंना घेरलं आहे. विनोद तावडे यांच्यासह भाजपचे नालासोपारा मतदारसंघाचे उमेदवार राजन नाईक यांना विवांता हॉटेलमध्ये घेरलं आहे. यामुळे सध्या भाजप आणि बहुजन विकास आघाडी या दोन्ही गटात तुफान राडा पाहायला मिळत आहे. आता यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी ट्वीटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत विनोद तावडे आणि क्षितिज ठाकूर हे एकमेकांशी वाद घालताना दिसत आहेत. यावर कॅप्शन देताना संजय राऊतांनी भाजपचा खेळ खल्लास! असे म्हटले आहे.

भाजपचा खेळ खल्लास! जे काम निवडणूक आयोगानेच करायला हवे होते ते काम ठाकुरांनी केले! निवडणूक आयोग आमच्या बॅगा तपासतो आणि इकडे शेपूट घालतो!, अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली.

“भाजपने कितीही लपवायचा प्रयत्न केला तरी नालासोपारा विरारमध्ये जे घडलं ते कॅमेऱ्यासमोर आहे. खुलासे कसले करता. भाजपचा खरा चेहरा उघड झाला, त्यांचा निवडणुकीतील खेळ संपला. विनोद तावडे हे पक्षाचे राष्ट्रीय महासचिव आहे. पक्षाच्या राष्ट्रीय महासचिवाकडे पाच कोटी रुपये पकडण्यात आले. बहुजन विकास आघाडीचे लोकं घुसले. त्यांनी पैसे जप्त केले. पैसे फेकले तोंडावर. त्यांनी तावडेंना कोंडून ठेवलं. यावर भाजप काय खुलासा करणार आहे”, असे संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.

नेमकं काय घडलं? 

विरारमध्ये आज दुपारी १.३० च्या सुमारास मोठा राडा झाला. भाजप नेते विनोद तावडे यांनी विरारमध्ये पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला. यामुळे विरार पूर्वमधील विवांत हॉटेलमध्ये बविआ-भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. याचे अनेक व्हिडीओही व्हायरल झाले. यावेळी बविआच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांना घेरले.

विरार पूर्व भागातील मनोरीपाडा येथील विवांत हॉटेलमध्ये हा सर्व राडा गेल्या तीन तासांपासून सुरु आहे. यावेळी भाजपचे स्थानिक उमेदवार राजन नाईक आणि काही पदाधिकारीही उपस्थित होते. विनोद तावडे हे या पदाधिकाऱ्यांना मतदारांना वाटण्यासाठी 5 कोटी रुपये घेऊन आले होते, असा आरोप बहुजन विकास आघाडीने केला. विनोद तावडे ज्या विवांत हॉटेलमध्ये थांबले होते, तिथे हितेंद्र ठाकूर यांचे सुपुत्र क्षितिज ठाकूर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी धाड टाकली. बविआच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांना घेरले. त्यांच्याकडे काही रक्कमही सापडली. यावेळी बविआ आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.