Bhagat Singh Koshyari Statement : कोश्यारींनी राज्यपालपदाचा मान ठेवला नाही, उद्धव ठाकरे यांची टीका

Uddhav Thackeray : कोल्हापुरी जोडा दाखवण्याची हीच ती वेळ!- उद्धव ठाकरे

Bhagat Singh Koshyari Statement : कोश्यारींनी राज्यपालपदाचा मान ठेवला नाही, उद्धव ठाकरे यांची टीका
Follow us
| Updated on: Jul 30, 2022 | 1:19 PM

मुंबई : राज्यपाल म्हणून त्या खुर्चीचा मान राज्यपालांनी ठेवला पाहिजे. पण त्या खुर्चीत बसवलेल्या कोश्यारींनी त्या खुर्चीचा मान ठेवला नाही. गेल्या तीन वर्षातील त्यांची विधाने असतील काही त्यांचे कॅमेऱ्याने टिपलेली दृष्य असतील ते पाहिल्यावर महाराष्ट्राच्या नशिबी असे माणसे का येतात हा प्रश्न पडला आहे, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी म्हटलंय. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबईबाबत केलेल्या विधानावरून (Bhagat Singh Koshyari Statement) टीका केली जात आहे. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत कोश्यारींच्या विधानाचा समाचार घेतला. त्यांनी राज्यपालांवर कारवाईवर करण्याची मागणी केली. शिवाय राज्यपालांच्या आडून कोण राजकारण करतंय, ते लवकरच समोर येईल, असं त्यांनी म्हटलंय. विविध मुद्दे मांडत त्यांनी कोश्यारींवर टीका केली आहे.

“मी मुख्यमंत्री असताना लॉकडाऊनच्या काळात लोकांचे प्राण जात होते. तेव्हा यांना सर्वधर्मीयांची प्रार्थना स्थळे उघडण्याची घाई झाली होती. मी तो विषय वाढवला नाही. त्यानी पत्रं दिलं त्यावर मी उत्तर दिलं होतं. मी मुख्यमंत्री म्हणून तेव्हा जबाबदारी पार पाडली. मध्ये सावित्रीबाई फुलेंबद्दल हिणकस उद्गार काढले. आजही त्यांनी तसेच उद्गार काढले. महाराष्ट्रात राहत आहेत. महाराष्ट्रात राहून सर्व काही ओरपले आहे, पंगत बिंगत मान मरातब घेतला आहे. आणि महाराष्ट्रातच मराठी माणसाचा अपमान केला आहे”, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

कोल्हापुरी जोडा दाखवण्याची हीच ती वेळ!

“महाराष्ट्रातील चांगल्या गोष्टी त्यांनी पाहिल्या असतील. महाराष्ट्र का घी देखा, पण कोल्हापूरका जोडा नही देखा. कोल्हापूर वाहन आहे. तो जोडा त्यांना दाखवण्याचं त्यांना गरज आहे. कोल्हापुरी वहान जगप्रसिद्ध आहे. त्याचा अर्थ काय लावायचा तो लावा. मी त्यावर बोलणार नाही. पण महाराष्ट्रातील कष्टकरी लोकांनी तो तयार केला आहे. कोल्हापुरी जोड्याचा उपयोग कसा करेल, त्यातही वेगवेगळे प्रकार आहेत. घी देखा लेकीन कोल्हापुरी जोडा नही देखा असं जर असेल तर त्यांना कोल्हापुरी जोडे सुद्धा दाखवण्याची वेळ आली आहे”, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी ठाकरी शैलीत कोश्यारींच्या विधानाचा समाचार घेतला.

हे सुद्धा वाचा

राज्यपालांकडून खुलासा

काल राजस्थानी समाजाच्या कार्यक्रमात मी जे विधान केले त्यात मराठी माणसाला कमी लेखण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता. केवळ गुजराती आणि राजस्थानी मंडळांनी व्यवसायात दिलेल्या योगदानावर मी बोललो. मराठी माणसांनीच कष्ट करून महाराष्ट्राला उभे केले. म्हणूनच आज अनेक मराठी उद्योजक नावाजलेले आहेत. ते केवळ महाराष्ट्रात नाही, तर भारतात आणि जगभरात मोठ्या दिमाखात मराठीचा झेंडा रोवून आहेत. त्यामुळे मराठी माणसाचे योगदान कमी लेखण्याचा कुठे प्रश्नच निर्माण होत नाही. कालच्या त्यांच्या विधनानंतर हा त्यांनी खुलासा केला आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.