ड्रायव्हिंग लायसन्स, गाडीचे आरसी मिळणे का थांबले? काय आहे कारण?

Registration Certificate and license : वाहनधारक सध्या आरसी बुक आणि लायसन्स मिळत नसल्याने वैतागले आहेत. दोन महिन्यांपासून हजारो जाणांना आरसी बुक आणि लायसन्स मिळाले नाही. यामुळे गाडी चालवावी कशी? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

ड्रायव्हिंग लायसन्स, गाडीचे आरसी मिळणे का थांबले? काय आहे कारण?
license
Follow us
| Updated on: May 17, 2023 | 3:32 PM

शाहिद पठाण, गोंदिया : वाहन चालविण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून परवाना घ्यावा लागतो. गाडी रस्त्यावर आणण्यासाठी आरसी बुक म्हणजे Registration Certificate हवे असते. हे नसेल तर तुम्ही गाडी चालवू शकत नाही. यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे सर्व प्रक्रिया पूर्ण करायला हवी. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर लाायसन्स अन् आरसी बुक मिळत नसेल तर? गेल्या तीन महिन्यांपासून आरटीओ विभागाकडून लायसन्स आणि आरसी बुक देण्याचे काम थांबले आहे.

का थांबले वितरण

स्मार्ट कार्डचा तुटवडा असल्यामुळे ड्रायव्हिंग लायसन्स व गाडीची आरसी सुद्धा मिळत नाही. गोंदिया जिल्ह्यात तब्बल 2 हजार स्मार्ट कार्ड प्रलंबित आहेत. ज्यांनी नव्याने वाहन परवाना काढण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे ऑनलाईन अर्ज केले आहेत. तसेच ज्यांनी नवीन गाडी घेऊन नुतनीकरणासाठी प्रक्रिया सुरु केली आहे, त्यांना मागील तीन महिन्यांपासून कार्ड मिळत नाही.

हे सुद्धा वाचा

काय आहे अडचण

स्मार्ट कार्डवर बसवण्यात येणाऱ्या चिप मिळत नसल्यामुळे लायसन्स आणि आरसी बुकचे वितरण थांबले आहे. मात्र कार्ड तुटवडयाची ही समस्या केवळ गोंदिया जिल्हयातच नव्हे तर अन्य जिल्ह्यांमध्ये सुद्धा आहे. परिवहन विभागाने दोन कंपन्यांना कार्ड पुरवण्याचे कंत्राट दिले आहे. या कार्डवर बसवण्यात येणाऱ्या चिप उपलब्ध होत नाही. राज्याच्या परिवहन आयुक्तांना यासंबंधी कल्पना देण्यात आली आहे.

वाहतूक पोलिसांकडून कारवाई

एकीकडे आरटीओकडून लायसन्स दिले जात नाही. मग लायसन्ससाठी अर्ज केला असतानाही ते नसताना वाहन चालवल्यामुळे वाहतूक पोलिसांकडून कारवाईचा बडगा उचलला जात आहे. यामुळे वाहनधारकांकडून संताप व्यक्त होत आहे.

तीन हजार कार्डची मागणी गोंदिया उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय संबंधित कंपनीकडे तीन हजार कार्डची मागणी दोन महिन्यांपूर्वीच नोंदवली होती. मात्र कंपनीकडून केवळ एक हजार स्मार्ट कार्डचा पुरवठा केला. यामुळे सर्व प्रक्रिया थांबली आहे.

ऑनलाईन अर्जानंतरही फेऱ्या

वाहन परवान्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया केल्यानंतर घरपोहच लायसन्स मिळते. अर्ज केलेले वाहनचालक उपप्रादेशिक परिवहन कार्यलयात अनेकदा येतात. मात्र त्याचे लायसन्स आले नसते. हिच परिस्थिती नवीन गाडी घेणारे लोकांची आहे. त्यांना आरसी सुद्धा मिळत नाही.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.