ड्रग्जमुक्त महाराष्ट्र करण्याची सुरवात मातोश्रीपासून करा!; संजय राऊतांच्या टीकेला भाजप नेत्याचं उत्तर

Nitesh Rane on Uddhav Thackeray Matoshree : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सचिन वाझे वर्षावर येऊन राहायचा; ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर कुणी केला गंभीर आरोप? संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेला भाजप नेत्याचं उत्तर

ड्रग्जमुक्त महाराष्ट्र करण्याची सुरवात मातोश्रीपासून करा!; संजय राऊतांच्या टीकेला भाजप नेत्याचं उत्तर
Image Credit source: ANI
Follow us
| Updated on: Nov 04, 2023 | 1:37 PM

महेश सावंत, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी सिंधुदुर्ग | 04 नोव्हेंबर 2023 : ड्रग्ज प्रकरणावरून ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. या टीकेला आता भाजप आमदाराने उत्तर दिलं आहे. ड्रगमुक्त महाराष्ट्राची सुरवात मातोश्री पासून करा. दुसऱ्यांना नौंटकी बोलण्याऱ्या संजय राऊतचं आयुष्य तमासगीर सारखं आहे. ते तरी प्रामाणिक असतात. बीएमसीचं टेंडर कोणाला द्यायचं ते सांगावं लागेल. तेव्हा तुझ्या मालकाचा मुलगा पळून जाईल. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सचिन वाझे वर्षा बंगल्यावर येऊन राहायचा. दुसऱ्यांना बोलण्यापूर्वी तुम्ही काचेच्या घरात राहता हे लक्षात ठेवा, असं म्हणत भाजपचे नेते, आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.

कोरोनानंतर सर्वात गतीने वाढणारी अर्थ व्यवस्था म्हणजे भारत. या सगळ्या गोष्टी उद्धव ठाकरेंच्या अनाडी कामगाराला कधीच कळणार नाहीत. बाळासाहेबांच्या काळात शिवसेनेचा चढता आलेख होता. आता उद्धव ठाकरेच्या कारकिर्दीत ठाकरे गट नावाचं छोटं मित्रमंडळ झालं आहे. याबाबत संजय राऊत यांनी अग्रलेख लिहावा, असं नितेश राणे म्हणालेत.

तुझ्यासारख्या चवन्नी लोकांनी शिवसेनेची ही अवस्था केली. आदित्य ठाकरे दिनोच्या घरी आयुर्वेदिक उपचारासाठी जायचा का? सत्य नारायण पूजेला जायचं का? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पंढरपूरला पूजा करायला गेले असताना आदित्य ठाकरेमध्येच उठून गेलेला. कुठल्या नशेत होता? तुझा मालकाचा मुलगा किती शुद्ध आहे? कोणकोणत्या ड्रग माफियासोबत पार्टी करतो ते सांगावं लागेल, असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.

देशात जे खतरनाक अंमली पदार्थांचा व्यापार करतात, त्यांच्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उभे राहतात. त्याची सूत्र मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात आहेत का? याचा शोध घेण्याची गरज आहे, असं संजय राऊत म्हणाले होते. सकाळी माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. त्याला नितेश राणे यांनी आता उत्तर दिलं आहे.

उपमुख्यमंत्र्यांनी तोंड उघडलं तर तुझ्या मालकाच कुटुंब आर्थर रोड जेलमध्ये असेल. कोणीही नाराज नाही. मुख्यमंत्री साहेबांना प्रत्येक आमदाराला मार्गदर्शन करण्याचे अधिकार आहेत, असंही नितेश राणे म्हणालेत.

अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?
अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?.
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य.
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा.
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती.
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?.
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?.
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल.
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?.
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका.
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?.