बारसू रिफायनरी प्रकरणात नितेश राणे यांची उडी, उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत केले गंभीर आरोप, काय म्हणाले ?

रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या मुद्द्यावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे.

बारसू रिफायनरी प्रकरणात नितेश राणे यांची उडी, उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत केले गंभीर आरोप, काय म्हणाले ?
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Apr 25, 2023 | 4:17 PM

सिंधुदुर्ग : राज्यात सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथील रिफायनरी प्रकल्पावरुण राजकारण तापलं आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणात थेट जालियनवाला बाग हत्याकांड होईल अशी शंका उपस्थित करत हल्लाबोल केला आहे. सरकार दडपशाही करत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही याबाबत पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, स्थानिकांच्या अडचणी दूर करून हा प्रकल्प व्हावा असे मत मांडले होते. त्यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही त्यावर भाष्य करत संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. याच दरम्यान उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांच्या पत्राचा दाखला देत दुटप्पी भूमिका घेतली जात असल्याचा दावा केला होता. याच दरम्यान भाजप आमदार नितेश राणे यांनीही याबाबत भाष्य केले आहे.

भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या मुद्द्यावरून नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे. त्यामध्ये उद्धव ठाकरेंची ही सवयच आहे, उद्धव ठाकरेंनी कोकणातल्या ज्या ज्या प्रकल्पांना पहिला विरोध केला, काही काळानंतर तेच त्यांच्या समर्थनासाठी उतरले आहेत.

उद्धव ठाकरेंच्या विरोधाची किंमत ज्यादिवशी मोजली जाईल त्या दिवशी त्यांचे समर्थन मिळेल. उद्धव ठाकरेंना आपली किंमत वाढवायची असून चेकवरचे आकडे वाढवायचे आहेत त्यासाठी त्यांचे राज्यपालांना वगैरे भेटणार हे चाललंय आहे असा नितेश राणे यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

ज्यादिवशी उद्धव ठाकरे यांचा आकडा वाढेल त्या दिवशी त्यांचा बारसु रिफायनरीला विरोध कमी होईल. मातोश्री एकचे दोन झाले आहेत, खर्च वाढलेला आहे. मुलांची लग्ने करायची आहेत म्हणून हे विरोध करायला लागतात अशी खोचक टीका नितेश राणे यांनी केली आहे.

रत्नागिरी येथील बारसू येथे रिफायनरी प्रकल्प करण्यासाठीच्या हालचाली सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे सर्वेक्षण केले जात आहे. त्यामध्ये काही महिलांनी विरोध दर्शविला आहे. त्यात काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यावरून सरकारवर दडपशाहीचा आरोप केला जात आहे.

याच सर्व पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. उदय सामंत यांनी सरकार कुणावर दडपशाही करणार नाही. उद्धव ठाकरे यांनीच या प्रकल्पाची मागणी केली होती. तोच प्रकल्प आम्ही करत असून राजकीय षड्यंत्र उभं केले जात असल्याचा आरोपही उदय सामंत यांनी केला आहे.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....