Sindhudurg Breaking : तारकर्लीत 20 पर्यटकांनी भरलेली बोट बुडाली! दोघा पर्यटकांचा बुडून मृत्यू, दोघांची प्रकृती चिंताजनक

Tarkarli Scuba diving : पर्यटकांनी भरलेली बोट तारकर्ली समुद्रात बुडाल्यानं खळबळ उडाली.

Sindhudurg Breaking : तारकर्लीत 20 पर्यटकांनी भरलेली बोट बुडाली! दोघा पर्यटकांचा बुडून मृत्यू, दोघांची प्रकृती चिंताजनक
तारकर्ली समुद्र किनाराImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 24, 2022 | 2:57 PM

सिंधुदुर्ग : मालवणच्या तारकर्लीमध्ये (Tarkarli, Malvan) खळबळजनक घटना घडली आहे. पर्यटकांनी भरलेली बोट तारकर्ली समुद्रात बुडाल्यानं (Boat Drown in Tarkarli, Sindhudurg News) खळबळ उडाली. या बोटीत एकूण 20 पर्यटत होते. त्यापैकी दोघांचा बुडून मृत्यू झाला. तर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. 16 पर्यटकांना वाचवण्यात यशं आलंय. 16 पर्यटक सुखरुप आहेत. बोट (Scuba Diving in Tarkarli) बुडत असल्याची माहिती मिळाल्यानंतर तातडीन बचावकार्य करण्यासाठी यंत्रणा तैनात करण्यात आल्या होत्या. त्यामुळे 16 जणांचा जीव वाचवण्यात यंत्रणांना यश आलंय. मात्र दोघा जणांचा पाण्यात बुडून, नाकातोंडात पाणी जाऊन मृत्यू झाला आहेय. तर अन्य दोघा पर्यटकांचा बुडताना वाचवण्यात आलं असलं, तरी त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याची मिळतेय. बुडालेल्या बोटीचं नाव जय गजानन असल्याची माहिती समोर आली आहे.

कशामुळे बोट बुडाली?

मंगळवारी दुपारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. त्यामुळे तारकर्लीत पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना मोठा धक्का बसलाय. स्कुबा डायव्हिंग करुन परतत असताना हा अपघात झाला. या अपघातातील सर्व पर्यटक हे पुणे आणि मुंबई येथील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, बोट नेमकी कोणत्या कारणामुळे बुडाली, याची माहिती मिळू शकलेली नाही.

स्कुबा डायव्हिंगसाठी येणारे धास्तावले!

उन्हाळ्याची सुट्टी असल्याकारणाने मोठ्या संख्येनं पर्यटक हे मालवणमध्ये फिरायला येत असतात. समुद्री खेळांसाठी प्रसिद्ध असलेल्या तारकर्ली अनेक पर्यटक हे स्कुबा डायव्हिंगसाठी येतात. स्कुबा डायव्हिंगचं प्रमुख आकर्षण असलेल्या मालवणला गेल्या काही काळापासून तारकर्लीत पहिली पसंती मिळतेय. मोठ्या संख्येनं येणाऱ्या पर्यटकांना स्कुबा डायव्हिंगचा आनंद देणाऱ्या तारकर्लीत घडलेल्या घटनेनं गालबोट लागलंय.

हे सुद्धा वाचा

पाहा व्हिडीओ : गोंदियात भीषण अपघात

स्कुबा डायव्हिंगसाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेचा मुद्दा या घटनेनं उपस्थित केलंय. स्कुबा डायव्हिंग करुन परतत असताना बोट का बुडाली? पर्यटकांना लाईफ जॅकेट दिले होते का? पर्यटकांच्या सुरक्षेत नेमकी कुठे कमी पडली? नेमकी कुणाच्या चुकीमुळे बोट बुडण्याची दुर्घटना घडली? असे अनेक सवाल उपस्थित केलेत. या घटनेनं तारकर्ली आणि मालवणसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.