AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बीडमधील आणखी एक प्रकरण अंजल दमानियांनी बाहेर काढलं, म्हणाल्या “बोबडे कुटुंब…”

अंजली दमानिया यांनी बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणी पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. देशमुख हत्येचा कबुलीजबाब अपूर्ण असल्याचे आणि अनेक महत्त्वाचे घटक गहाळ असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

बीडमधील आणखी एक प्रकरण अंजल दमानियांनी बाहेर काढलं, म्हणाल्या बोबडे कुटुंब...
anjali damaniya
| Updated on: Apr 04, 2025 | 4:30 PM
Share

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी विविध धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. त्यातच आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीडमधील एक नवीन प्रकरण समोर आणलं आहे. बीडमधील बोबडे कुटुंबाप्रकरणी अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. आता याप्रकरणी मी लवकरच न्याय मागणार आहे, असे अंजली दमानिया यांनी म्हटले.

अंजली दमानिया यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संतोष देशमुख प्रकरणासह विविध मुद्द्यांवर भाष्य केले. संतोष देशमुख यांच्या प्रकरणांमध्ये मला आत्ताच्या घडीला अनेक गोष्टी या झालेल्या दिसत नाही. या गोष्टींची चर्चा काल मनोज जरांगे आणि धनंजय देशमुख यांच्याबरोबर सुद्धा केली. सुदर्शन घुले याचा जो कबुली जबाब आलेला आहे. तो कसा अर्धवट आहे, त्याच्यात काय काय गोष्टी नाहीत, कारण त्यामध्ये फक्त हत्या होईपर्यंतच लिहिलेला आहे. हत्या झाल्यानंतर ते जे फरार झाले, तेव्हा ते फरार कुठे झाले? ते भिवंडीला कसे पोहोचले, त्या ठिकाणाहून पुण्याला कसे आले आणि कोणी आर्थिक मदत केली? कराडसोबत त्याचं बोलणं झालं की नाही? या कुठल्याच गोष्टीचा त्यामध्ये उल्लेख नाही, असे अंजली दमानिया यांनी म्हटले.

अर्धवट कबुली जबाब जो घेतला. पोलिसांनी काय ग्राउंडवर घेतला गेला. याव्यतिरिक्त हे जे शिवलिंग मोराळे आहेत, बालाजी तांदळे आहे, डॉक्टर वायबसे आहेत यांच्याबद्दल चकारही शब्द त्या चार्जशीट मध्ये लिहिलेला नाही. इतकच नाही तर ते जे राजेश पाटील आणि प्रशांत महाजन पोलीस अधिकारी आहेत. त्यांचे व्हिडीओ संपूर्ण महाराष्ट्राने बघितले. त्यांच्याबद्दलही चकार शब्द त्यामध्ये नाही. त्यामुळे या अनेक गोष्टी ॲडिशनल चार्जशीट मध्ये येण्याची गरज आहे, असे अंजली दमानिया म्हणाल्या.

अंजली दमानियांकडून पोलखोल

“काल मी जेव्हा जालन्यात आले, तेव्हा मला बीडवरून एक अख्खं कुटुंब भेटायला आलं होतं. बोबडे नावाचे कुटुंब होतं. त्यामध्ये त्यांची दोन मुलं मंगेश आणि बजरंग यांनी एक राईस मिल चालू करण्यासाठी सावकारांकडून काही लोन घेतलं होतं. परंतु ही राईस मिल चालू झाल्यानंतर कोविड काळात त्यांना लॉस झाला. परंतु त्या सावकारांनी त्यांना इतका छळलं की त्यामधील एक भाऊ घर सोडून निघून गेला आणि दुसऱ्या भावाला इतका त्रास दिला की भाऊबीजेच्या दिवशी त्याने गळफास घेत आत्महत्या केली. गळफास घेण्यापूर्वी त्याने एक मृत्यूपत्र लिहून दिलं होतं. त्यामध्ये या सगळ्यांची सरळ सरळ नावं लिहिली असतानाही कुठल्याही प्रकारची कारवाई त्यावर आजपर्यंत झाली नाही. पोलिसांनी त्यात काहीही कारवाई केली नाही म्हणून तो त्रास त्यांना झाला असल्याचे सुद्धा त्यांनी म्हटले. त्यामुळे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी बीडला जाणार आहे. बीडच्या पोलीस अधीक्षकांसोबत बोलून आणि त्यांना सांगून ती कारवाई करून घेणार आहे”, असे अंजली दमानिया यांनी म्हटले.

धनंजय मुंडे यांच्या जवळची माणसं

“बीड जिल्ह्यातील एमआयडीसीचा जो भाग आहे, त्या भागातील हे प्रकरण आहे. हे सगळेच्या सगळे राजकारणी आहे तिथले जे सावकार आहेत. ते त्या ठिकाणच्या राजकारणात आहे आणि धनंजय मुंडे यांच्या जवळची माणसं आहेत. त्यापैकी एक माणूस हा ठाकरे गटाचा आहे”, असं अंजली दमानिया यांनी म्हटले.

मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.