Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तृप्ती देसाईंना पोलिसांची नोटीस, साई मंदिरातील ‘तो’ फलक काढण्याचा इशारा दिल्याने शिर्डीत नो एन्ट्री

सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना 8 ते 11 डिसेंबरपर्यंत शिर्डी येथे येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. (Trupti Desai Shirdi)

तृप्ती देसाईंना पोलिसांची नोटीस, साई मंदिरातील 'तो' फलक काढण्याचा इशारा दिल्याने शिर्डीत नो एन्ट्री
Follow us
| Updated on: Dec 08, 2020 | 7:54 PM

अहमदनगर : सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना शिर्डी येथे येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. शिर्डी येथील साईबाबा मंदिरातील विवादित फलक स्वत: येऊन काढण्याचा इशारा दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. दिलेल्या नोटिशीनुसार 8 ते 11 डिसेंबरपर्यंत त्यांना शिर्डीमध्ये येता येणार नाही. कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. (Social activist Trupti Desai has been barred  for coming to Shirdi)

साई मंदिरात दर्शन घेण्यासाठी येताना फक्त भारतीय पेहरावात यावे. तोकडे कपडे कपडे घालू नये, असे आवाहन साई संस्थानने केले होते. तशा आशयाचे फलकही साई मंदिराच्या आवारात लावण्यात आलेले आहेत. संस्थानच्या या आवाहनानंतर राज्यात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी साई मंदिरातील तो फलक हटवण्याची मागणी केली होती. तसेच, फलक हटवला नाही; तर स्वत: जाऊन तो काढणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला होता. त्यांच्या या इशाऱ्यांनतर तृप्ती देसाई यांना शिर्डीत येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्यांना तशी नोटीसही शिर्डी पोलिसांकडून देण्यात आली आहे.

साई संस्थानचे भक्तांना काय आवाहन?

फक्त महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतात जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिर्डीतील साईमंदिरात ‘तोकडे कपडे घालून येऊ नये. भक्तांनी भारतीय पेहरावात साईमंदिरात यावं,’ असं आवाहन साईबाबा संस्थानकडून (Saibaba Sansthan) करण्यात आलं आहे. मंदिरात भारतीय पेहरावात यावं, अशा आशयाचे फलकदेखील साईबाबा मंदिर परिसरात लावण्यात आले आहेत. “साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी अनेक जण तोकडे कपडे घालून येत असल्याचे निरीक्षणात आले आहे. तीर्थस्थळी येताना भारतीय पेहरावात यावं,” असं साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी सांगितलं.

तृप्ती देसाईंची भूमिका काय ?

साई मंदिरातील  तो फलक काढून टाकण्याचे आवाहन देसाई यांनी केलेले आहे. अनेक मंदिरात, अगदी शिर्डी मंदिरातसुद्धा पुजारी अर्धनग्न अवस्थेत असतात. यावर अर्धनग्न पुजाऱ्यांना मंदिरात प्रवेश नाही असा बोर्ड भक्तांनी कधीही लावलेला नाही, असं त्यांनी म्हटलंय. तसेच, जर साई संस्थानने तो फलक काढला नाही; तर आम्हाला येऊन त्याला काढावे लागेल, असा ईशाराही देसाई यांनी साई संस्थानला दिलेला आहे.

संबंधित बातम्या :

अबब! अवघ्या 9 दिवसांत साईचरणी कोट्यवधींचं दान

तुळजाभवानी मंदिरात सोशल डिस्टन्सिंगचे तीन-तेरा!, भाविक, पुजारी, व्यापारीही मास्कविना, ज्येष्ठांनाही मंदिरात प्रवेश

शिर्डीमध्ये मंदिर सुरू झालं पण भाविक आणि प्रशासन नियम पाळतंय का? वाचा रिअ‍ॅलिटी चेक

(Social activist Trupti Desai has been barred  for coming to Shirdi)

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.