AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उपजिल्हाधिकाऱ्याकडून पोलीस निरीक्षकाचा हेअरकट, घरच्या घरी केस कटिंग

केस कापणारे आहेत सोलापूरचे उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, तर ज्यांची कटिंग केली जात आहे, ते आहेत पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे. (Solapur Deputy Collector Gives Hair Cut to Police Sub inspector)

उपजिल्हाधिकाऱ्याकडून पोलीस निरीक्षकाचा हेअरकट, घरच्या घरी केस कटिंग
| Updated on: May 04, 2020 | 3:51 PM
Share

सोलापूर : लॉकडाऊनच्या काळात वाढलेल्या केसांना अनेक जणांनी घरच्या घरी कात्री लावली. मात्र ‘कोरोना’मुळे सतत ऑन ड्युटी असलेल्या अधिकाऱ्यांची त्यातही अडचण झाली. अखेर सोलापुरातील उपजिल्हाधिकाऱ्याने आपलाच मित्र असलेल्या पोलीस निरीक्षकाचे घरच्या घरी केस कापून दिले. (Solapur Deputy Collector Gives Hair Cut to Police Sub inspector)

फोटो पाहून हे एखाद्या सलूनमधील चित्र वाटेल, पण केस कापणारे आहेत सोलापूरचे उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, तर ज्यांची कटिंग केली जात आहे, ते आहेत पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे. ते सोलापूर शहरातील विजापूर नाका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आहेत. शेंडगे आणि गुरव या दोघांनाही सध्या ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर रात्रीचा दिवस करुन काम करावे लागत आहे. दोघं एकाच रुममध्ये वास्तव्यास आहेत.

हेही वाचा : कॅन्सरतज्ज्ञ मुलगी केशकर्तनकाराच्या भूमिकेत, लेकीने महसूलमंत्र्यांचे केस घरीच कापले!

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू झाल्यामुळे अत्यावश्यक सेवा ठराविक वेळेत सुरु आहेत, मात्र सलून दुकानांना पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. शेंडगे यांना वाढलेले केस त्रासदायक ठरत होते. परंतु कायद्याचे रक्षक असल्याने सलून दुकानदाराला बोलावून केस कापून घेणे त्यांच्या मनाला पटलेच नाही. त्यामुळे त्यांनी तो विषय सोडून दिला होता.

हेही वाचा : कोणतंही काम सोपं नसतं, वडिलांचे केस स्वत: कापले : सत्यजीत तांबे

आपल्या मित्राच्या मनातली खंत उपजिल्हाधिकारी असलेल्या मित्राला स्वस्थ बसू देत नव्हती. अखेर गुरव यांनी स्वतःच कात्री, कंगवा आणि आरसा हाती घ्यायचं ठरवलं नि घरच्या घरी मित्राच्या केसांची कटिंग केली. त्यामुळे हेमंत शेंडगे यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं. एका मित्राने दुसऱ्या मित्रासाठी आपलं पद आणि प्रतिष्ठा बाजूला ठेवून केशकर्तन केल्याने त्यांच्या घनिष्ट मैत्रीची चर्चा रंगली आहे.

(Solapur Deputy Collector Gives Hair Cut to Police Sub inspector)

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.