मित्रांचा नादच खुळा! जिवलग मित्राला नोकरी लागली, पगाराची रक्कम लिहून चौकात अभिनंदनाचा फलक
अनेक वर्ष मोठ्या पगारासाठी धडपडत असलेल्या जिवलग मित्राला नोकरी लागल्याने मित्रांनी अभिनंदनाचा मोठा फलक लावला.
सोलापूर : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन जाहीर झाला (Poster To Congratulate Friend For Getting Job). देशातसोबतच अख्ख जग ठप्प झालं. दिल्लीपासून गल्लीपर्यंतचा गाव गाडा ठप्प झाला. त्यात अनेकांची नोकरी गेली. शहरात राहणारी तरुण मुलं गावाकडे परतली. अनेकांना तर आजही नोकरी मिळाली नाही. अशातच माढा तालुक्यातील दारफळ (सिना) गावातील विशाल बारबोले या तरुणाला साखर कारखान्यात चांगल्या हुद्यावर पाच आकडी पगारी नोकरी मिळाल्याने गावातील मित्र परिवाराने मुख्य चौकात मोठा फलक लावुन आनंद साजरा केला (Poster To Congratulate Friend For Getting Job).
माढा तालुक्यातील दारफळ गावचा रहिवासी असलेल्या विशालने दहावी उतीर्ण होऊन आयटीआयचा कोर्स पुर्ण केला होता. पिंपरी येथील बबनराव शिंदे शुगर्स येथे विशाल कर्मचारी नोकरीस लागला. अनेक वर्ष काम देखील केले. मात्र, तिथे मिळणाऱ्या पगारावर तो समाधानी नव्हता.
तो मोठा पगार आणि हुद्याच्या तो शोधात असायचा. अशातच मोहोळ तालुक्यातील आष्टी येथे असलेल्या औदुंबरराव पाटील साखर कारखान्यात कर्मचारी भरती निघाली आणि विशाल तिथे गेला. क्रेन ऑपरेटर पदी निवड झाली.
अनेक वर्ष मोठ्या पगारासाठी धडपडत असलेल्या आपल्या जिवलग मित्राला नोकरी लागल्याचे समजताच मित्र परिवाराने त्याचा गावातील मुख्य चौकात पगाराची रक्कम लिहुन अभिनंदनाचा मोठा फलक लावला. हा आगळावेगळा फलक गावासह परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. “मित्राला चांगली नोकरी मिळाल्याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी मी असा फलक लावला आहे”, असं श्रीकांत आतकरेने सांगितलं.
Corona Goddess Temple | कोंबडे-बकऱ्यांचा बळी, सोलापुरात चक्क ‘कोरोना देवी’चे मंदिरhttps://t.co/6l46DixFtJ#CoronavirusIndia #SolapurCorona
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 1, 2020
Poster To Congratulate Friend For Getting Job
संबंधित बातम्या :
विठ्ठल मंदिर प्रवेश प्रकरणी प्रकाश आंबेडकरांसह 1200 जणांवर गुन्हे दाखल
‘आजपासून मंदिरं खुली झाली असं समजा’, प्रकाश आंबेडकरांचं विठ्ठल मंदिरात प्रवेश करत आंदोलन