Solapur Crime: उजनी धरणात होडीतून फिरण्यासाठी गेलेल्या मुंबईच्या पाहुण्यासह मच्छिमाराचा बुडून मृत्यू

सय्यद यांच्याकडे आज मुंबईहून चार पाहुणे आले होते. हे सर्व जण सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास सय्यद यांच्यासह होडीतून फेरफटका मारण्यासाठी उजनी धरणाच्या पाण्यात गेले होते. पाण्यात फेरफटका मारत असतानाच अल्ताफ शेख या तरुणाचा तोल गेल्याने तो पाण्यात पडला.

Solapur Crime: उजनी धरणात होडीतून फिरण्यासाठी गेलेल्या मुंबईच्या पाहुण्यासह मच्छिमाराचा बुडून मृत्यू
उजनी धरणात होडीतून फिरण्यासाठी गेलेल्या मुंबईच्या पाहुण्यासह मच्छिमाराचा बुडून मृत्यू
Follow us
| Updated on: Jan 14, 2022 | 10:03 PM

सोलापूर : उजनी धरणात होडीतून फिरण्यास गेलेल्या एका मुंबईच्या तरुणासह मछिमाराचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना करमाळा तालुक्यातील चिकलनठाण परिसरात घडली आहे. समीर याकूब सय्यद आणि अल्ताफ एकबाल शेख(18) अशी मयतांची नावे आहेत. या घटनेमुळे ऐन संक्रांतीच्या दिवशी गावावर शोककळा पसरली आहे. (A fisherman drowned along with a youth who went for a boat ride in Ujani dam)

पाण्यात पडलेल्या तरुणाला वाचवताना मासेमाराचाही मृत्यू

मयत समीर याकूब सय्यद हे करमाळा तालुक्यातील चिकलनठाण परिसरात वास्तव्यास असून त्यांचा मासेमारीचा व्यवसाय आहे. सय्यद यांच्याकडे आज मुंबईहून चार पाहुणे आले होते. हे सर्व जण सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास सय्यद यांच्यासह होडीतून फेरफटका मारण्यासाठी उजनी धरणाच्या पाण्यात गेले होते. पाण्यात फेरफटका मारत असतानाच अल्ताफ शेख या तरुणाचा तोल गेल्याने तो पाण्यात पडला. अल्ताफला पोहता येत नसल्यामुळे तो पाण्यात बुडू लागला. यावेळी त्याला वाचवण्यासाठी समीर सय्यद यांनी पाण्यात उडी मारली. मात्र अल्ताफने समीर यांना मिठी मारल्याने दोघेही पाण्यात बुडाले.

वर्ध्यात कालव्यात आढळला मृतदेह

रोहणा नजीकच्या लोअर वर्धा प्रकल्पाच्या मुख्य कालव्यामध्ये गुरुवारी एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दिघी सायखेडा शेत शिवारातून गेलेल्या कालव्यामध्ये मृतदेह वाहत आल्याचे दिसताच एकच खळबळ उडाली. याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येत मृतदेह बाहेर काढत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात रवाना केले. अजय सुधाकर पाटील असे मयत इसमाचे नाव असून तो नंदमार्केट अमरावती येथील रहिवासी आहे. पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद करत पुढील तपासाला सुरवात केली. (A fisherman drowned along with a youth who went for a boat ride in Ujani dam)

इतर बातम्या

Maval Crime: मावळमध्ये एक हजार रुपयांसाठी दुकानदारावर पिस्तुल रोखले, घटना सीसीटीव्हीत कैद

CCTV Video | दोघे आले, एकानं बंदूक ताणली, हवेत गोळीबार करत बँक लुटून पसार! कुठं घडला थरार?

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.