Solapur Murder : सोलापुरात क्षुल्लक कारणातून वादातून तरुणाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या

मयत अमोल तळेकर हा त्याच्या व भीमराव तळेकर यांच्या शेताच्या मधून असलेल्या सामायिक रस्त्यावरून त्यांची ट्रॅक्टर ट्रॉली घेऊन चालला होता. यावेळी त्यांच्या घराच्या बाजूस असलेल्या वळणावर ट्रॅक्टरचे मागील बाजूचे चाक भिमराव तळेकर यांनी ठेवलेल्या लाकडावर गेले. यावरुन भीमराव तळेकर यांनी अमोल यास शिवीगाळ केली.

Solapur Murder : सोलापुरात क्षुल्लक कारणातून वादातून तरुणाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या
सोलापुरात क्षुल्लक कारणातून वादातून तरुणाची धारदार शस्त्राने भोसकून हत्याImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 28, 2022 | 4:56 PM

सोलापूर : शेतीच्या वादातून एका तरुणाची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना सोलापुरातील करमाळा तालुक्यातील केम येथे घडली आहे. अमोल सुधीर तळेकर (23) असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मयताच्या वडिलांच्या तक्रारीनुसार पाच आरोपींविरोधात भादवि कलम 302, 504, 141, 143, 147, 148 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी तीन आरोपींना पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. भिमराव नामदेव तळेकर, मंगल नामदेव तळेकर, दत्तात्रय भीमराव तळेकर, निर्मला दत्तात्रय तळेकर, अमोल दत्तात्रय तळेकर अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस पुढील तपास करीत आहेत. (A young man was stabbed to death due to a minor reason in Solapur)

काय आहे प्रकरण ?

मयत अमोल तळेकर हा त्याच्या व भीमराव तळेकर यांच्या शेताच्या मधून असलेल्या सामायिक रस्त्यावरून त्यांची ट्रॅक्टर ट्रॉली घेऊन चालला होता. यावेळी त्यांच्या घराच्या बाजूस असलेल्या वळणावर ट्रॅक्टरचे मागील बाजूचे चाक भिमराव तळेकर यांनी ठेवलेल्या लाकडावर गेले. यावरुन भीमराव तळेकर यांनी अमोल यास शिवीगाळ केली. अमोल आणि त्याचे वडिल सुधाकर तळेकर यांनी याबाबत जाब विचारला असता भिमराव तळेकर यांना राग आला आणि ते आणखी मोठ्याने शिवीगाळ करू लागले. तसेच भिमराव तळेकर यांनी अमोलला खाली पाडून त्याच्या छातीवर बसले. मंगल भिमराव तळेकर हिने अमोल याचे हात पकडले. दत्तात्रेय भिमराव तळेकर याने अमोल याचे पाय पकडले. तर अमोल दत्तात्रय तळेकर याने त्याच्या घरातून एक गुप्तीसारखे लांब लोखंडी हत्यार आणले. निर्मला दत्तात्रय तळेकर हिने सुधीर तळेकर यांना जोरात ढकलून देऊन खाली पाडले आणि अमोल दत्तात्रय तळेकर याने त्याच्या हातातील लांब लोखंडी गुप्तीसारखे हत्यार अमोल तळेकर याच्या छातीमध्ये खोलवर भोसकले. यात अमोलचा जागीच मृत्यू झाला.

पाच जणांविरोधात गुन्हा दाखल, तिघांना अटक

याप्रकरणी अमोलचे वडील सुधीर तळेकर यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. तसेच अमोलच्या हत्येप्रकरणी भिमराव नामदेव तळेकर, मंगल नामदेव तळेकर, दत्तात्रय भीमराव तळेकर, निर्मला दत्तात्रय तळेकर, अमोल दत्तात्रय तळेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये तीन आरोपींना अटक केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी दिली. (A young man was stabbed to death due to a minor reason in Solapur)

इतर बातम्या

Bhandara Accident: अज्ञात टिप्परने दुचकिला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू तर एक गंभीर जखमी

Jharkhand Crime : धक्कादायक ! झारखंडमध्ये 12 वर्षाच्या मुलाकडून 5 वर्षांच्या मुलीवर अत्याचार

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.