Ahilyadevi Holkar : ‘अहिल्यादेवी होळकर जयंतीदिनी पवार आणि पडळकरांमध्ये जोरदार राजकारण; होळकर घराण्याच्या वंशजांची वादावर भूमिका काय?

पोलीस प्रशान हे पवारांच्या इशाऱ्यावर काम करतंय. असा आरोप पडकरांकडून करण्यात आला. या वादावर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटल्या. भाजप नेत्यांनी तर सरकारला यावरून घेरण्याचा प्रयत्न केला. आता या वादावर होळकर घराण्याचे वंशज भूषणसिंह होळकर यांची प्रतिक्रिया आली आहे.

Ahilyadevi Holkar : 'अहिल्यादेवी होळकर जयंतीदिनी पवार आणि पडळकरांमध्ये जोरदार राजकारण; होळकर घराण्याच्या वंशजांची वादावर भूमिका काय?
'अहिल्यादेवी होळकर जयंतीदिनी पवार आणि पडळकरांमध्ये जोरदार राजकारण; होळकर घराण्याच्या वंशजांची वादावर भूमिका काय?Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 31, 2022 | 10:41 PM

सोलापूर : आज अहिल्यादेवी होळकरांची (Ahilyadevi Holkar Jayanti)जयंती धडाक्यात साजरी होत असताना पुन्हा राजकीय आखाड्यात वाद रंगला. कारण रोहित पवार(Rohit Pawar) यांनी यंदा चौंडीत कार्यक्रमाचे आयोजन केले होत. तर दुसरीकडे धनगर नेते आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि सादाभाऊ खोत हे चौंडीकडे निघाले होते. मात्र पोलिसांना त्यांना मध्येच अडवलं. त्यानंतर सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला. रोहित पवारांना कार्यक्रमाला परवानगी मिळते. मात्र आम्हाला जायला परवानगी मिळत नाही. पोलीस प्रशान हे पवारांच्या इशाऱ्यावर काम करतंय. असा आरोप पडकरांकडून करण्यात आला. या वादावर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटल्या. भाजप नेत्यांनी तर सरकारला यावरून घेरण्याचा प्रयत्न केला. आता या वादावर होळकर घराण्याचे वंशज भूषणसिंह होळकर यांची प्रतिक्रिया आली आहे.

सर्वांना प्रवेश मिळाला पाहिजे

या वादाबाबत बोलताना भूषणसिंह होळकर म्हणाले. गोपीचंद पडळकर यांना प्रवेश दिला की नाही याबाबत मला कल्पना नाही. कारण माझा आणि त्यांचा तिथे संपर्क आला नाही. पण पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती सर्वांची आहे. या जयंतीला सर्वांना प्रवेश दिला जावा. अहिल्यादेवी या सर्वांच्याच आहेत त्यामुळे सर्वांना तिथे प्रवेश असायला हवा. त्यामुळे या वादात जाण्यापेक्षा समाजासाठी काहीतरी रचनात्मक काम करण्यावर भर दिला पाहिजे. समाजाला चांगली दिशा देण्याच्यादृष्टीने बघूयात. आत्तापर्यंत राजकारणामध्ये घडणाऱ्या गोष्टी आहेत त्यात कोण बरोबर, कोण चूक यामध्ये पडायला नको. अहिल्यादेवींच्या जयंतीनिमित्ताने आज आपण त्यांच्या विचारांवर कसे काम करता येईल. आज आपण समाजासाठी, देशासाठी काय करु याचा विचार केला पाहिजे, असे ते म्हणाले.

आमचा राजकारणपेक्षा समाजकारणावर भर

तर एकीकडे ओबीसी बांधव आपल्या शिष्यवृत्ती मिळाली नाही म्हणून भांडतात आणि दुसरीकडे आपण दाखवतोय की हनुमान चलीसा कोण चांगली म्हणतेय. त्या ठिकाणी हनुमान चालीसा ही वैयक्तिक अस्मिता आहे. मीही खूप चांगली हनुमान चलीसा म्हणतो पण याचा अर्थ त्याचे प्रदर्शन करावे असे नाही. ऐतिहासिक स्मारकामधून युवा पिढीला प्रेरणा दिली जावी. राज्यातील शेती आणि उद्योग धंद्या बरोबर टुरिजम व्यवसायाची जोड देणे गरजेचे आहे. आजच्या पिढीला इतिहास कळणे गरजेचे आहे. होळकर घराण्याचा राजकारणापेक्षा समाजकारणावर भर आहे. असेही ते म्हणाले. गोपीचंद पडळकरांना अडवल्यावरून भाजप नेते आता चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी सरकारवर यावरून जोरदार हल्लाबोल चढवला आहे.

हे सुद्धा वाचा
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.