सशस्त्र दरोड्यात एकाचा मृत्यू; कुटुंबियांना मारहाण करुन दागिने लंपास; सोलापूर जिल्ह्यातील घटना
सोलापूर जिल्ह्यातील बोरामणी-दर्गनहळ्ळी गावाजवळ असणाऱ्या एका घरावर सशस्त्र दरोडा पडल्याची घटना घडली. दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या दर्गनहळ्ळी गावात रात्री एकच्या सुमारास हा प्रकार घडला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून सोन्याचे दागिने लंपास केले आहेत.
सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील बोरामणी-दर्गनहळ्ळी (Boramani-Darganhalli) गावाजवळ असणाऱ्या एका घरावर सशस्त्र दरोडा (Armed robbery) पडल्याची घटना घडली. दक्षिण सोलापूर (South Solapur) तालुक्यातल्या दर्गनहळ्ळी गावात रात्री एकच्या सुमारास हा प्रकार घडला. हा दरोडा ज्यावेळी टाकण्यात आला त्यावेळी घरात असलेल्या वृद्धाने जोरदार विरोध केला. त्यामुळे त्यांच्यावर दरोडेखोऱ्याीनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने आणि दगडाने त्यांना मारहाण करण्यात आली. त्यांच्याबरोबरच त्यांच्या पत्नीलाही मारहाण करुन गळ्यातील आणि कानातील सोन्याचे दीड तोळ्याचे दागिने लंपास केले. दरोडेखोऱ्यांच्या हल्ल्यात वृद्ध बापू हिरजे यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
दरोडेखोऱ्यांना ज्यावेळी घरात प्रवेश केला त्यावेळी घरातील काही माणसांनी त्यांना विरोध केला म्हणून घरातील तीन ते चार लोकांना दरोडेखोरांनी बेदम मारहाण केली आहे. यामध्ये चार जण जखमी झाले असून त्यांच्याव दरम्यान या दरोडेखोरांच्या हल्ल्यात तीन ते चार लोक जखमी झाले असून जखमींनावर खासगी रूग्णालयात उपचार करण्यात आले. याप्रकरणाची तक्रार सोलापूर तालुका पोलीस स्थानकात दिली असून वळसंग पोलिसांची टीम पुढील तपास करत आहे.
दरम्यान या घटनेनंतर अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव तसेच संबंधित पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी श्वान पथकाच्या माध्यमातून दरोडेखोरांचा माग काढण्याचा प्रयत्न केला.
असा घडला घटनेचा थरार
दर्गनहळ्ळी गावातील दोन कुटुंबीयांवर दरोडेखोरांनी मध्यरात्री एकच्या सुमारास सशस्त्र हल्ला केला. यावेळी कुत्रे भुंकले म्हणून दर्गनहळ्ळी गावातील शरणप्पा पाटील यांची पत्नी घराबाहेर येऊन बघत होत्या. कुत्रे ज्या दिशेने भुंकत होते त्या दिशेला बॅटरीच्या प्रकाशात पाहण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी त्यांना दोन धारदार सशस्त्र दरोडेखोर निदर्शनास आले. सशस्त्र दरोडेखोर पाहिल्यानंतर त्यांनी आरडाओरड चालू केली. यावेळी दरोडेखोरांना घाबरुन त्यांचे पती शरणप्पा पाटील यांनी दोन मुले, सून आणि पत्नीला घरात घेतले. हा प्रकार चालू असतानाच त्यांनी फोनवरून गावातील लोकांना ही घटना सांगितली. त्यावेळी त्यांचे पुतणे, भाऊ त्याठिकाणी आल्यावर त्यांच्यावर दरोडेखोरांनी दगडफेक केली. नातेवाईक आले म्हणून ज्यावेळी शरणप्पा बाहेर आले तेव्हा दबा धरुन बसलेल्या दरोडेखोरांना त्यांच्यावर सत्तूरने हल्ला केला. यामध्ये जखमी होऊन त्यांच्या हातावर सहा टाके पडले आहेत. त्यानंतर काही वेळाने गावातील तीस ते चाळीस लोकांचा जमाव घटनास्थळी दाखल झाल्याने जरोडेखोरांनी पळ काढला.
असा पडला दरोडा
पुढे जाऊन या दरोडेखोरांनी गावच्या वेसीपासून काही अंतरावर असलेल्या बापू हिरजे यांच्या वस्तीवर दरोडा टाकला. यावेळी हिरजे कुटुंबातील सोमा हिरजे हे द्राक्ष हंगाम सुरू असल्याने द्राक्षबागेत कामासाठी गेले होते तर त्यांचे वृद्ध आई-वडील घरीच होते. त्यावेळी हे दरोडेखोर गावापासून दूर असलेल्या हिरजे यांच्या घरात घुसले. त्यांनी वृद्ध दाम्पत्याकडे सोने आणि पैश्याची मागणी केली मात्र त्याला बापू हिरजे यांनी विरोध केला. त्यामुळे दरोडेखोरांनी त्यांच्या डोक्यात धारदार शस्त्राने हल्ला करत त्यांना जखमी केले तर त्यांच्या पत्नी सुलोचना यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण, कानातले सोन्याचे दागिने घेतले आणि त्यांचे हातपाय बांधून त्यांना डांबले. त्यानंतर दरोडेखोरांनी तेथून पळ काढला.
श्वान पथकाची मदत
दरम्यान या घटनेची माहिती वळसंग पोलिसांना कळविल्यानंतर तात्काळ वळसंग पोलिसांचे पथक दर्गनहळ्ळी गावात दाखल झाले. यावेळी वळसंग पोलिसांनी सोलापूर तालुका पोलिस स्टेशनला घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्यांचेही पथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी डॉग स्कॉडच्या मदतीने दरोडेखोरांचा माग काढण्याच प्रयत्नही श्वान पथकाने केला. दरम्यान सकाळी अप्पर पोलिस अधिक्षक हिम्मतराव जाधव यांनी घटनस्थळी भेट दिली. या घटनेबाबत पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सूरू आहे.
संबंधित बातम्या
मालेगावात व्यावसायिकाच्या ऑफिसमधून 21 लाखांची चोरी, चोरांच्या सुळसुळाटाने नागरिक हैराण