Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Harshvardhan Patil : भरणे तर कमिशन एजंट… तेराशे कोटी मधील भरणे तुमच्या कमिशनचा हिस्सा किती? माजी मंत्री हर्षवर्धन पाटील भरणेवर सडकून टीका

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे नेहमीच आपल्या भाषणात इंदापूर तालुक्याचे विकास कामासाठी तेराशे कोटी निधी आणल्याचं सांगत असतात, या विषयाचा धागा पकडत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भरणें असा सवाल केला आहे की भरणे हे कमिशन एजंट आहेत, त्यांच्या गाडीत ठेकेदार बसलेले असतात, तेराशे कोटी विकास निधी आणला असे म्हणता पण त्यातील तुमचा हिस्सा किती, तुमच्या घरचा वॉल कंपाऊंड चा हिस्सा किती?

Harshvardhan Patil : भरणे तर कमिशन एजंट... तेराशे कोटी मधील भरणे तुमच्या कमिशनचा हिस्सा किती? माजी मंत्री हर्षवर्धन पाटील भरणेवर सडकून टीका
Harshawardhan PatilImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 09, 2022 | 12:49 PM

इंदापूर –  महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi government) वीजतोडणी मोहिमेच्या निषेधार्थ रस्ता रोको आंदोलन केले. आज माजी मंत्री हर्षवर्धन पाटील(Former Minister Harshvardhan Patil) यांनी अत्यंत परखड शब्दात राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे (Minister of State Dattatreya Bharne) यांच्यावर टीकास्त्र केले. भरणे हे निष्क्रिय आमदार असून त्यांच्यामुळेच इंदापूर तालुक्यावर अशी वेळ आली आहे. पूर्वीच्या काळात ज्या वेळी मी स्वतः मंत्रिमंडळात होतो. त्यावेळी एखाद्या गावात मंत्र्यांचा दौरा असेल तर त्या गावात रांगोळ्या काढल्या जायच्या, गुढ्या उभारल्या जायच्या, महिला मंत्र्यांचे औक्षण करायच्या, मंत्र्यांचे मोठ्या थाटामाटात स्वागत केले जात होते.  मात्र आज आपल्या तालुक्याची परिस्थिती वेगळीच आहे.  काल आपले महाशय (दत्तात्रय भरणे यांच नाव न घेता) एका गावात भूमिपूजनासाठी गेले होते, मात्र त्या ठिकाणी लाईट नसल्यामुळे अंधारात त्यांना भूमिपूजनाचा कार्यक्रम करावा लागला, त्यामुळे एखादा मंत्री जर एखाद्या गावात उद्घाटनाला जात असेल व त्या ठिकाणी त्या गावचा लाईन मन जर तुमचे ऐकत नसेल, तर भरणे तुम्ही राजीनामा द्या, पुढचे बघू काय करायचे ते आम्ही बघू अशी टीका यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भरणेंवर केली.

तुम्हाला फक्त कमिशन घ्यायचं कळते काय?

भरणे यांच्यावर ती टीका करत असताना पाटील पुढे म्हणाले, हे म्हणतात माझं कुणी एकत नाही, मला यातलं काय समजत नाय, मग तुम्हाला फक्त कमिशन घ्यायचं कळतं काय अशे म्हणताच उपस्थितांत हशा पिकला.

तेराशे कोटी मधील तुमचा हिस्सा किती?

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे नेहमीच आपल्या भाषणात इंदापूर तालुक्याचे विकास कामासाठी तेराशे कोटी निधी आणल्याचं सांगत असतात, या विषयाचा धागा पकडत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भरणें असा सवाल केला आहे की भरणे हे कमिशन एजंट आहेत, त्यांच्या गाडीत ठेकेदार बसलेले असतात, तेराशे कोटी विकास निधी आणला असे म्हणता पण त्यातील तुमचा हिस्सा किती, तुमच्या घरचा वॉल कंपाऊंड चा हिस्सा किती? आत्तापर्यंत बारामती तालुक्यातील काटेवाडी येथील नेते हे इंदापूर मध्ये जागा, जमिनी घेत होते, मात्र आता इंदापूरचे पुढारी काटेवाडी मधील जागा, जमिनी घेत असल्याचा आरोप यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी भरणे यांचे नाव न घेता त्यांच्यावर ती केला. भरणे हे गेली सात वर्षे आमदार आहेत गेली दोन वर्षे ते मंत्रिमंडळात आहेत, मात्र त्यांनी एकही काम शेतकऱ्यांच्या हितासाठी केले नाही उलट इकडे शेतकरी मरतोय मात्र हे मंत्री महोदय मिरवणूक काढतात, घोड्यावरती बसतात, डान्स करतात, मटनाच्या पार्ट्या करत आहेत तिकडे शेतकरी बळीराजा मरतोय त्यामुळे यांना जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटली पाहिजे, असा गंभीर आरोप यावेळी पाटील यांनी भरणे यांचे नाव न घेता केला.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनानंतर आंदोलन स्थगित

जोपर्यंत वीज जोडली जात नाही तोपर्यंत रस्त्यावर हटणार नाही, अशी भूमिका आक्रमक भूमिका आंदोलकांनी घेतली होती. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भ्रमणध्वनीवरून स्पीकर ऑन करीत उपस्थित आंदोलकांना सांगितले. आम्ही देखील विजेचा प्रश्न उचलून धरत आहोत, शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही. अधिवेशन संपेपर्यंत योग्य तो सकारात्मक निर्णय आम्ही सरकारला घ्यायला लावू असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलकाना फोनवरून दिले. देवेंद्र फडणवीस ययांच्याशी चर्चा झाल्यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन आंदोलन मागे घेतले. महावितरणला उद्या संध्याकाळपर्यत वीजपुरवठा सुरळीत करावा अन्यथा यापुढील आंदोलन तीव्र स्वरूपाचे केले जाईल असा इशारा हर्षवर्धन पाटील यांनी सरकारला दिलाय.

मधुमेहाच्या रुग्णांना 45 टक्के किडनीचे आजार होण्याचा धोका, या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका!

भाजपच्या एका नेत्याची माझ्याकडेही तक्रार आली, फडणवीसांना सत्यता तपासण्यास सांगितलं, पवारांचा मोठा गौप्यस्फोट

Lockupp Show : स्वप्नील ते साईशा… लॉकअप शोमधली स्पर्धक साईशा शिंदे प्रवास, जाणून घ्या तिची लाईफस्टोरी!

एका हातात मोबाईल अन् दुसऱ्या हातात स्टेअरिंग... बस चालकाचा बघा प्रताप
एका हातात मोबाईल अन् दुसऱ्या हातात स्टेअरिंग... बस चालकाचा बघा प्रताप.
मनसेची मान्यता रद्द करण्याची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल
मनसेची मान्यता रद्द करण्याची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल.
स्मृती इराणी यांनी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरवं, सिलेंडर आम्ही पुरवू
स्मृती इराणी यांनी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरवं, सिलेंडर आम्ही पुरवू.
टीव्ही 9च्या उपक्रमाचे पंतप्रधान मोदींकडून कौतुक
टीव्ही 9च्या उपक्रमाचे पंतप्रधान मोदींकडून कौतुक.
लाडक्या बहिणींची पात्रता पडताळणी ठप्प
लाडक्या बहिणींची पात्रता पडताळणी ठप्प.
साहेबांच्या कार्यकर्त्याचा आमदार निवासात मृत्यू
साहेबांच्या कार्यकर्त्याचा आमदार निवासात मृत्यू.
सचिन खरात यांची मेधा कुलकर्णी यांच्यावर टीका
सचिन खरात यांची मेधा कुलकर्णी यांच्यावर टीका.
.. तरच आम्ही हे राम राज्य असल्याचं मानू, आदित्य ठाकरेंचं भाजपला चॅलेंज
.. तरच आम्ही हे राम राज्य असल्याचं मानू, आदित्य ठाकरेंचं भाजपला चॅलेंज.
काहीतरी वाटू द्या, काँग्रेसच्या नेत्या भडकल्या, भाजप खासदाराला सुनावलं
काहीतरी वाटू द्या, काँग्रेसच्या नेत्या भडकल्या, भाजप खासदाराला सुनावलं.
कराडकडून पतीवर हल्ला, तक्रार करायला गेली पण.., गित्तेच्या पत्नीचा आरोप
कराडकडून पतीवर हल्ला, तक्रार करायला गेली पण.., गित्तेच्या पत्नीचा आरोप.