उजनी धरण पात्रात मृत्यूचे तांडव; बोट उलटून 6 जणांना जलसमाधी

Boat sank in Ujani Dam : उजनी धरणाच्या पात्रात, भीमा नदीमध्ये वादळी वाऱ्याने घात केला. एक बोट उलटून सहा जण बेपत्ता असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तर एका जणाला पोहता आल्याने त्याचा जीव वाचला आहे. एक वर्षाचे बालक पण यामध्ये आहे. 

उजनी धरण पात्रात मृत्यूचे तांडव; बोट उलटून 6 जणांना जलसमाधी
बोट उलटली; 6 जण बेपत्ता
Follow us
| Updated on: May 22, 2024 | 2:05 PM

उजणी धरणात काल संध्याकाळी वादळी वारा आणि पावसाने बोट उलटून अपघात झाला होता. त्यात सहा जणांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी संध्याकाळी रात्री शोध मोहिम थांबविण्यात आली होती. त्यानंतर आज सकाळी पुन्हा शोध मोहिम हाती घेण्यात आली. त्यात बुडालेली लाँच सापडली होती. NDRF पथकाने शोध मोहिम राबविल्यानंतर सहा जणांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे मृतांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

रणजितसिंह नाईक निंबाळकर घटनास्थळी

हे सुद्धा वाचा

दरम्यान धरण पात्रात जिथे बोट बुडाली त्याठिकाणी माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर बोटीने दाखल झाले आहेत. NDRF च्या बोट मध्ये बसून ते घटनास्थळी पोहोचले आहेत. घटनास्थळी 35 फूट पाण्याखाली एका खडकावर अडकली आहे. त्याठिकाणी चप्पल, पर्स, हेल्मेट आदी गोष्टी सापडल्या आहेत. लवकरच पाणबुडीच्या सहाय्याने शोध मोहीम सुरू करण्यात येणार आहे.  त्यासाठी महाराष्ट्र अंडर वॉटर सर्व्हिसेस विजय दशरथ शिवतारे वारजे माळवाडी टीम दाखल झाली आहे. बनारसी चौहान ही व्यक्ती आता तळाशी शोध घेणार आहे. करमाळा आणि इंदापूर तालुक्याच्या सीमेवर ही दुर्घटना घडली आहे.

नेमकं काय घडलं

करमाळा तालुक्यातील कुगाव येथील सात जणं बोटीने इंदापूर तालुक्यातील कळशी येथे जाण्यासाठी निघाले. दरम्यान जोरदार हवेने प्रवासात अडथळे येत होते. वादळीवाऱ्याने ही बोट उलटली. बोट भीमा नदीत बुडाली. या नावेत एकूण सात प्रवासी होते. त्यात एक वर्षांचे मुल असल्याचे समोर येत आहे. त्यातील एक प्रवाशी पोहता येत असल्याने पोहत किनाऱ्यावर आला. वादळी वारे आणि जोरदार पावसाने हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.

सहा प्रवासी अद्याप बेपत्ता

आतापर्यंत सहा प्रवाशांची कुठलीच माहिती समोर आलेली नाही. रात्री शोध मोहिमेअत डथळे आले. रात्री जवळपास 9 वाजता शोध मोहिम थांबविण्यात आली. आज सकाळी पुन्हा शोध मोहिम हाती घेण्यात आली. NDRF ची टीम कळशी गावात पोहचली आणि तिने शोध मोहिम सुरु केली आहे. शोध मोहिमेसंबंधीचा एक व्हिडिओ पण समोर आला आहे.

पोलिसांचे म्हणणे काय

पुणे ग्रामीण पोलिसांच्या म्हणण्यानुसार, घटनास्थळी व्यापक शोध मोहिम हाती घेण्यात आली आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ, स्थानिक प्रशासन आणि पोलिस शोध मोहिमेत सहभागी आहेत. दुर्घटनेवेळी चार पुरुष, दोन महिला आणि दोन छोट्या मुलींसह एकूण 8 प्रवाशी या बोटीत होते. त्यातील एक जण पोहता येत असल्याने वाचला.

हे सहा जण बेपत्ता

  • 1) कृष्णा दत्तू जाधव 28 वर्ष
  • 2) कोमल कृष्णा जाधव 25 वर्ष
  • 3) वैभवी कृष्णा जाधव 2.5 वर्ष
  • 4) समर्थ कृष्णा जाधव 1 वर्ष रा. झरे ता. करमाळा
  • 5) गौरव धनंजय डोंगरे 21 वर्ष
  • 6) अनिकेत ज्ञानदेव अवघडे 21 वर्ष रा कुगांव. ता. करमाळा
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.