बोम्मईचं वक्तव्य म्हणजे भाजपची रणनीती, संजय राऊत यांचा आरोप
. अक्कलकोटसह जतवरही बोम्मई यांनी दावा केल्यानं आंदोलन सुरू झालं. सोलापुरातही राष्ट्रवादीनं आंदोलन करत निषेध केला.
मुंबई – कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी चिथावणीखोर वक्तव्य केलं. त्यावरून देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा त्यांना प्रत्युत्तर दिलं. मात्र, ही भाजपचीच रणनीती असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील राज्यपालांचं वक्तव्यावरील लक्ष हटविण्यासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना स्क्रीप्ट देण्यात आलं, असं संजय राऊत यांनी म्हंटलं. कर्नाटचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या विरोधात आंदोलनं सुरू झालीत. कर्नाटकच्या बसवर जय महाराष्ट्र लिहून इशारा देण्यात आला. बोम्मई यांच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. जत आणि ४० गावं आमची असल्याचा दावा कर्नाटकनं केलाय. महाराष्ट्राची एक इंचही जागा जाऊ देणार नसल्याचं आंदोलकांनी म्हंटलय. शिवसैनिक रक्त सांडायला तयार असल्याचं ते म्हणाले.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरात यावं नि सांगावं जत माझं. मग, महाराष्ट्र कसा ते आम्ही तुम्हाला सांगतो. अक्कलकोटसह जतवरही बोम्मई यांनी दावा केल्यानं आंदोलन सुरू झालं. सोलापुरातही राष्ट्रवादीनं आंदोलन करत निषेध केला.
जोडो मारो आंदोलन केलं. आधी जतसह ४० गावांवर दावा केला. त्यानंतर अक्कलकोटसह सोलापूर कर्नाटकात सामील करण्याची मागणी केली.
संजय राऊत म्हणाले, फार मोठं भाजपचं षडयंत्र आहे. महाराष्ट्रातील राज्यपालांच्या विरोधातील विषयाकडून लोकं दुसऱ्या विषयाकडं वळावेत, यासाठीचा हा प्रयत्न असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला.
आशिष शेलार म्हणाले, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या भूमिकेबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट मांडलेली आहे. एकही गाव महाराष्ट्रातला जाण्याचा प्रश्न येत नाही. सर्वोच्च न्यायालयात आम्ही आमची भूमिका मजबूत मांडली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री हे सर्वोच्च न्यायालयाच्या वर नाहीत, असंही शेलार यांनी स्पष्टपणे सांगितलं.