VIDEO : सोलापूरमध्ये व्यापाऱ्याकडे सिनेस्टाईल खंडणीची मागणी, घटना कॅमेऱ्यात कैद
सिनेस्टाईलने भराडिया यांच्याकडे 5 लाख रुपये खंडणीची मागणी केली. तसेच दरमहा 50 हजार रुपये हफ्ता देण्यासाठीही धमकावले. या घटनेमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण असून बार्शीचा बिहार झाल्याची खंत व्यापाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान घटनेनंतर आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी बार्शी पोलिसांच्या दोन टीम रवाना करण्यात आल्या आहेत.
सोलापूर : स्टोन क्रशर व्यापाऱ्या (Businessman) कडे सिनेस्टाईल खंडणी (Cinestyle Ransom) मागितल्याची घटना सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात घडली आहे. अज्ञाताकडून व्यापाऱ्याकडे 5 लाखाची खंडणीची मागणी करण्यात आली. सुनील भराडिया असे पिडीत व्यापाऱ्याचे नाव आहे. खंडणीची मागणी करतानाची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याव्यतिरिक्त आरोपीने व्यापाऱ्याकडे दरमहा हफ्ता देण्याचीही मागणी केली. ही घटना शुक्रवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. हा आरोपी भराडिया यांच्याकडे गेल्या दोन दिवसांपासून खंडणीची मागणी करत होता. या प्रकरणी बार्शी ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (Cinestyle ransom demand from trader in Solapur, incident captured on camera)
5 लाखाच्या खंडणीसह दरमहा 50 हजार हफ्ता देण्याची मागणी
बार्शीतील ताड सौंदणे येथील सुनील भराडिया यांचा स्टोन क्रशरचा व्यवसाय आहे. भराडिया हे शुक्रवारी रात्री आपल्या कार्यालयात बसले होते. यावेळी अचानक दोन अज्ञात इसम त्यांच्या कार्यालयात घुसले आणि त्यांच्याकडे पैशाची मागणी करु लागले. भराडिया यांनी पैसे देण्यास नकार दर्शवल्याने त्यापैकी एकाने भराडिया यांची गच्ची पकडली. यानंतर सिनेस्टाईलने भराडिया यांच्याकडे 5 लाख रुपये खंडणीची मागणी केली. तसेच दरमहा 50 हजार रुपये हफ्ता देण्यासाठीही धमकावले. या घटनेमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण असून बार्शीचा बिहार झाल्याची खंत व्यापाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान घटनेनंतर आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी बार्शी पोलिसांच्या दोन टीम रवाना करण्यात आल्या आहेत. त्यापैकी एक टीम टेंभुर्णी तर दुसरी टीम सोलापुरला रवाना झाली आहे. खंडणी वसूल करणारे हे अज्ञात असून एकाचे नाव समाधान असल्याचे भराडीया यांना समजले आहे.
औरंगाबादमध्ये बोगस पोलिसांनी वृ्द्धाला लुटले
भर बाजारात पोलिसाच्या वेशातील दोन चोरट्यांनी एका निवृत्त मुख्याध्यापकाला लुटल्याची घटना औरंगाबादमधील शिवाजी नगर परिसरात घडली आहे. एवढं सोनं घालून कुठे फिरता असे विचारत आधी मुख्याध्यापकाला बोलण्यात गुंतवले. त्यांना अंगावरचं सोनं काढून ठेवायला सांगितले. त्यानंतर हातचलाखी करत हे सोनं स्वतःच्या खिशात घालून चोरट्यांनी पोबारा केला. लुटीचा प्रकार लक्षात येताच मुख्याध्यापकाने याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली. (Cinestyle ransom demand from trader in Solapur, incident captured on camera)
Solapur | बार्शीत उद्योजक सुनील भराडिया यांना मागितली 5 लाखाची खंडणी; Video व्हायरल @TV9Marathi pic.twitter.com/aUQKQzO57e
— sagar surawase (@sagarsurawase) February 12, 2022
इतर बातम्या
Nagpur Crime | ससेगावात गावठी बॉम्बचा स्फोट, तीन जणांच्या डोळ्यात गेली माती, काय आहे प्रकरण?
Pune crime | मोहोळ- शेलार टोळीच्या एकमेकांवर वादातून केला हल्ला ; पोलिसांनी उचललं हे पाऊल