“…अन्यथा अमोल मिटकरींचा संजय राऊत होईल”; काँग्रेसच्याच नेत्याची मिटकरींवर तिखट प्रतिक्रिया

आपण देवेंद्र फडणवीस यांच्या पेक्षा मोठे आहोत हे सांगणारी जाहिरात प्रसिद्ध केली होती. मात्र त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून जाहिर करण्यात आलं आहे.

...अन्यथा अमोल मिटकरींचा संजय राऊत होईल; काँग्रेसच्याच नेत्याची मिटकरींवर तिखट प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: Jun 20, 2023 | 5:43 PM

सोलापूर : राज्यातील राजकारणात आघाडी आणि युतीविषयी मोठ मोठे निर्णय होत असतानाच आता महाविकास आघाडी राहणार की बिघाडी होणार याबाबत आता शंका कुशंका व्यक्त केल्या जात आहेत. युती-आघाडी असली तरी आता आरोप-प्रत्यारोपांच्या एकमेकांवर फैरी झडत आहेत. एकीकडे महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांकडून भविष्यात सर्व निवडणुका मविआच्या म्हणूनच लढणार असल्याचे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे आता मित्र पक्षापक्षामध्येच वादाच्या ठिणग्या पडत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून आमदार अमोल मिटकरी आणि खासदार संजय राऊत यांच्यावर आता विरोधकांएवढीच टीका मित्र पक्षाकडून केली जात आहे. काँग्रेसच्या नेत्याने आता अमोल मिटकरी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

अंतर्गत कलह उफाळून येणार

त्यांच्या त्या वक्तव्यामुळे अमोल मिटकरी यांचा संजय राऊत होण्यास वेळ लागणार नाही असा टोला काँग्रेस प्रवक्त्यांनी लगावला आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर काँग्रेसने निशाणा साधल्यामुळे आता महाविकास आघाडीतील अंतर्गत कलह उफाळून येणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.

जागा आता कमी होणार

काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी अमोल मिटकरी यांच्यावर टीका करताना विरोधीपक्ष नेता कोण असेल याचा निर्णय संख्याबळावर होतं असतो. त्यामुळे विधानपरिषदेत राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे नऊ नऊ जागा होत्या तर आता आमदार मनिषा कायंदे या शिंदे गटात गेल्याने त्यांची जागा आता कमी होणार आहे. त्यामुळे संख्याबळाचे गणित बिघडू शकते अशी शक्यताही त्यांनी यावेळी वर्तवली आहे.

आता लुडबूड नको

काकासाहेब कुलकर्णी यांनी महाविकास आघाडीतील काही नेत्यांना विनंती केली आहे. विरोधी पक्ष नेता कोण होईल याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल, त्यामुळे आता लुडबूड करण्यात मजा नाही असा टोला त्यांनी मित्रपक्ष राष्ट्रवादीला लगावला आहे.

मिटकरींमध्ये उद्याचा संजय राऊत

विरोधी पक्षनेत्यांविषयी बोलताना कुलकर्णी यांनी त्यांना सल्ला देताना म्हटले आहे की, अमोल मिटकरी यांनी आता कुठंतरी थांबलं पाहिजे. नाहीत त्यांच्यामध्ये असणारा उद्याचा संजय राऊत मला आज दिसतोय असा खोचक टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.

त्यामुळे आता मविआमधील वाद आणखी चिघळणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे. तसेच मिटकरी यांनी योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी थांबलं नाही तर ते महाराष्ट्रात नेते म्हणून परिचत होतील अन्यथा त्यांचा संजय राऊत झाल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही त्यांनी त्यांना दिला आहे.

फडणवीस सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री

काकासाहेब कुलकर्णी यांनी यावेळी भाजप-शिवसेनेवरही त्यांनी निशाणा साधला आहे. काही दिवसांपूर्वी शिंदे गटाने स्वतःच स्वतःचा सर्व्हे केला होता. त्यानंतर आपण देवेंद्र फडणवीस यांच्या पेक्षा मोठे आहोत हे सांगणारी जाहिरात प्रसिद्ध केली होती. मात्र त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून जाहिर करण्यात आलं आहे. त्यामुळे लगीन लोकांचं आणि नाचतय येड्या डोक्याचं ही म्हण या दोघांना लागू होते असा खोचक टोला त्यांनी त्यांना लगावला आहे.

Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....