देशात जॉबलेस नव्हे तर जॉब लॉस झाला आहे; प्रणिती शिंदे यांची केंद्र सरकारवर टीका; अजित पवारांवरही जोरदार हल्लाबोल

प्रणिती शिंदे यांनी काश्मीर पंडित स्थलांतराविषयी बोलताना सांगितले की, मोदी सरकारकडून जातीपातीचे राजकारण होत आहे. ज्याठिकाणी महागाई किंवा भाववाढ कमी व्हायचे सोडून रोजगार कमी झाले.

देशात जॉबलेस नव्हे तर जॉब लॉस झाला आहे; प्रणिती शिंदे यांची केंद्र सरकारवर टीका; अजित पवारांवरही जोरदार हल्लाबोल
Follow us
| Updated on: Jun 17, 2022 | 4:20 PM

सोलापूर: महापालिका निवडणुकांच्या (Municipal elections) पार्श्वभूमीवर काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांच्या ग्राऊंडवर्क पाहायला मिळत आहे. आज शहरातील सव्वा कोटी रुपयांच्या रस्ता कामांचे उद्घाटन आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी विविध विषयावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी टीका केली होती की, सोलापूर जिल्ह्यात एकाचवेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपद दिले होते. मात्र तरीही त्यांना पाण्याचा प्रश्न (Solapur Water Issue) काय आहे अशी टीका त्यांनी केली होती. त्या टीकेला प्रणिती शिंदे यांनी उत्तर देत म्हणाल्या की, अजितदादा काय म्हणाले मला माहिती नाही मात्र सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूरसाठी काय केले आहे हे सर्व सोलापूरकरांना माहिती आहे. उजनीची पाईपलाईन सुशीलकुमार शिंदे यांनीच आणली आहे. त्यातूनच येणाऱ्या दोनशे वर्षे सोलापूरकर पाणी पिणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सोलापूरला आठ दिवसाआड पाणी पुरवठा होण्यासाठी भाजप जबाबदार असल्याचेही मत ही त्यांनी यावेळी व्यक्त केले. दुहेरी पाईपलाईनसाठी एक वीटही रचली गेली नाही. त्याबरोबरच ज्यावेळी सोलापूरसाठी पाण्याचा कोणताही स्त्रोत नव्हता त्यावेळी सुशीलकुमार शिंदे यांनी तो मिळवून दिला आहे.

मोदी सरकारकडून जातीपातीचे राजकारण

प्रणिती शिंदे यांनी काश्मीर पंडित स्थलांतराविषयी बोलताना सांगितले की, मोदी सरकारकडून जातीपातीचे राजकारण होत आहे. ज्याठिकाणी महागाई किंवा भाववाढ कमी व्हायचे सोडून रोजगार कमी झाले. देशात जॉबलेस नव्हे तर जॉब लॉस झाला आहे, आणि सगळे जीडीपी वाढला असल्याचे सांगत आहेत. मात्र देशात दोन लोकांमुळे जीडीपी वाढतो आहे अशी टीका करत अदानी आणि अंबानी यांचे नाव न घेता त्यांनी त्यांच्यावर टीका केली.

सर्वसामान्य लोकांना नोकऱ्या नाहीत

यावेळी जीडीपीविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, सर्वसामान्य लोकांना नोकऱ्या नाहीत तरी सरकारकडून वेगळ्याच मुद्यावर राजकारण केलं जात असल्याचे सांगत त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. जेव्हा देशावर आर्थिक संकट येतात तेव्हा मोदी सरकार जातीपातीचे राजकारण करत असते. त्यामुळे ही फक्त दिशाभूल करण्याची गोष्ट आहे. जेव्हापासून ते सत्तेत आले आहेत, तेव्हापासून सगळीकडे जातीपातीचे राजकारण सुरु असल्याची टीकाही त्यांनी केली.आपल्या देशासाठी हा खूपच विचित्र आणि वाईट काळ आहे. त्याच्याविरुद्ध आपण सर्वांनी फक्त बोलणेच नव्हे तर वागणे देखील गरजेचे आहे

आम्हाला घोडेबाजार करायची गरज नाही

राज्यसभेच्या घोडे बाजाराविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, आम्हाला घोडेबाजार करायची गरज नाही. आमच्याकडे आकडे आहेत. त्यामुळे आम्ही कशाला घोडेबाजार करु असा सवालही त्यांनी विरोधकांना केला आहे. भाजपने त्यांचा उमेदवार मागे घ्यायला हवा होता मात्र त्यांना एवढा ओव्हर कॉन्फिडंस कसा आला मला माहिती नाही.पण आमचे नंबर आणि आमचे उमेदवारही त्यांनी सेफ असल्याचे सांगितले.

काही लोकांनी पसरवलेली ही अफवा

नवनीत राणा यांच्याविरोधात अमरावतीतून लोकसभा निवडणूक लढावी अशी मागणी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी केली होती त्यावर बोरलताना त्यांनी सांगितले की, काही लोकांनी पसरवलेली ही अफवा आहे. त्याच्याबद्दल मी जास्त काही बोलू इच्छित नाही.

काँग्रेसचं जिल्हास्तरीय चिंतन शिबीर होणार

यावेळी प्रणिती शिंदे यांनी सांगितले की, 9 ते 14 तारखे दरम्यान जिल्हास्तरीय चिंतन शिबीर होणार असून काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष आणि आमदार प्रणिती यांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, ज्या राज्यात आमचे सरकार आहे तिथे प्रलंबित नोकरी भरती, मुलींना सायकल वाटप करण्यावर आमचा भर असणार आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत 50 टक्के युवकांना किंवा 50 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या उमेदवारांना संधी देणार आहोत. तसेच काँग्रेस रस्त्यावर आहे आणि जनतेसाठी रस्त्यावर उतरणार असून अनेक ठिकाणी आंदोलने करणार आहे असंही त्यांनी सांगितले.

माझा कोणताही गैरसमज झालेला नव्हता

प्रणिती शिंदे यांनी सांगितले की, माझा कोणताही गैरसमज झालेला नव्हता मी फक्त एवढेच म्हणाले की, जे कोणी आमच्या हक्काचे पाणी आहे ते कोठेही वळवू देणार नाही.मी सोलापूरची लोकप्रतिनिधी असून त्या पाण्यावर आमचा अधिकार आहे. दुसरा कोणी हक्क सांगत असेल तर हे कोणालाच पटणार नाही.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.