ते खाते मला पसंत नव्हतं, तरीही मला ते खाते दिले; शिंदे-फडणवीस सरकारमधील नाराजीचा सूर चव्हाट्यावर
सत्ता बदलानंतर आपणास आरोग्य खाते दिले मात्र आपल्याला आरोग्य खाते पसंत नव्हते. त्याबाबत मी नाराज होतो पण तरीही सेवाभावी वृत्तीने काम करत आहे. आणि आता ते खातंही आवडतं आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले आहे.
पंढरपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही महिन्यापूर्वी मुंबई-सूरत-गुवाहाटी-गोवा आणि पुन्हा मुंबई असा प्रवास करून राज्यातील महाविकास आघाडीला त्यांनी पायउतार केले होते. त्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होणार कधी असा सवाल वारंवार केला जात आहे. मात्र अजूनही मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. त्यातच या शिंदे-फडणवीस सरकारमध्ये एकही महिला मंत्री नसल्यामुळे त्यामुळेही त्यांच्यावर टीका केली जात आहे.
त्यामुळे राज्यमंत्रिमंडळाचा विस्ताराच्या चर्चा चालू असतानाच आता शिंदे-फडणवीस सरकारमधील नाराजी उफाळून आली आहे.
त्यामुळे आता पुन्हा एकदा शिंदे फडणवीस सरकारविषयी जोरदार चर्चा होऊ लागली आहे. याआधीही मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटप याबद्दल वेगवेगळ्या चर्चा झाल्या असल्यातरी आता आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आपली नाराजी उघड उघडपणे बोलून दाखवल्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारमधील नाराजीचा सूर आता चर्चेला आहे.
राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारापूर्वीच पालकमंत्री पदावरून आणि खाते वाटपावरून आता भाजपा-सेनेत नाराजीचा सूर दिसत असल्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या वक्तव्यावरून दिसून आले आहे.
सोलापूरच्या पालकमंत्री पदावरून भाजप आणि शिवसेनेत आता वादाची ठिणगी पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे खातेवाटप आणि मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याची माहिती नसली तरी मंत्रिमंडळात सध्या नाराजीचा सूर आळवला जात आहे त्याची मात्र सध्या जोरदार चर्चा सुरु असल्याचे दिसून येत आहे.
आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आपल्या मंत्रिपदाविषयी आणि पालकमंत्री पदाविषयी बोलताना सांगितले की, सोलापूरचे पालकमंत्री पद हवे होते मात्र धाराशिव आणि परभणीचे पालकमंत्री पद आपल्याला देण्यात आले.
सोलापूरचा पालकमंत्री असतो तर सावंत काय निधी देऊ शकतात हे सोलापूरकरांनी पाहिले असते, मात्र आता जर निधी मिळत नसेल तर माझ्या भैरवनाथ शुगरमधून विकासाला पैसे देऊ आणि विकास घडवून आणू अशी वक्तव्यही त्यांनी केले आहे. त्यामुळे तानाजी सावंत चर्चेत आले आहेत.
सत्ता बदलानंतर आपणास आरोग्य खाते दिले मात्र आपल्याला आरोग्य खाते पसंत नव्हते. त्याबाबत मी नाराज होतो पण तरीही सेवाभावी वृत्तीने काम करत आहे. आणि आता ते खातंही आवडतं आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले आहे.
त्यामुळे सोलापूरचे पालकमंत्री पदावरून व खाते वाटपावरून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांवर आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची अप्रत्यक्ष नाराजी असल्याचेच यावेळी दिसून आले.