“भाजप पैसे देऊन नेत्यांना खरेदी करतंय”; काँग्रेसच्या नेत्याने मोदी सरकारवर डागली तोफ…

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात बीआरएसची कोणतीही जादू चालणार नाही. कारण त्या पक्षाची विचारसरणी वेगळी आहे, आणि महाराष्ट्राची विचारधारा वेगळी असल्याचे सांगत त्यांनी बीआरएसवरही जोरदार निशाणा साधला आहे.

भाजप पैसे देऊन नेत्यांना खरेदी करतंय; काँग्रेसच्या नेत्याने मोदी सरकारवर डागली तोफ...
Follow us
| Updated on: Jun 28, 2023 | 7:12 PM

सोलापूर : देशासह वेगवेगळ्या राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर देश भ्रष्टाचार मुक्त करु असं अश्वासन भाजपकडून देण्यात आले होते. त्यानंतरही अनेक राज्यातील निवडणुका झाल्यानंतरही भाजपकडून त्याच प्रकारचे अश्वासन देण्यात आले मात्र देश भ्रष्टाचार मुक्त झाला नाही तर भ्रष्ट नेते मात्र भाजपमध्ये गेले असल्याचा घणाघात मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. यावेळी दिग्विजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह बीआरएस पक्षावर सोलापूरातील माढ्यामध्ये टीका केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्टाचार मुक्त देश घडवण्याची भाषा करतात तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस भ्रष्टाचार केलेल्या नेत्यांना मात्र पक्षात घेऊन मंत्री पद देण्याचं काम करत आहेत अशी खोचक टीकाही दिग्विजय सिंह यांनी भाजपवर केली आहे.

भाजपची वॉशिंग मशिन

ज्या नेत्यांवर भाजपने भ्रष्ट नेते असल्याची टीका केली होती. त्याच नेत्यांना आपल्या पक्षामध्ये घेऊन ते कोणते गणित साध्य करु इच्छितात असा सवालही दिग्विजय सिंह यांनी उपस्थित केला आहे.त्यामुळे भाजपकडे अशी कोणती वॉशिंग मशिन आहे की जी भ्रष्टाचारी नेत्यांना पक्षात घेतलं की त्यांचे भ्रष्टाचार साफ होतात असा खोचक सवाल त्यांनी भाजपला विचारला आहे. यावेळी त्यांनी भाजपचे मंत्री आणि वरिष्ठ नेत्यांवरही त्यांनी गंभीरा आरोप केले आहेत.

खरेदीवालं सरकार

काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी भाजपवर टीका करताना त्यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. यावेळी त्यांनी म्हटले आहे की, पैसे देऊन भाजप नेत्यांना खरेदी करत असल्याचा गंभीर आरोप करत भाजपकडे निरपराध करण्याची कोणती मशिन आहे असा सवाल उपस्थित करून त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच हे सरकार जनतेमधून निवडून आलेलं हे सरकार नसुन खरेदीवालं सरकार असल्याचा घणाघातही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.

महाराष्ट्रात बीआरएसची जादू नाही

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात बीआरएसची कोणतीही जादू चालणार नाही. कारण त्या पक्षाची विचारसरणी वेगळी आहे, आणि महाराष्ट्राची विचारधारा वेगळी असल्याचे सांगत त्यांनी बीआरएसवरही जोरदार निशाणा साधला आहे. मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीबाबत बोलताना ते म्हणाले की, या सर्व्हेचा मी आदर करतो मात्र निवडणुकीच्या मतदान व निकालातून जनतेचं खरं चित्र दिसणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखवला. कारण कर्नाटक निवडणुकीच्या विजयानंतर आमच्या काँग्रेस पक्षामध्ये आत्मविश्वास वाढला असुन आम्हाला महाराष्ट्रात यश मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याच बरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमीच महाखोटं बोलण्याचं काम करीत असल्याचे सांगत त्यांनी मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.